' ५ नोकऱ्या - कमी शिक्षण पात्रता असली तरीही भरपूर पगार मिळणार...

५ नोकऱ्या – कमी शिक्षण पात्रता असली तरीही भरपूर पगार मिळणार…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

सध्याच्या काळात जॉब शोधण्यासाठी कितीतरी कष्ट करावे लागतात. तरीदेखील लोकांना मनासारखा जॉब काही मिळत नाही. प्रत्येक जॉबच्या ठिकाणी काही न काही समस्या ही असतेच.

पण पोटासाठी आणि आपली नोकरी टिकवून ठेवण्यासाठी लोक या समस्यांकडे दुर्लक्ष करतात.

सध्या कितीही शिकलो आणि कितीही मोठी पदवी मिळवली, तरी पण त्या पदवीनुसार तेवढ्या पगाराची आणि तेवढ्या दर्जाची नोकरी मिळणे खूपच कठीण होऊन बसले आहे.

 

 

आपल्या सभोवताली आपण अशी कितीतरी माणसे पाहतो, ज्यांनी खूप मोठमोठ्या पदव्या घेतल्या आहेत, पण त्यांना साधी नोकरी मिळवण्यासाठी देखील खूप कष्ट करावे लागतात.

पण कधी – कधी अशा लोकांवर मनासारखी नोकरी न मिळाल्यामुळे बेरोजगार होण्याची मोठी समस्या उद्भवते. पण आज आम्ही तुम्हाला जगभरातील काही असे जॉब सांगणार आहोत, जिथे उच्च पदवीची गरज भासत नाही आणि पगारही खूप चांगला मिळतो.

हे ही वाचा –

===

१. एअर ट्राफिक कंट्रोलर्स :

 

atc inmarathi

 

एअर ट्रॅफिक कंट्रोलर होण्यासाठी, आपल्याला कोणत्याही मोठ्या पदवीची आवश्यकता नाही.

फक्त एक सहयोगी पदवी मागितली जाते आणि या कामासाठी वार्षिक वेतन १२२४१० डॉलर म्हणजेच ७९ लाख ९१ हजार रुपये असते.

विमानाच्या हालचालीवर देखरेख ठेवणे आणि त्यांना निर्देशित करणे, ही एअर ट्राफिक कंट्रोलर्सची कामे असतात.

 

२. न्यूक्लिअर पॉवर रिऍक्टर ऑपरेटर :

 

max sal min edu.marathipizza1

 

न्यूक्लिअर पॉवर रिऍक्टर ऑपरेटर होण्यासाठी, आवश्यक पात्रता ही हायस्कूल डिप्लोमा किंवा त्याच्याशी समतुल्य अशी पदवी पाहिजे. पण या कामाचे वार्षिक वेतन ९११७० डॉलर म्हणजेच ५८.५० लाख एवढे आहे.

या न्यूक्लिअर रिऍक्टर चालवण्यासाठी किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला तेवढे सक्षम असणे, तेवढेच गरजेचे आहे.

हे काम करणाऱ्या लोकांच्या न्यूक्लिअर उपकरणे चालवणे आणि थांबवणे, तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे ह्या जबाबदाऱ्या असतात.

 

३. वीज वितरक आणि प्रेषक :

 

max sal min edu.marathipizza2

 

या कामामध्ये विद्युत किंवा वाफेचे समन्वय, नियमन किंवा वितरणाची जबाबदारी असते.

या नोकरीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता केवळ हायस्कूल डिप्लोमा किंवा त्याच्याशी समतुल्य अशी पदवी पाहिजे. या कामाचे वार्षिक वेतन ८१००० डॉलर म्हणजेच ५२.५० लाख रुपये मिळते.

 

४. रेडिएशन थेरपिस्ट

 

radiation therapy inmarathi

 

जर आपले निरीक्षण चांगले असेल, तर आपण या कामासाठी सर्वोत्तम आहात.

