'मुलांच्या 'ह्या' हालचालींवरून तुम्ही त्यांचे खोटे पकडू शकता !

मुलांच्या ‘ह्या’ हालचालींवरून तुम्ही त्यांचे खोटे पकडू शकता !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये एकदातरी खोटे बोलतोच. आपल्यातील बहुतेक लोक देखील कधीतरी खोटे बोलले असतील, भले ते खोटे स्वतःच्या फायद्यासाठी नसेल, पण दुसऱ्याला वाचवण्यासाठी किंवा एखाद्याला टाळण्यासाठी जीवनात खोटे बोलले जाते. पण खोटे बोलणे हे कधीही चांगले नसते, खोटे बोलण्याने आपला कधीही फायदा होत नाही, आपल्याला खोटे बोलण्याचे परिणाम कधीतरी भोगावेच लागतात. काही लोक तर प्रत्येक शब्दाला खोटे बोलतात, कारण त्यांना खोटे बोलण्याची सवयच झालेली असते. खोटे बोलून आपण वाचतो, असा भ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला असतो.

खोटे बोलण्याची सवय मनुष्याला कधी – कधी लहानपणापासूनच लागते. लहानपणी जर एखादी चुकीची गोष्ट केली आणि खोटे बोलून जर वाचलो, तर ती सवय आपल्याला लागते आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला मोठेपणी भोगावे लागतात. त्यामुळे लहानमुले खोटे बोलत असल्यास, त्यांना आताच रोखणे खूप महत्त्वाचे आहे, कारण मोठेपणी ही खोटे बोलण्याची सवय त्यांच्यापुढे खूप मोठ्या समस्या निर्माण करू शकतात.

childeran lying.marathipizza
education.com

लहानमुलांनी एखादी चूक केली आणि जर ती त्यांच्या पालकांना समजली, तर आपले पालक त्यासाठी आपल्याला शिक्षा करतील, असा समज लहानमुलांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि त्यांना खोटे बोलणे हा मार्ग योग्य वाटतो. अश्यावेळी त्यांना शिक्षा न करता समजून सांगणे महत्त्वाचे असते. आता तुम्ही म्हणाल की, मग आम्हाला कसे समजणार की, आमची मुले खरे बोलत आहेत की नाहीत. आज आम्ही तुम्हाला अश्या काही टिप्स देणार आहोत, ज्यावरून तुम्हाला लक्षात येईल की, तुमची मुले खोटे बोलत आहेत की नाहीत..

१. चेहरा वाचणे.

children lying.marathipizza1
tqn.com

प्रत्येकजण चेहरा वाचू शकत नाही, हा निव्वळ भ्रम आहे. खूपच कमी लोक आपल्या भावना लपू शकतात. लहानमुले तर अजिबात आपल्या भावना लपवू शकत नाही. त्यांच्या चेहऱ्याकडे आणि त्यांच्या शरीरिक भाषेकडे नेहमी लक्ष द्या. अनेकदा खोटे बोलत असताना, लहानमुले आपल्याकडे बघत नाहीत, आपल्या कपड्यांच्या कोपऱ्याशी खेळत राहतात आणि त्यांना घाम फुटायला सुरुवात होते.

२. विषय बदल्यावर सहजतेने वागणे.

children lying.marathipizza2
tqn.com

जर लहानमुले खोटे बोलत असतील आणि तुम्ही विषय बदललात, तर ते एकदम सहजतेने वागतात. त्यावेळी ते सुटकेचा श्वास सोडतात. तुम्ही विषय बदलून देखील मुलांची प्रतिक्रिया बघू शकता. जर त्याचे हावभाव बदलले, तर समजून जा की, ते काहीतरी तुमच्यापासून लपवत आहेत.

३. बोलण्याची पद्धत

children lying.marathipizza3
popsugar-assets.com

जर लहानमुले खरे बोलत असतील, तर ती एकदम आरामात बोलतात. पण खोटे बोलत असतील, तर मुले बोलताना चाचपडतात आणि स्पष्टपणे बोलत नाहीत. पण हा नियम प्रत्येकाला लागू होत नाही, कारण काही मुले पालक ओरडणार म्हणून पहिलेच घाबरून जातात.

४. मुले अचानक आक्रमक होतात.

children lying.marathipizza4
tqn.com

जर मुलांच्या स्वभावामध्ये अचानक बदल झाला, म्हणजे जर एखादा शांत स्वभावाचा मुलगा अचानक रागवायला लागला असेल, तर समजून जा की, काहीतरी गडबड नक्की आहे. जर मुले कारण नसताना प्रत्येक गोष्टीला चिडचिड करत असतील, तर ते काहीतरी लपवत आहेत.

५. रटवलेले उत्तर

children lying.marathipizza5
mdpcdn.com

जर एखादा मुलगा खोटे बोलत असेल, तर तो एका प्रश्नाचे एकाच उत्तर देईल. पण जर खरे बोलत असेल, तर त्याचे शब्द बदलतील, कारण खोटे नेहमी रटवलेले असते.

६. विचित्र हालचाली

children lying.marathipizza6
files.wordpress.com

जर कोणतीही गोष्ट सांगताना लहानमुले विचित्र हालचाली करत असतील, ज्या ते सहसा करत नाहीत, तर याचा अर्थ आहे की, ती खोटे बोलत आहेत.

अश्याप्रकारे तुम्ही मुलांच्या हालचालीवरून त्यांचे खोटे पकडू शकता. पण हे नेहमी लक्षात ठेवा की, कधीही मुलांवर रागवून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. त्यांना प्रेमान समजवायला पाहिजे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?