' मिडीयाचं असत्य - 'बोस, पटेल, नेहरू फाशीवर चढले' असं प्रकाश जावडेकर म्हणालेच नव्हते!

मिडीयाचं असत्य – ‘बोस, पटेल, नेहरू फाशीवर चढले’ असं प्रकाश जावडेकर म्हणालेच नव्हते!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

====

भारतीय माध्यमांचा धातांत खोटेपणा काही नवा नाही. आपली माध्यमं एवढी निर्लज्ज आहेत की त्यांचा खोटेपणा उघडा पडल्यावर तो मान्य देखील करत नाहीत…माफी मागणं तर दूरच राहिलं!

नुकताच मानव संसाधन विकास मंत्री श्री प्रकाश जावडेकरांच्या बाबतीत भारतीय माध्यमांनी असाच खोटारडेपणा केला.

मध्यप्रदेश मधे एका कार्यक्रमात प्रकाशजी म्हणाले :

 

कितने वीर…नेताजी सुभाष चंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरू…(इथे जावडेकरजींनी दीर्घ विराम घेतला)…भगतसिंग, राजगुरू…सभी जो फांसीपर चढे…(परत एकता विराम)…क्रांतिवीर सावरकरजी…बाकी महान स्वातंत्र्यसेनानी…कितनी लाठीया खायी, कितनी गोलिया खायी…

 

खात्री करण्यासाठी पुढील व्हिडीओ बघा :

 

म्हणजेच, प्रकाशजी सर्व स्वातंत्र्यसैनिकांचं नाव घेत होते.

भगतसिंग, सुखदेव आणि इतर फाशीवर चढलेल्यांचा विशेष उल्लेख त्यांनी केला. त्या आधी त्यांनी एक विराम देखील घेतला, जसा आपण बोलताना नेहमीच घेत असतो.

वरील व्हिडीओमधे हे स्पष्ट दिसतंयसुद्धा…! आणि तरी आमच्या बुद्धिवंत पत्रकारांना ते कळालं नाही.

प्रकाश जावडेकरांनी त्यांच्या ट्विटरवरून अगदी व्यवस्थित स्पष्टीकरणदेखील दिलंय :

 

 

 

 

 

एवढं होऊन देखील – कुणीही ह्या प्रकाराबद्दल माफी मागितली नाहीये. काही वेबसाईटवर फक्त मथळे बदलले गेले आहेत.

जिथे “जावडेकरांनी इतिहास बदलला” असं टायटल होतं, तिथे “जावडेकरांनी स्वातंत्र्यसैनिकांचा केला सन्मान” असा उल्लेख होता.

पण निष्कारण जो गोंधळ झाला…त्याची भरपाई कशी होणार?!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 166 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?