ही नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला फक्त सहयोगी पात्रतेची आवश्यकता आहे. यामध्ये उपकरणे तपासणे, उपचारांवर रुग्णांची प्रतिक्रिया तपासणे आणि डॉक्युमेंट चेक करणे या जबाबदाऱ्या असतात.

या कामासाठी वार्षिक वेतन ८०१६० डॉलर्स म्हणजेच जवळपास ५१.५० लाख रुपये दिले जाते.

 

५. एलेव्हटर इंस्टॉलर आणि रिपेयरर्स :

 

elevators repairers inmarathi

हे ही वाचा –

===

 

या नोकरीसाठी शालेय शिक्षण पूर्ण झालेले पाहिजे किंवा त्याबद्दलचे काही तत्सम शिक्षण घेतलेले पाहिजे. यामध्ये सरासरी वार्षिक वेतन ७८८९० डॉलर म्हणजेच ५०.५० लाख रुपये मिळते.

पण लक्षात घ्या की, भारतामध्ये हेच काम करणाऱ्या लोकांना एवढे वेतन दिले जात नाही.

या कामामध्ये प्रवासी आणि समान देण्यासाठी बनवल्या गेलेल्या इलेक्ट्रिक आणि हायड्रॉलिकव्हेटर लिफ्ट्स, एस्केलेटर बसवण्याचे, दुरुस्ती करण्याचे आणि देखरेख करण्याची जबाबदारी असते.

 

६. गुप्तहेर आणि गुन्हेगारी तपासक :

 

max sal min edu.marathipizza5

 

पोलिसांसाठी एक गुप्तहेर म्हणून काम करायचे असल्यास, तुम्ही उच्च शिक्षित असणे गरजेचे आहे, तसेच त्याबद्दलचे पुरते ज्ञान देखील असायला हवे.

पण तुम्हाला खासगी गुप्तहेर बनायचे असल्यास, या नोकरीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता केवळ हायस्कूल डिप्लोमा किंवा त्याच्याशी समतुल्य अशी पदवी पाहिजे.

या कामामध्ये वार्षिक वेतन ७८१२० डॉलर म्हणजेच जवळपास ५० लाख रुपये मिळते. या कामासाठी तुमचे कायद्याचे ज्ञान चांगले असणे आणि निरक्षण शक्ती उत्तम असणे गरजेचे आहे.

 

७. व्यावसायिक पायलट :

 

max sal min edu.marathipizza6

 

तुम्हाला व्यावसायिक पायलट बनण्यासाठी तुमच्याकडे बॅचलरची पदवी असणे आवश्यक नाही. गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र याविषयांसहित बारावी झालेली पाहिजे.

व्यावसायिक पायलट ही प्राथमिक शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर एक व्यावसायिक पायलट परवाना (सीपीएल) बनवावा लागतो.

त्यांचे वार्षिक वेतन ७७२०० डॉलर म्हणजेच जवळपास ४९.५० लाख रुपये असते.

 

८. गेमिंग मॅनेजर :

 

max sal min edu.marathipizza7

 

कॅसिनोमध्ये असलेल्या एका गेमिंग मॅनेजरला या कामासाठी वार्षिक वेतन ६९१८० डॉलर म्हणजेच जवळपास ४४.२५ लाख रुपये मिळतात.

या कामासाठी फक्त शालेय शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे किंवा त्याच्याशी समतुल्य अशी पदवी पाहिजे.

यामध्ये तुम्ही कॅसिनोमधील गेम्ससाठी उत्तम योजना आखणे, लोकांना त्याबद्दल मार्गदर्शन करणे आणि समन्वय साधण्यास सक्षम असणे गरजेचे आहे.

अश्या या नोकऱ्यांमध्ये कमी शैक्षणिक पात्रता असूनदेखील चांगले वेतन मिळवू शकता. अडचण इतकीच आहे की आपल्या भारतामध्ये अश्या नोकऱ्यांना एवढा पगार दिला जात नाही. परंतु हे सर्व नोकऱ्यांचे उत्तम पर्याय आहेत हे मात्र खरं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “५ नोकऱ्या – कमी शिक्षण पात्रता असली तरीही भरपूर पगार मिळणार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?