' बीबीसीच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत १० भारतीय महिलांची वर्णी..!

बीबीसीच्या १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत १० भारतीय महिलांची वर्णी..!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बीबीसीने नुकतेच यावर्षीच्या १०० प्रभावशाली महिलांची यादी जाहीर केली आहे. यात १० भारतीय महिलांचीही वर्णी लागली आहे. ही भारतासाठी खरच खूप अभिमानाची गोष्ट आहे. बीबीसीने जाहीर केलेल्या या यादीत त्या सर्व महिला आहेत ज्यांनी त्यांची त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे किंवा ते करत आहेत. या सर्व महिलांनी आपल्या आपल्या क्षेत्रात कठीण संघर्ष करून त्यांनी यश प्राप्त केलं आहे. या सर्व महिला वेगवेगळ्या क्षेत्रातील आहेत, यांतील काही शिक्षिका आहेत, काही खेळाडू, काही प्रभावी वक्त्या तर काही RJ आहेत. बीबीसी तर्फे येथे समजातील वेगवेगळ्या वर्गातील महिलांच्या सन्मान करण्यात येईल, त्यासोबतच महिलांसंबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा देखील केली जाईल.

या १०० महिलांच्या यादीत १० महिला या भारतीय आहेत, चला तर मग जाणून घेऊ कोण आहेत या १० महिला ज्यांनी त्यांच्या प्रभावशाली कर्तुत्वाच्या जोरावर जगातील १०० प्रभावशाली महिलांत आपले स्थान मिळविले…

१) यात भारतीय क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राज हिचे नाव आहे. यावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आईसीसी महिला विश्व कप स्पर्धेत भारतीय टीमला फायनलमध्ये पोहोचविण्यात मिताली राजचा सिंहाचा वाटा होता.

mithali-raj-marathipizza
brainfeedmagazine.com

२) याशिवाय दिल्लीच्या इरा त्रिवेदी, जी एक योगा टीचर, लेखिका आणि एक अॅक्टिविस्ट आहे.

ira trivedi-marathipizza
magnamags.com

३) तर IMBIBE च्या स्टार्टअपची फाउंडर अदिती अवस्थी यांचा देखील यात समावेश आहे.

aditi-avasthi-marathipizza
ankushtiwari.wordpress.com

४) तुलिका किरण, या एक शिक्षिका आहेत ज्या मागील ८ वर्षांपासून तिहार तुरुंगातील लहान मुलांना शिकविण्याचे काम करतात.

tulika_kiran-marathipizza

५) यात बॉलीवूडचे नावाजलेले अॅक्टर नावाजुद्दिन सिद्दिकी यांच्या आईचाही समावेश आहे. त्यांचे नाव मेहरुनिसा सिद्दिकी असून त्यांना एक होममेकर म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. हे पहिल्यांदाच होत आहे की इतक्या मोठ्या मंचावर एका होममेकरचं काम समजून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

mehrunisa_siddiqui-marathipizza
indiawest.com

६) डॉक्टर उर्वशी साहनी ज्या की एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांचही नाव या यादीत आहे. या महिलांच्या अधिकारांसाठी काम करतात.

dr_urvashi_sahni-marathipizza
YouTube

७) भारतीय-कॅनेडियन रुपी कौर ज्या एक लेखिका आणि Illustrator आहेत त्यांचही नाव या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे.

rupi_kaur-marathipizza
sbs.com.au

८) विराली मोदीचं नाव तर आपण सर्वांनीच ऐकल आहे, ही एक NRI असून ती Specially Abled लोकांसाठी काम करते. विराली स्वतः अप्नाग आहे, त्यामुळे या विषयावर तिची लडाई चालू आहे. भारतीय रेल्वेत अंपगांसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नसणे तसेच त्यांच्यासोबत झालेल्या छेडछाडीच्या घटनेवर विरालीने लिहिलेले पत्र कित्येक लोकांनी वाचले होते.

virali_modi-mrathipizza
storified.me

९) यात व्यवसाय विश्लेषक नित्या थुम्मालाचेट्टी यांचही नाव आहे, या न्यूयॉर्कच्या  हेल्थ केयर एनालिट्किस कंपनीमध्ये कार्यरत आहे.

nitya_thummalachetty-marathipizza
linkedin.com

१०) यात १६ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी प्रियांका रॉय हिचे नाव देखील सामील आहे.

priyanka-roy-marathipizza

या लिस्टमध्ये तुम्हाला अनेक अश्या महिलांची नावे मिळतील ज्यांच्याबद्दल तुम्ही कधी ऐकले देखील नसेल.

बीबीसीने निवडलेल्या या महिलांना ‘100 Women Challenge’ अंतर्गत काही मुद्दे, प्रॉब्लेम्स Stereotypes वर चर्चा करण्याची संधी मिळेल.

तरी या यादीत १० भारतीय महिलांची वर्णी लागणे हे भारतासाठी खरच अभिमानास्पद आहे… 

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?