' शाकाहारी लोकांबद्दलचे ‘हे’ गैरसमज आज दूर करून घ्या! – InMarathi

शाकाहारी लोकांबद्दलचे ‘हे’ गैरसमज आज दूर करून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या सभोवताली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसे पाहण्यास मिळतात. त्यातील काही सहकारी असतात, तर काही मांसाहारी असतात. तुमच्या मित्रमंडळीमध्ये देखील ही विविधता तुम्हाला अनुभवायला मिळते. मग एखाद्या ठिकाणी गेल्यावर, एखादा मित्र जर पक्का शाकाहारी किंवा मांसाहारी असल्यास काही समस्यांना सामोरे जावे लागते, कारण जर ग्रुपमधील एकटाच कोणीतरी शाकाहारी किंवा मांसाहारी असेल, तर त्याला तिथे बसण्यास थोडे विचित्र वाटते. प्रत्येकवेळी असे घडतेच असे नाही. मांसाहारी लोक कधी – कधी शाकाहारी लोकांना त्यांच्या या वागण्यामुळे डिवचतात. पण आपल्या मांसाहारी लोकांचे शाकाहारी लोकांविषयी आणि शाकाहाराविषयी विविध गैरसमज निर्माण झालेले आहेत, ज्यामुळे मांसाहारी लोक त्यांना चुकीचे समजतात. चला तर मग जाणून घेऊया की, हे गैरसमज नक्की कोणते आहेत..

१. शारीरिक उर्जेसाठी मांसाहर आवश्यक असतो

 

Vegan's Misconceptions.marathipizza
kxcdn.com

दैनंदिन कामे करण्यासाठी, जिम करण्यासाठी आणि खेळ खेळण्यासाठी आपल्याला मांसच शंभर टक्के ऊर्जा प्रदान करू शकते, असा बऱ्याच लोकांचा विश्वास आहे. पण बऱ्याच शाकाहारी पदार्थांमधून देखील आपण तेवढीच ऊर्जा मिळवू शकतो, जसे- भाज्या, सोयाबीन, फळे, धान्य, शेंगदाणे, बियाणे यामधून देखील तुम्हाला चांगल्याप्रकारची ऊर्जा मिळते, जी तुम्हाला ही कामे करण्यासाठी पुरेशी असते.

 

२. शाकाहारी लोक हे तंदुरुस्त आणि बारीक असतात.

 

Vegan's Misconceptions.marathipizza1
bitesizehealth.com

आपण जर संतुलित आहार खात असाल, तर तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याची शक्यता आहे. पण शाकाहारी असून देखील तुम्ही अतिप्रमाणात चिझी पिझ्झा, सॉफ्ट ड्रिंक, चीप्स खात असाल तर तुम्ही तंदुरुष्ट आणि निरोगी राहू शकत नाही. तुम्ही खाण्यासाठी काय निवडता, त्यावर तुमचा तंदुरुस्तपणा अवलंबून असतो.

 

३. शाकाहारी पदार्थ हे मांसाच्या तुलनेत महाग असतात.

 

Vegan's Misconceptions.marathipizza2
myhdiet.com

काही लोकांना वाटते की, शाकाहारी पदार्थ हे मांसाच्या तुलनेत महाग असतात. पण हे खरे नाही आहे, कारण मांसाचे दर हे भाज्यांपेक्षा नेहमीच जास्त असतात. भाज्यांचा हंगामी दर हा नेहमीच्या दरापेक्षा कमी असतो. तसेच, तुम्ही भाज्या ह्या तुमच्या घराभोवती देखील उगवू शकता.

 

४. मानवी शरीराला लागणारी पुरेशी प्रथिने शाकाहारी पदार्थ देत नाहीत.

 

Vegan's Misconceptions.marathipizza3
ytimg.com

तुम्हाला फायबर फक्त शाकाहारी खाण्यामधूनच मिळते, कोणत्याही प्रकारचा मांसाहार केल्याने फायबर मिळत नाही. तसेच, प्रथिने ही दुध, चीज आणि अंडी यांच्यामधून मिळतात.

 

५. शाकाहारी पदार्थ हे कंटाळवाणे असतात.

 

Vegan's Misconceptions.marathipizza4
allrecipes.com

शाकाहारी खाण्याची यादी खूप मोठी आहे, शाकाहारी खाण्यामध्ये कितीतरी प्रकारच्या डिश उपलब्ध असतात. जर तुम्ही कितीही मस्त बटर चिकन किंवा चिकन कबाब पाहिलात, तरीदेखील तुम्ही चवदार पाव भाजी, छोले भटुरे, डोसा, इडली, पास्ता, पिझ्झा, दाल मखनी इत्यादींशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे शाकाहारी खाणे कंटाळवाणे नसते.

 

६. शाकाहारी लोकांना प्रवासात खाण्यासाठी पदार्थ मिळणे कठीण होते.

 

Vegan's Misconceptions.marathipizza5
blogspot.com

पश्चिमेकडील देशातील लोक हे मांसाहार खूप करतात. त्या ठिकाणी शाकाहारी पदार्थ सहसा खाल्ले जात नाहीत. तिथे तुम्हाला शाकाहारी पदार्थ मिळणे थोडे कठीण होते. तुम्ही त्यांना शुद्ध शाकाहारी जेवण बनवण्यासाठी विनंती करू शकता आणि बऱ्याचवेळा लोक शाकाहारी जेवण बनवून देण्यासाठी तयार देखील होतात.

 

७. मनुष्य हा मांसाहारासाठीच बनलेला आहे.

 

Vegan's Misconceptions.marathipizza6
sickchirpse.com

आपले दात हे मांस खाण्यासाठीच कडक असतात, असा लोकांचा समज आहे. पण त्यावरून असे सिद्ध होती नाही की, आपण फक्त मांसच खाल्ले पाहिजे. आपली पचनक्रिया मांस सहज पचवू शकते, पण त्याच्यापेक्षाही लवकर भाज्या पचवू शकते.

 

८. बहुतांश शाकाहारी लोक मांसाचा द्वेष करत नाहीत.

 

Vegan's Misconceptions.marathipizza7
thenewsminute.com

खूप घरांमध्ये पालक हे मांसाहारी असतात, पण त्यांची मुले शुद्ध शाकाहारी असतात. त्या मुलांना घरामध्ये मांस बनवले तर चालते, पण ते खायला त्यांना आवडत नाही.

असे गैरसमज शाकाहारी लोकांबद्दल तुमचे असतील, तर ते आज नक्कीच दूर झाले असतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?