' भेटा पृथ्वीवरील सर्वात आनंदी व्यक्तीला…! हे आहे त्यांच्या आनंदाचं रहस्य… – InMarathi

भेटा पृथ्वीवरील सर्वात आनंदी व्यक्तीला…! हे आहे त्यांच्या आनंदाचं रहस्य…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

=== 

माणूस जास्तीत जास्त किती आनंदी असू शकतो ह्याचा अंदाज आपण लावू शकत नाही, कारण आनंदाला प्रमाण नाही, आनंद कोणत्याही गोष्टीतून मिळू शकतो.

एखाद्या लहान मुलाला एक लहान चोकॉलेट सुद्धा आनंदाचं कारण असतं. एखाद दिवशी ऑफिसमधून लवकर येऊन बायकोला सरप्राइज दिलंत किंवा तिला स्वयंपाकात मदत केलीत तर तिच्यासाठी ती पण गोष्ट आनंद देणारी असते.

 

things-happy-couples-talk-InMarathi

 

असं म्हणतात की, आनंद हा मानण्यावर असतो. छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्याला खूप आनंद देऊ शकतात. अगदी रोजच्या जीवनातल्या गोष्टी पण. यासाठी फक्त तो आनंद शोधण्याची तयारी दाखवावी लागते.

तो कधी जास्त असू शकतो, तर कधी फारच कमी! आपलं आयुष्य सध्या इतकं गुंतगुंतीचं झालंय की, आनंद शोधण्यापेक्षा आपण दु;खाचा खूप बाऊ करतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

सध्याच्या नैराश्याच्या युगात कोणताही माणूस पूर्णत: आनंदी असणे जवळजवळ अशक्यच आहे असे तुम्ही मानत असाल.

पण आज आम्ही तुमची अश्या व्यक्तीसोबत भेट घडवणार आहोत जी पृथ्वीवरील सर्वात आनंदी व्यक्ती म्हणून ओळखली जाते.

विश्वास बसत नाही, मग ही गोष्ट तुम्ही जाणून घेतलीच पाहिजे!

 

Matthieu Ricard-marathipizza01
tedcdn.com

 

एक असे व्यक्ती आहेत जे १९९१ साली अखेरच्या वेळी दुःखी झाले होते. त्यानंतर आजपर्यंत ते आनंदीच आहेत.

यामागचे कारण जाणून घेण्यासाठी अमेरिकेच्या विद्यापीठाने १२ वर्षे रिसर्च केला. त्यासाठी त्यांच्या मेंदूला २५६ सेंसर लावण्यात आले. त्यानंतर स्वतः युनायटेड नेशन (UN) ने त्यांना पृथ्वीवरील सर्वात आनंदी व्यक्ती म्हणून स्वीकारले.

त्यांनी ४५ वर्षात आनंदी राहणे किंवा आनंद ही सवयच बनवून घेतली आहे.

मॅथ्यू आपल्याविषयी सांगताना म्हणतात की,

मी फ्रान्समध्ये जन्मलो. १९७१-७२ पासून मी कायम आनंदी राहण्याचा प्रयत्न करू लागलो. तशी सवय लावून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. या ४५ वर्षांत मी स्वतःवरच अनेक प्रकारचे रिसर्च केले.

त्यातून आनंदी राहण्याचे विविध वैज्ञानिक मार्ग मी शोधले. हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे.

मॅथ्यू यांनी आनंदी राहण्यासाठी अगदी सोपे असे पाच फॉर्म्युले सांगितले आहेत. किमान तीन महिने या पद्धती फॉलो केल्या तर तुम्हीही स्वतःला आनंदी राहण्याची ही सवय लावून घेऊ शकता.

happy man inmarathi
today show

 

तसे तर मॅथ्यू आनंदी राहण्यासाठी मेडिटेशनसह इतर अनेक पद्धतींचा अवलंब करतात.

