' भारतातील ही १० कॉर्पोरेट ऑफिसेस कोणत्या पर्यटनस्थळांपेक्षा कमी नाहीत!

भारतातील ही १० कॉर्पोरेट ऑफिसेस कोणत्या पर्यटनस्थळांपेक्षा कमी नाहीत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जगभरात निरनिराळ्या वास्तुशिल्पांचे नमुने आढळतात, यातील काही पुरातन वास्तू असतात तर काही आधुनिक युगातील.

पुरातन असो वा आधुनिक, मानवाला पूर्वीपासूनच क्रियेटीव्ह वास्तूंची रचना करण्याची आवड जडलेली पाहायला मिळते. म्हणूनच जसजशी माणसाची प्रगती होतेय तसतशी त्याच्यातील या कलेचीही वाढ होतेय.

आज आपण जगभर काही अशा मानवनिर्मित वास्तू बघू शकतो ज्या आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतात. पण कार्यालय म्हणजेच Office देखील एवढं आकर्षकअसू शकतं का..? एखादं office एवढं अद्भुत असू शकतं की त्याला बघण्यासाठी दूरन दुरून पर्यटक येतील?

तर हो! असे offices देखील असतात.

जगात अश्या कितीतरी office buildings आहेत ज्या त्यांच्या वास्तुशिल्पामुळे प्रसिद्ध झाल्या आहेत.

अश्याच काही office buildings आपल्या देशात देखील आहेत… चला तर मग जाणून घेऊ अश्याच १० कार्यालयांबद्दल…

 

१) नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड 

 

NFDB_hyderabad-marathipizza
nfdb.gov.in

 

ही इमारत हैद्राबाद येथे असून ती एक सरकारी कार्यालयीन इमारत आहे.

तसं बघायला गेलं तर आपल्या देशातील जवळजवळ सर्वच सरकारी इमारती या एक सारख्याच रटाळ पद्धतीच्या असतात. पण हैद्राबादची ही इमारत त्याला अपवाद आहे.

नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड हैद्राबादचे हे मुख्यालय चक्क माशाच्या आकाराचे बनविण्यात आले आहे. चार मजल्यांची ही इमारत २०१२ साली बांधली गेली होती.

 

२) पटनी नॉलेज पार्क मुंबई

 

PKPAirol-marathipizza
wikimedia.org

 

मुंबईच्या ऐरोली भागातले हे आयगेट नॉलेज पार्क आहे. देशाच्या आर्थिक राजधानीतील बड्या सॉफ्टवेअर पार्कमध्ये याची गणना केली जाते.

येथील इमारतीत १७ हजार लोक एका वेळी बसू शकतात. या दोन बिल्डींगमध्ये एक उंच स्ट्रक्चर बनविले गेले असून याला एक उत्तम दर्जाच्या वास्तूरचनेचा नमुना मानलं गेलं आहे.

 

३) इन्फोसिस कॅम्पस, मैसूर

 

infosys-campus_mysore-marathipizza
youthgiri.com

 

आपल्या देशातील आयटी क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिसचे हे कँपस तब्बल ३३७ एकरात पसरलेले आहे.

ते पहिल्यांदा पाहताक्षणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवासाशी म्हणजे व्हाईट हाऊसची आठवण करून देते. अधिकाधिक सूर्यप्रकाश आत यावा या पद्धतीने ही इमारत बांधली गेली आहे.

येथे रेन वॉटर हार्वेस्टींगच्या सुविधेमुळे १५ हजार लोकांची पाण्याची गरज पूर्ण होते. तर वापरलेले पाणी रिसायकल करून पुन्हा वापरले जाते.

देशातले हे सर्वात मोठे प्रशिक्षण केंद्र असून येथे १५ हजार लोकांना एकाचवेळी प्रशिक्षण देण्याची सोय आहे.

येथे १६ हजार सॉफ्टवेअर डेव्हलपर सीट, १० हजार खोल्या व ट्रेनींगसाठी १४५०० बेडस अशा सुविधाही आहेत.

 

४) इन्फोसिस, पुणे

 

infosys-pune-marathipizza
fanpop.com

 

पुणे येथील आयटी हब हिंजेवाडी येथे असलेले इन्फोसिसचे हे ऑफिस. याचे डिझाईन दिसताना एखाद्या रग्बी बॉलसारखे दिसते. मात्र प्रत्यक्ष पाहताना ही इमारत एखाद्या स्पेसशीप सारखी आहे.

इन्फोसिसचं हे ऑफिस हायटेक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असं आहे.

 

५) आयफ्लेक्स सोल्युशन लिमिटेड

 

iflex-banglore-marathipizza
gizmodo.in

 

बंगळूरू मधील आयफ्लेक्स सोल्युशनच्या कार्यालयाची ही इमारत एखाद्या बॉक्सच्या आकाराची वाटते. १ लाख ४४ हजार चौरस फूट जागा असलेल्या या इमारतीत तब्बल १५०० कर्मचारी काम करतात.

 

६) स्टेटसमन हाऊस

 

statesman-house-marathipizza
avanta.co.in

 

नवी दिल्लीच्या पॉश कॅनॉट प्लेसमध्ये सर्व इमारतीत वेगळेपणाने उठून दिसणारी इमारत म्हणजे ‘स्टेटसमन हाऊस’. ही इमारत लक्षपूर्वक बघितली तर ती एखाद्या गॅसच्या सिलींडरच्या आकाराची वाटते.

 

७) कॅपिटल कोर्ट मुनिर्का

 

 

capital_court_munirka-marathipizza
delhirealestateguy.com

 

दिल्लीच्या जुन्या पालम रस्त्यावरची ही इमारत आहे. येथे अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांची कार्यालये आहेत. चारी बाजूंनी हिरवाईने नटलेली ही इमारत तिच्या डिझाईनमुळे आणखी खास बनली आहे.

या इमारतीवर बसविली गेलेली तिरकी उतरती काच या इमारतीच्या सौंदर्यात भर घालते.

 

८) आय टी पार्क चंदिगड

 

ITPark_chandigarh-marathipizza
firstgreen.co

 

चंदिगड हे मुळातच अगोदर कागदावर आखून वसविले गेलेले शहर. या शहरात अनेक वैविध्यपूर्ण इमारती आहेत. त्यातीलचं आयटी पार्क ही एक इमारत.

या इमारतीचा आकार एखाद्या प्रचंड जहाजासारखा आहे.

 

९) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस

 

siruseri-tata_consultancy-marathipizza

 

सिरूसेरी चेन्नईमधली हे टीसीएस पार्क ७० एकर परिसरात पसरलेले आहे. या इमारतीचे डिझाईन कारलेस ओट फर्मने तयार केले असून ते फुलपाखरासारखे आहे.

दोन्ही बाजूला ६ विंग व मध्ये पाठीच्या कण्यासारखा आकार अगदी फुलपाखराची आठवण करून देणारा आहे.

 

१०) बाटा बिल्डींग

 

Bata-building-marathipizza

 

गुडगांव येथील सेक्टर १८ मध्ये असलेली बाटाची ही इमारत. या अनेक मजली इमारतीचे डिझाईन जरा वेडेवाकडे म्हणावे असेच आहे. मात्र तेच तिचे वेगळेपण ठरले आहे.

यात वाकविलेल्या रंगात काचांची जी कलाकारी केली गेली आहे, त्यामुळे पाहणार्‍यांचे डोळे खिळून जातात. या काचांनीच तिला आकर्षक बनविले आहे.

तर या होत्या भारतातील काही खास आणि वेगळ्या office buildings…

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?