' हा कुल डूड चक्क कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे!

हा कुल डूड चक्क कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

काही दिवसांपासून एक पगडी घातलेला फिट, देखणा असा शीख संपूर्ण सोशल मिडीयावर गाजतो आहे. या शीखकडे बघितलं की कोणीही त्याच्या मोहात पडेल अशी त्याची personality. Instagram, Facebook वर देखील त्याचीच चर्चा.. आणि चर्चेमागील कारणही तसेच.. हा dashing शीख कॅनडा २०१९ च्या निवडणुकीच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे आणि ते आहेत ३८ वर्षीय जगमित सिंह

Jagmeet_sinh07-marathipizza
mensxp.com

आता तुम्ही म्हणालं की याचं राजनीतीत काय काम… कारण आपल्यासाठी तर नेता म्हणजे पांढरे कपडे आणि पांढरे केस असणारा, म्हातारपणाच्या उंबरठ्यावर असणारा माणूस. पण जगात काही सर्व देशात असं नाही होत…!

जगातील कित्येक देशांचे Prime Minister किंवा Head Of The State हे तरुण आणि फिट नेते आहेत. तरुण नसतील तरी ते फिट आहेत. तर कित्येक नेते हे तर चाळीशीच्या आतले आहेत.

आपले आवडते नेते आणि कित्येकांचे आयडल ज्यांनी वर्णभेदाच्या सर्व सीमा पार करत अमेरिकेसारख्या देशाचे पंतप्रधान पद भूषवले ते बराक ओबामा हे देखील अतिशय फिट आहेत.

barack_obama-marathipizza
popsugar.com

मल्कोल्म टर्नबुल हे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान आहेत. ६१ वर्षाच्या या पंतप्रधानांची जगातील Top 10 Fittest Head Of The State च्या यादीत वर्णी लागते.

malcolm_turnbull-marathipizza
anc.org.au

आपला शेजारी देश भूतान येथील राजा जिग्मे खेसर नामग्याल वांग्चुक हे ३५ वर्षाचे आहेत. ते देखील जगातील सर्वात फिट Head Of The State च्या यादीत मोडतात.

jigme-khesar-namgyel-wangchuck-marathipizza
cosmopolitan.in

४३ वर्षीय जस्टिन ट्रूडो हे सध्याचे कॅनेडियन पंतप्रधान देखील अतिशय फिट आहेत.

justin_trudeau-marathipizza
elle.com

पण आपल्या भारत देशात जिथे अर्ध्याधिक लोकसंख्या ही ३० वर्षाखालील आहे, तिथे या युवा पिढीचे नेते हे मात्र युवा नाहीत. ज्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून भारताच्या युवा पिढीने त्यांच्या भावी आयुष्याची स्वप्ने बघावीत असे नेते आपल्या देशात नाही.

Jagmeet_sinh-marathipizza
instagram

आता जगमित सिंह यांचचं उदाहरण घ्या ना! एक असा नेता जो उच्च शिक्षित आहे, ज्याला राजनीतीची जाण आहे आणि त्यासोबतच त्याचं स्वतःच असं एक स्टाईल स्टेटमेंट आहे. ज्याला बघून प्रत्येक जण प्रभावित होतो आणि नुसतचं प्रभावित होत नाही तर त्याला आदर्श मानतो. जो मंचावर उभ राहून भाषणे देत नाही तर आपल्या स्टाईल आणि लूकमुळे लोकांना आपल्या मोहात पाडतो. पण यामुळे त्याच्या कर्तृत्वात काहीही कमी पडत नाही.

चला तर मग या जगमित सिंह बद्दल थोडं जाणून घेऊ…

येत्या दोन वर्षात एक शीख कॅनडाचा पंतप्रधान बनू शकतो याची चिन्हे दिसू लागली आहेत, यावरून कॅनडा येथे सेक्युलरिजम किती मजबूत आहे हे दिसून येते. कॅनडाचे आताचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना एक मजबूत राजनीतिक प्रतिस्पर्धी मिळाला आहे, ट्रूडो यांना टक्कर देणारी  ही व्यक्ती आणखी कोणी नसून एक शीख आहे. ३८ वर्षीय जगमित सिंह यांनी कॅनडाच्या राजनीतीमध्ये इतिहास रचला आहे. कॅनडाच्या न्यू डेमोक्रेटिक पार्टीचे नेतृत्व करणारे ते पहिलेच शीख नेता ठरले. जगमित सिंह हे तसे व्यवसायाने एक क्रिमिनल लॉयर आहेत. पण एक लॉयर किंवा एक राजनेता म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत असे नाही, तर त्यांच्या dashing lifestyle साठी देखील खूप प्रसिद्ध आहे.

 

Jagmeet_sinh03-marathipizza
facebook

ते पहिले असे शीख आहेत जे Ontario चे provincial legislator राहिलेले आहे. याशिवाय ते पहिले शीख डिप्टी लीडर देखील आहेत. पण ते केवळ त्यांच्या राजनीतिक करिअरसाठीचं चर्चेत असतात असे नाही, तर ते त्यांच्या स्टाईलमुळे ही चर्चेत असतात.

 

Jagmeet_sinh08-marathipizza
ctvnews.ca

Instagram वर देखील ते त्यांच्या लाईफस्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे खूप लोकप्रिय आहेत. एवढचं काय तर त्यांना टोरंटो लाइफ बेस्ट ड्रेस्ड या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले आहे.

 

Jagmeet_sinh09-marathipizza
torontoverve.org

नुकतच जगमित सिंह यांचा एक विडीओ वायरल झाला होता ज्यात एका महिलेच्या असभ्य वर्तनाला त्यांनी अगदी नम्रपणे हाताळले होते. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये अधिक वाढ झाली.

 

Jagmeet_sinh04-marathipizza
facebook

जगमित सिंह यांना सायकल चालवायला खूप आवडते. ग्लोबल वार्मिंग च्या सामस्येला बघता त्यांना कॅनडात नॅशनल लेवलवर सायकलला प्रोत्साहित करण्याची इच्छा आहे. तसेच त्यांना बॉडीबिल्डींगचीही खूप आवड आहे.

 

Jagmeet_sinh01-marathipizza
macleans.ca

३८ वर्षीय जगमित हे स्ववाभाने देखील खूप cool आहेत. त्यांनी एक इंटरव्ह्यू दरम्यान सांगितले की, ‘लोक मला एकटक बघतात, कारण त्यांना वाटत की मी जरा वेगळा आहे. मी मानतो की जर लोक मला एवढं अटेन्शन देत आहेत, तर मला देखील काहीतरी वेगळं करायलाच हवं.’ त्याचं हे उत्तर खरचं आजच्या युवा पिढीच मन जिंकणार आहे.

जगमित सिंह हे एक ट्रायल वकील आहेत, लहानपणी त्यांना देखील वर्णद्वेषाच्या समस्येचा सामना करावा लागला होता. त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचारामुळेचं त्यांना राजनीतीत उतरण्याची प्रेरणा मिळाली आणि आज ते स्वतःच्या बळावर कॅनडाचे भावी पंतप्रधान बनण्याच्या वाटेवर आहेत.

 

हे वाचून तुम्हालाही असे वाटत असेल ना की आपले नेतेही असे फिट आणि स्टायलिश असायला हवे होते…!

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?