' एकही क्रिकेट मॅच तुम्ही चुकवत नाही? मग हे नवीन ‘नियम’ तुम्हाला माहित असायलाच हवे! – InMarathi

एकही क्रिकेट मॅच तुम्ही चुकवत नाही? मग हे नवीन ‘नियम’ तुम्हाला माहित असायलाच हवे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जगभरात लोकांना फुटबॉलनंतर कोणता खेळ आवडत असेल, तर तो क्रिकेट आहे. भारतात तर क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. भारतामध्ये क्रिकेटपेक्षा जास्त दुसरा कोणताच खेळ प्रसिद्ध नाही. भारतातील लोक क्रिकेटचा कोणताच सामना पाहिल्याशिवाय राहत नाही. धोनी, कोहली, सचिन, युवराज यांसारखे मोठमोठे दिग्गज क्रिकेट स्टार भारताला लाभले आहेत. क्रिकेटच्या नियमांविषयी तर तुम्हाला माहित असेलच, कारण क्रिकेटचे प्रेम हे भारतीय लोकांच्या नसानसात एवढे भिनले आहे की, क्रिकेट जगतातील सहसा बहुतेक गोष्टी लोकांना माहिती असतेच. ह्या ऑक्टोबरपासून क्रिकेटमधील काही नियमांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे, तसेच काही अन्य नवीन नियम देखील बनवण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया की, हे नियम नक्की कोणते आहेत आणि त्याचा क्रिकेटच्या खेळावर काय परिणाम होणार आहे…

या नियमांची माहिती आयसीसीचे जनरल मॅनेजर जेफ ऍलॉर्डिस यांनी ट्विटरवर दिली होती.

icc newrules1.marathipizza
१. बॅटच्या जाडीमध्ये बदल.

new rulesicc.marathipizza
amazonaws.com

या नियमाप्रमाणे बॅटच्या आकारामध्ये काही बदल करण्यात आलेला नाही, तो तसाच राहील. फक्त बॅटच्या जाडीमध्ये बदल करण्यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे. या नवीन नियमाप्रमाणे, यापुढे बॅटची रुंदी १०८ मिमी, खोली ६७ मिमी आणि किनार ४० मिमी असेल. यापेक्षा जास्त प्रमाण असलेल्या बॅट वापरण्यास मनाई आहे.

२. रन-आउटचा नवीन नियम

new rulesicc.marathipizza1
indianexpress.com

आयसीसी नवीन नियमाविषयी म्हणाली की, नवीन नियानुसार जर फलंदाजाची बॅट क्रिजच्या म्हणजेच रेषेच्या आता आली असेल व ती हवेत असेल आणि त्याचवेळी क्षेत्ररक्षकाने विकेट्स उडवल्या असल्यास फलंदाजाला धावचीत दिले जाणार नाही. तसेच, स्टम्पिंगला देखील हाच नियम लागू करण्यात आला आहे. जर फलंदाज रेषेच्या आता आला असेल आणि पाय हवेत असेल, तर तो फलंदाज आउट नसेल.
सीमेवरील झेल घेताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या फिल्डरला पहिल्यांदा चेंडूचा स्पर्श होणे गरजेचे आहे. त्यानंतर तो सीमेबाहेर गेला आणि परत येऊन झेल पकडला तरी देखील चालेल. पण चेंडूला स्पर्श न करता तो बाहेर गेला आणि झेल पकडल्यास त्या धावा दिल्या जातील.
जर चेंडू फलंदाजच्या हेल्मेटवर टप्पा पडल्यानंतर फलंदाज झेल बाद, स्टम्पिंग किंवा धावचीत झाल्यास तो फलंदाज बाद झाला आहे, असे मानले जाईल.

३. डिसिजन रिव्यू सिस्टम

new rulesicc.marathipizza2
newsapi.com

आताच्या नवीन नियमानुसार, अंपायर कॉलमुळे जर निर्णय लागला, तर टीम आपला रिव्यू गमावणार नाही. अंपायर कॉलने निर्णय झाल्यास त्या टीमला परत रिव्यू घेण्याची संधी मिळणार आहे आणि जोपर्यंत अंपायर कॉलने निर्णय होईल तोपर्यंत टीमला रिव्यू दिला जाईल.

४. नो- बॉल, बाइज आणि लेग बाइज

new rulesicc.marathipizza3
cricket.com

पहिल्यांदा फलंदाजापर्यंत चेंडू जाईपर्यंत चेंडूचे दोन-तीन टप्पे पडले, तरी चालत असतं. पण आता या नवीन नियमानुसार चेंडू हा एकाच टप्प्यामध्ये फलंदाजापर्यंत पाहोचला पाहिजे, एक टप्याच्यावर चेंडूचा टप्पा पडल्यास तो नो – बॉल दिला जाईल.
जर चेंडू पिचच्या बाहेर गेला किंवा क्षेत्ररक्षकाने त्याच्यामध्ये व्यत्यय आणला, तर अंपायर त्याला नो – बॉल देऊ शकतो.
बाय आणि लेग बाय हे जर नो – बॉलमध्ये घेतले गेले, तर ते वेगळे मोजले जातील. गोलंदाजाच्या खात्यामध्ये फक्त एक नो – बॉल दिला जाईल.

५. मैदानावरील शिस्त

new rulesicc.marathipizza4
cricket.com

आताच्या नवीन नियमानुसार, अंपायरना बेशिस्त वागणाऱ्या आणि बाचाबाची करणाऱ्या खेळाडूंना मैदानाबाहेर पाठवण्याचा अधिकार आहे.
या नियमाविषयी आयसीसीने म्हटले आहे की, पायरशी बाचाबाची करणे, अंपायरशी अयोग्य आणि मुद्दाम शारीरिक संपर्क करणे. खेळाडू किंवा इतर कोणत्याही व्यक्तीवर शारीरिक रूपाने हल्ला किंवा हिंसा करणे, अंपायरचे न ऐकणे हे यामुळे खेळाला गुन्ह्याचे स्वरूप येते. असे होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

असे हे आयसीसीचे नवीन नियम लागू झाले आहेत आणि त्यामुळे काही प्रमाणात क्रिकेटमध्ये बदल होण्याची संभावना आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?