' निसर्गाचा दुर्दैवी प्रकोप – लातूर भूकंपाबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी! – InMarathi

निसर्गाचा दुर्दैवी प्रकोप – लातूर भूकंपाबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेल्या काही वर्षामध्ये जगभरात भूकंप झाल्याच्या कितीतरी बातम्या आपल्या कानावर आल्या असतील. पण काही भूकंपामध्ये झालेली जीवितहानी कधीकधी मनाला चटका लावून जाते. त्यामधून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी खूप वेळ लागतो, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेल्या माणसांना त्यामधून बाहेर काढणे खूपच कठीण होऊन बसते.

देशभरातील सर्वात भयानक भूकंपापैकी एक म्हणजे, ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाराष्ट्राच्या लातूरमध्ये झालेला भूकंप. या भूकंपामध्ये ५२ गावे उद्ध्वस्त झाली होती. या भूकंपात १० हजार लोक मारले गेले आणि ३० हजार लोक जखमी झाली होती.

या भूकंपाला एवढी वर्ष झाली, तरीदेखील त्याची आठवण काढल्यावर लोकांच्या डोळ्यांमध्ये पाणी उभे राहते. आज आपण ह्या भूकंपाबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

 

earthquake inmarathi
newindianexpress.com

 

१. किल्लारी हा या भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि या भूकंपामुळे एक मोठा खड्डा तयार झाला होता, जो अजूनही अस्तित्वात आहे.

२. या भूकंपाने प्रामुख्याने लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे प्रभावित झाली होती. या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांची संख्या लक्षात घेता, मृतांची आणि जखमींची संख्या खूप जास्त होती, कारण लातूर हे त्याच्या घनतेसाठी प्रसिद्ध आहे.

सकाळी ३ वाजून ५६ मिनटांच्या सुमारास हा भूकंपाचा हादरा येथील प्रदेशाला बसला. लातूर आणि आसपासच्या परिसरातील गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला गेला नव्हता.

अचानक घडलेल्या प्रसंगामुळे या गावातील लोकांनी आपली घरे सोडण्यासाठी एकच धावपळ सुरु केली आणि त्यातच धक्काबुक्कीमध्ये फक्त १० किलोमीटरच्या या परिसरात खूप नुकसान झाले.

 

latur earthquake inmarathi
the financial express

 

३. हेडलाईन्सवर भूकंपाची बातमी येताच काही विदेशी आणि स्थानिक देणगीदारांनी मदत पाठवली, तसेच रेस्क्यू टीमला पाठवले. विदेशी देणगीदारांनी १२० ट्रक भरून तंबू, चादरी, अन्न, वस्त्र आणि वैद्यकीय सुविधा तसेच तात्पुरत्या आश्रयासाठी लागणारे सामान पाठवले.

किती नुकसान झाले आहे, याचा योग्य अंदाज लावल्यानंतर जागतिक बँकेने लातूरच्या पुनर्बांधणीसाठी लागणाऱ्या मदतीचा प्रस्ताव दिला होता.

४. भारतीय लष्कर, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था यांच्याकडून लगेच बचावकार्य सुरु करण्यात आले.

थोड्याच कालावधीमध्ये ४६.५५ लाख रुपये शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात आले, तसेच २९९ जणांना गुरे देण्यात आली, जी त्यांनी या भूकंपामध्ये गमावली होती.

 

latur earthquake.marathipizza
trendingtopmost.com

 

५. हैदराबाद आणि मुंबईमधील काही रेडीओ पत्रकारांनी सर्वप्रथम हि बातमी जगासमोर आणली. ते ताबडतोब लातूरजवळ एक छोटे गाव असलेल्या ओमारगा येथे पोहोचले, तिथून ते भूकंपग्रस्त भागामध्ये रस्ता मार्गाने पोहोचले. मुंबईस्थित जेएनए वायरलेस असोसिएशनने एक विशेष मोहीम राबवली.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने वस्तूंच्या पुरवठ्याच्या उद्देशाने मुंबईतील ८ रेडीओ ग्रुपबरोबर चारचाकी वाहने लातूरला पाठवली.

त्यानंतर रेडीओ ऑपरेटर चार गटांमध्ये विभागले गेले आणि त्यांनी भूकंपग्रस्तांची संभाव्य वाढ, अन्नधान्याचा पुरवठा आणि झालेली नासधूस यांसारख्या महत्त्वपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी अनेक गावांना भेट दिली.

६. लातूरमध्ये झालेल्या भूकंपानंतरच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापित करण्यात आले होते.

latur earthquake.marathipizza23jpg
jobsinfinit.com

 

असा हा लातूरचा भूकंप महाराष्ट्र किंवा भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवणारा भूकंप होता. भारताला आणि महाराष्ट्राला या संकटामधून बाहेर काढण्यासाठी जागतिक पातळीवरून देखील विविध मदत करण्यात आली होती.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?