' मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या ‘ह्या’ सुप्रसिद्ध वॉलपेपरची एकदम मजेदार गोष्ट..! – InMarathi

मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या ‘ह्या’ सुप्रसिद्ध वॉलपेपरची एकदम मजेदार गोष्ट..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कॉम्प्युटरचा वापर आपल्या कुणासाठीही नवीन नाही. त्यामुळेच विंडोज, हा आपल्यासाठी नेहमीचा आणि आपुलकीचा विषय आहे. विंडोज म्हटलं, की काही विशिष्ट गोष्टींची तुम्हाला आठवण येते का? करेक्ट… विंडोजचा वॉलपेपर, अर्थात कॉम्युटर चालू झाल्यावर आपल्याला दिसणारं एक अत्यंत सुंदर निसर्गचित्र !!

 

microsoft-wallpaper-marathipizza0

 

हा फोटो पाहून तुमच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील. कारण, सुमारे १९ वर्षापूर्वी म्हणजे २४ ऑगस्ट, २००१ मध्ये रिलीज झालेल्या मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज एक्सपीवर हा फोटो सर्वप्रथम पाहायला मिळाला होता.

मायक्रोसॉफ्टने याला डिफॉल्ट डेस्कटॉप इमेजवर सेट केल होतं. याच्यामागे एक कहाणी आहे, मात्र अनेक वर्षानंतरही या फोटोचे सत्य समोर आले नव्हते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज Xp वर हा फोटो येताच पॉपुलर झाला होता. अनेक दिवस या फोटोच्या ठिकाणाबाबत कन्फ्यूजन होते. सुरुवातीला हा फोटो फ्रान्स, इंग्लंड, स्विर्त्झलंड, न्यूझीलंडमधील नॉर्थ ओटागो, साउथ-वेस्टर्न वॉशिंग्टन आणि जर्मनीतील असल्याचे सांगितले गेले.

एवढेच नव्हे तर जर्मनीतील ‘डच लॅंग्वेज एडिशन’ च्या एनसायक्लोपीडियाने तर हा फोटो आर्यलंडचा असल्याचे सांगितले होते.

हा फोटो अमेरिकेतील फेमस फोटोग्राफर चार्ल्स ओ-रियरने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता.

 

microsoft-wallpaper-marathipizza02

 

जानेवारी १९९६ मध्ये चार्ल्स काही कामासाठी कॅलिफोर्नियाला चालले होते. या दरम्यान रस्त्यात त्यांना ‘सोनोमा कंट्री’ जवळ हा सुंदर नजारा दिसला. चार्ल्सजवळ त्या वेळी हाय रिजॉल्यूशनचा कॅमेरा नव्हता.

मात्र, ते आपल्याजवळ एक छोटा कॅमेरा नेहमी ठेवायचे. याच कॅमेऱ्याने त्यांनी सुंदर नजारा क्लिक केला. चार्ल्सने असे चार फोटोज काढले होते.

चार्ल्ससाठी या फोटो अगदीच किरकोळ होता. काही दिवसांनी त्यांनी हे फोटोज बिल गेट्सची इमेज लायसेंसिंग सर्विस ‘कोर्बिस’वर अपलोड केले. कंपनीच्या एका अधिकाऱ्याची नजर या फोटोजवर पडली आणि त्याला हे फोटो इतके पसंत आले की त्याने हे फोटोज सरळ बिल गेट्स यांच्याजवळ पाठवले.

कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांनी या फोटोजवरून डिस्कशन केले आणि ते फोटो सर्वांना पसंत पडले.

 

microsoft-wallpaper-marathipizza03

यानंतर हे फोटोज खरेदी करण्यासाठी कंपनीने चार्ल्स यांच्याशी संपर्क साधला. इतक्या मोठ्या कंपनीतून कॉल आल्यानंतर चार्ल्स खूपच खूष झाले आणि ते थेट कॅमेरा घेऊन कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहचले.

चार्ल्सच्या या फोटोजबाबत त्यांना मोठी रक्कम दिली गेली. मात्र, चार्ल्सने आतापर्यंत हा खुलासा केला नाही की, ही डील किती रुपयांना झाली होती.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने या फोटोला ‘bliss’ (आनंद देणारा) नाव दिले होते. कंपनीला फोटोमध्ये नेचर आणि लाईट कलर खूपच पसंत आले होते. कारण याच्या कलरवर आयकॉन सहज दिसून यायचे.

ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज Xp वर हा फोटो येताच तो जगभर गाजला. फोटो फेमस झाल्यानंतर २००२ मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने याचा वापर २०० मिलियन डॉलर अर्थात सुमारे १३०० कोटीच्या अॅड कॅंपेनसाठी केला होता.

चार्ल्स यांनी एका चॅनेलला दिलेल्या इंटरव्यूमध्ये या फोटोच्या लोकेशनचा खुलासा केला होता. यानंतर अनेक लोकांनी ‘सोनोमा कंट्री’ जाऊन असे फोटोज क्लिक करण्याचा प्रयत्न केला मात्र तसा नजारा नंतर कधीच दिसला नाही.

एवढेच नव्हे तर ‘पीसीवर्ल्ड’ चे सीनियर एडिटर मार्क हॅचमॅनने ८ एप्रिल, २०१४ रोजी पब्लिश केलेल्या आपल्या एका आर्टिकलमध्ये लिहले होते की,

ते स्वत: तेथे गेले होते, मात्र तसा नजारा पाहायला मिळाला नाही जो चार्ल्सने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता.

 

microsoft-wallpaper-marathipizza04

 

चार्ल्सचे हे नशिबच की, त्यांनी हिरव्या टेकडीवर निळयाशार आभाळाचा सुंदर नजारा पाहिला व तो अचूक टिपला आणि एक सुंदर आठवण जगाला मिळाली.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?