व्यक्तीच्या मेंदूमध्ये आनंद, दुःख, राग, प्रेम आणि इतर भावनांशी संबंधित वेगवेगळे केमिकल्स असतात. त्यांच्या अॅक्टीव्ह आणि डिअॅक्टीव्ह होण्याने वेगवेगळ्या भावना निर्माण होत असतात.

आनंदाबाबतही अशीच सिस्टीम असते. आपल्या मेंदूत कपाळाला लागून असलेला समोरील भाग आणि कानाच्यावर उजव्या बाजुला आनंदाशी संबंधित २  भाग असतात.

हॅप्पिनेस केमिकल्सचा विचार करता मेंदूत याची संख्या ४ असते. त्यांची नावे Dopamine, Oxytocin, Serotonin, Endorphins अशी आहेत.

हे चारही केमिकल्स वेगवेगळ्या परिस्थितीत मेंदूत तयार होणाऱ्या आनंदाच्या भागात कमी जास्त प्रमाण झाल्याने आनंद कमी करतात किंवा वाढवतात.

 

Matthieu Ricard-marathipizza02
cdn.tricycle.org

७० वर्षीय मॅथ्यू म्हणतात की, आधी त्यांनाही इतरांप्रमाणे छोट्या छोट्या बाबींचे टेन्शन यायचे. १९७२ च्या सुमारास जेव्हा ते दार्जिलिंगमध्ये आले त्यावेळी त्यांना त्यांचे शिक्षक कांगयूर यांनी डे टू डे लाइफमध्ये आनंदी राहण्याचा मंत्र दिला.

हळू हळू ती त्यांची सवय बनली.  हाच माझ्या जीवनातील यू टर्न ठरला असे मॅथ्यू सांगतात. त्यानंतर मी फ्रान्स सोडून दार्जिलिंग-नेपाळमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

व्यवसायाने शास्त्रज्ञ आणि पीएचडी प्राप्त मॅथ्यू यांनी सांगितले की,

मला सर्वाधिक दुःख १९९१ मध्ये माझे सर्वात प्रिय शिक्षक आणि मला जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनवणारे Dilgo Khyentse Rinpoche यांच्या निधनाने झाले होते. त्यानंतर मी परत कधीही दुःखी झालो नाही.

हसत गमतीत ते म्हणाले की, मी जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनलो, तेच माझ्यासाठी दुःखाचे कारण बनले आहे. मी जेथेही जातो तेव्हा लोक मला आनंदाचा फॉर्म्युला विचारू लागतात.

 

Matthieu Ricard-marathipizza03
azquotes.com

 

मॅथ्यू यांनी सांगितले की, आनंदी राहण्याचे कारण जाण्यासाठी अमेरिकेच्या विस्कॉन्सिन साइंटिफिक युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या मेंदूवर १२ वर्षे संशोधन केले.

यादरम्यान, त्यांच्या डोक्यावर २५६ सेंसर लावून अगदी वाईट स्थितीतही माझ्या मेंदूत काय सुरू आहे, त्याचे काम कसे सुरू आहे याचा अहवाल तयार केला.

या रिसर्चनुसार, माझ्यात एक गॅमा वेव्ह आढळली. ती जगातील फार कमी लोकांमध्ये डेव्हलप होत असते. त्यात कोणत्याही स्थितीत व्यक्ती आनंदी राहण्याचे प्रमाण वाढते.

काय म्हणता? बसला ना विश्वास की का ही आहे पृथ्वीवरील सर्वात आनंदी व्यक्ती!

मित्रांनो, खरंतर ते ही आपल्यासारखेच सामान्य आहेत, पण साधनेने त्यांनी सतत आनंदी राहण्याची कला विकसित केली. आपणही शांत बसून विचार केला तर आनंदी राहणं हे काही फार कठीण नाहीये.

माणूस कोणत्याही परिस्थितीत हसतमुख राहू शकतो. हसत हसत जर तुम्ही संकटांचा सामाना केलात तर तुम्हाला कोणतीच गोष्ट कठीण वाटणार नाही. यासाठी फक्त थोडे प्रयत्न करण्याची गरज आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?