' भगतसिंगची फाशी महात्मा गांधी रोखू शकत होते का? सत्य जाणून घ्या! – InMarathi

भगतसिंगची फाशी महात्मा गांधी रोखू शकत होते का? सत्य जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : राज कुलकर्णी

===

देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक लोकांनी बलिदान दिलं, कित्येक लोकांनी त्यांचं आयुष्य पणाला लावून रक्त सांडलं तेंव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं..

 

यात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, चंद्रशेखर आझाद अशा कित्येक क्रांतिकाऱ्यांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली!

पण तरीही काही लोक यात सुद्धा तुलना करायला बघतात की कोणाचं बलिदान सर्वात  मोठं? जे अत्यंत चुकीचं आणि अनाकलनीय आहे, आणि हे कुठेतरी थांबायला हवं कारण या ग्रेट माणसांचा ग्रेटनेस आपणच जपायला हवा!

 

history inmarathi

 

गांधीजी आणि भगत सिंग यांच्यात सुद्धा अशीच बिनडोक तुलना त्यांचे अनुयायी करत असतात आणि हा तर आपल्या देशात एक प्रकारचा ट्रेंडच झाला आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बघायला गेलं तर गांधीजी आणि भगत सिंग यांचे विचार जरी वेगळे असले तरी त्यांचं ध्येय एकच होतं! आणि त्यासाठी या दोघांनी आपल्या प्राणांची परवा न करता भारतभूमीसाठी त्यांनी त्यांचा जीव ओवाळून टाकला त्यामुळे त्यांच्या कार्याची तुलना करण्यापेक्षा शतशः नमनच करायला हवं!

भगत सिंग यांचे काही अनुयायी त्यांच्या फाशीसाठी गांधीजींना जवाबदार धरतात, जे योग्य ,अयोग्य ठरवायचा आपल्याला अजिबात अधिकार नाही. कारण त्या काळातल्या परिस्थितीची आणि त्या विषयाच्या गंभीरतेची, आपल्याला अजिबात जाणीव नाही!

 

bhagat singh

 

“भगतसिंगांसाठी गांधीजींनी काहीच केलं नाही. मनात आणलं असतं तर ते भगतसिंगांची फाशी वाचवू शकले असते, परंतु जाणूनबुजून त्यांनी तसं केलं नाही. “अशी एक चर्चा मुद्दामहून घडवली जाते. पण त्याबाबतची वस्तुस्थिती वेगळीच आहे.

गांधीवर टीका करण्यासाठी भगत सिंगच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे लोक कोणत्या विचाराचे आहेत, हे सांगायची गरज नाही.

भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा, ७ ऑक्टोबर १९३० ला सुनावण्यात आली. या शिक्षेच्या विरुद्ध केलेले special petition हे त्यावेळी privy council समोर करावे लागत होते.

ते petition फेटाळलं गेलं. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू १९२९ च्या कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

संपूर्ण स्वराज्याची मागणी करणारा गांधी-आयर्विन कराराचा मसुदा त्यांचाच होता. या कराराच्या वेळीही भगत सिंगला माफी मिळावी म्हणून एक प्रमुख मुद्दा होता.

 

bhagat-singh-rajguru-and-sukhdev InMarathi

 

नेहरूंच्या पुढाकाराने मदन मोहन मालवीय यांनी १४ फेब्रुवारी १९३१ ला दया याचिका दाखल केली ती २० मार्चला फेटाळली गेली.

गांधी आणि लॉर्ड आयर्विन यांची चर्चा १७ फेब्रुवारी पासून सुरू होऊन ५ मार्च १९३१ ला पूर्ण झाली आणि तो ऐतिहासिक करार झाला.

त्यावेळी देखील भगत सिंहच्या माफीवर चर्चा झाली. या करारादरम्यान गांधीजींनी ९० हजार भारतीय कैद्यांना मुक्त करण्यास सहमती मिळवली.

हा प्रसंग अजय देवगण याच्या ‘दि लेजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटात खूप चपखलपणे दर्शविला आहे, जो वास्तवाशी जवळीक असणारा टिपला आहे.

 

the-legend-of-bhagatsingh-inmarathi

 

त्यावेळी करार महत्वाचा होता म्हणून करार झाल्यानंतर पुन्हा २१ मार्चला गांधीजीनी लॉर्ड आयर्विनची भेट घेऊन भगत सिंगला माफी देण्याची विनंती केली.

याच अनुषंगाने २२ मार्चला देखील गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली आणि या भेटीत प्रथमच लॉर्ड आयर्विन यांनी भगत सिंगच्या माफी बाबत नक्की प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.

गांधीजींनी २३ मार्च रोजी गांधी यांनी लॉर्ड आयर्विन यांना पुन्हा पत्र लिहिलं आणि त्या पत्रात येशूची दयाबुद्दी आणि त्याचबरोबर त्यांच्या ख्रिस्ती धर्मातील दया भावनांना साद घातली.

हे पत्र ज्या दिवशी पाठवले त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता तिघांना फाशी दिली. गांधीजींनी अथक प्रयत्न करून देखील काही उपयोग झाला नाही.

भगत आणि त्याच्या सहकाऱ्यांना फाशी दिली गेल्याची बातमी समजताच प्रचंड जनक्षोभ उसळला. १९३१ मध्ये कराचीत झालेल्या कॉंग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार पटेल होते. त्यांना आणि गांधीजींना लोकांनी काळे झेंडे दाखवले.

 

bhagat-singh-gandhi-marathipizza0

 

गांधींनी काय प्रयत्न केले याची माहिती नेहरूंच्या आत्मचरित्रातून किंवा संन्याल वगैरेंच्या लिखाणातून मिळते.

अगदी याचा दाखला लॉर्ड आयर्विन यांच्याही लिखाणात आहे :

As I listened to Mr. Gandhi putting the case for commutation before me, I reflected first on what significance it surely was that the apostle of non-violence should so earnestly be pleading the cause of the devotees of a creed so fundamentally opposed to his own, but I should regard it as wholly wrong to allow my judgment to be influenced by purely political considerations. I could not imagine a case in which under the law, penalty had been more directly deserved.

 

bhagat-singh-gandhi-marathipizza01

 

इंग्रजांनी एवढी कठोर भूमिका घेण्याची ही काही कारणे होती.

भगत विरोधात प्रचंड नाराजी Civil Services Officers मध्ये होती.

पंजाब प्रांताच्या गवर्नरने भगत सिंगला माफी दिल्यास राजीनामा देण्याची धमकी दिली होती. कारण भगतला फाशी Saunders च्या हत्येच्या खटल्यात झाली होती.

त्यामुळे युरोपियन ICS केडर फाशीचे समर्थक होते. ICS केडरच्या नाराजीचा परिणाम असा होता की, संपूर्ण वसाहती देशातील ICS केडरच्या अधिकाऱ्यांची एकी निर्माण झालीअसती.

ब्रिटीश त्यांच्या राज्यकारभाराच्या दृष्टीने भारतातील भगत सिंहसाठी आफ्रिका, म्यानमार, अफगाणिस्तान, अरब देश आदी वसाहतीतील अधिकाऱ्यांना नाराज करू इच्छित नव्हते. याचा दुसरा परिणाम देखील असा होता की –

ब्रिटीश युवक वसाहतीतील नौकरीसाठी पुन्हा तयार होणार नाहीत! ICS केडरच्या एकजुटीचा उद्देश हा देखील होता!

या सर्व कारणास्तव भगत सिंहला माफी मिळणे कठीण गोष्ट होती. आणि एकदा दया याचिका फेटाळली की निर्णय पूर्णतः पंजाब गवर्नरच्या हातात होता. या बाबत विस्तृत माहिती असफ अली, अरुणा असफ अली आणि जे. एन . सन्याल यांनी लिहिली आहे.

वी.एन. दत्त यांनी गांधीनी भगत सिंग आणि त्याच्या साथीदारांना वाचविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे.

भगत सिंह यांना वाचविण्याचा गांधीजींनी प्रयत्न केल्याचा उल्लेख नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात सुद्धा केला आहे. खुद्द पटेल आणि नेहरूंनी सुद्धा त्यांच्या परीने प्रयत्न केले.

पण महत्वाची गोष्ट अशी की भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना वाचवण्याचा जो काही प्रयत्न केला तो गांधी – नेहरू – पटेल यांनीच केला.

 

Gandhi nehru patel Inmarathi

 

आज भगत सिंग यांची बाजू घेवून गांधींवर आरोप करणाऱ्या कोणत्याही संघटनेने तसा प्रयत्न केला नाही.

त्यावेळी केशव बळीराम हेडगेवार हे सरसंघचालक होते. मात्र त्यांनी पत्रक काढून महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या आंदोलनापासून अलिप्त राहावे असे आवाहन केले. ही बाब संघ विचारांचे लेखक चं. प. भिशीकर यांनी नमूद केली आहे.

मात्र सत्याग्रहाच्या आंदोलनापासून अलिप्त राहावे म्हणून पत्रक काढणाऱ्या संघाने भगत सिंगचे समर्थन करणारे किंवा भगतला माफी द्यावी असे कोणतेही पत्रक काढले नाही किंवा तसे प्रयत्न देखील केले नाही.

भगत सिंहचे कार्य महान आहेच. पण भगतसिंगला माफी मिळाली असती तर काही अटी नक्कीच लादल्या गेल्या असत्या. कारण सरकार माफी देताना अशा अटीवरच माफी देत असे.

भगत सिंग यांचे एकंदर क्रांतिकारी विचार पाहता आणि स्वाभिमानी स्वभाव पाहता भगत सिंग याने या अटीचे पालन केले असते असे आपण ठामपणे म्हणून शकत नाही. आणि अटी न पाळणाऱ्या भगत सिंगला सतत माफी मिळणे देखील अशक्य होते.

भगत सिंगला माफी मिळाली असती तर त्याचे नाव कदाचित एवढे अजरामर झालेच नसते.

 

bhagat-singh-gandhi-marathipizza02

 

संदर्भ: –
1) Gandhi Marg Vol no.32 Issue no .3 Oct-Dec.2010 – Chander Pal Singh2) Bhagat Singh Diaries – J.N.Sanyal
3) Selected writings of Bhagat Singh – Shiv Varma, Samajvadi Sadan Kanpur. 4) Fragments of Past – Aruna Asaf Ali.
5) Homage to Martyrs- Pub.Shahid Ardh shatabdi Samaroh Samiti, Dehli 1981. 6) Towards Freedom- Jawaharlal Nehru. 7) Savarkars Mercy Petition – Frontline Volume 22 – Issue 07, Mar. 12 – 25, 2005

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?