ऑलिम्पिक सुवर्ण पदकाचं रहस्य

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

==

वर्षानुवर्षे तपस्या आणि मेहनत करून ऑलम्पिकमध्ये जाऊन शानदार कामगिरी करत मेडल मिळवणाऱ्यांचा काय अभिमान असतो ना आपल्याला! खरं तर सुवर्ण-पदक हे फक्त चिन्ह आहे, तुम्ही ‘सर्वश्रेष्ठ’ असल्याचं. पण ते जाडजूड, भलंमोठं पदक “सोन्याचं” असतं, हे त्या पदकाबद्द्ल वाटणाऱ्या कुतुहला मागचं मोठं कारण असतंच.

 

rio-2016-gold-medal-marathipizza

स्त्रोत

पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल – ज्या गोल्ड मेडलसाठी जीवाचा इतका आटापिटा केला जातो ते गोल्ड मेडल “pure” नसतं, मिश्रित (भेसळ केलेलं) असतं! म्हणजेच ते शुद्ध सोन्याचं नसतं.
१९६८ च्या मॅक्सिकन ऑलम्पिक गेम्सच्या प्रत्येक मेडलचा आकार ६.५ मिली मीटर इतका मोठा असून रुंदी ६५.८ मिली मीटर होता. तर त्यांचे वजन १७६.५ ग्राम होते.

२०१२ च्या लंडन ऑलम्पिक गेम्सच्या मेडलचे वजन ३७५ ते ४०० ग्राम इतके होते.

 

london olympic marathipizza

स्त्रोत

ऑलम्पिकमध्ये विजयी स्पर्धकास देण्यात येणाऱ्या गोल्ड मेडलचा विचार केल्यास त्यामध्ये कमीत कमी ६ ग्राम (२४ कॅरेट) सोन्याचं प्रमाण असावं तर ९२.५ ग्राम चांदी आणि तांब्याचे मिश्रण असावे – असे संकेत आहेत.

त्यानुसार सुवर्ण पदकाची, बाजारभावानुसार जवळपास २४,४६७ – ३३, ४९१ रुपये इतकी किंमत भरेल.

नुकत्याच पार पडलेल्या रिओ ऑलिम्पिक पदकांचं एक वैशिष्ट्य असं होतं की सर्व पदकांमध्ये काही प्रमाणात इलेक्ट्रिक वस्तूंचा कचरा recycle करून वापरला गेला होता.

forbs.com वेबसाईटने ऑलिम्पिक सुवर्णपदकांची अशी माहिती देणारं एक छानसं info-graphic बनवलंय.

त्यावरून आणखी चांगली कल्पना येईल –

olympic-medals-marathipizza

 

अर्थात, मेडल शुध्द सोन्याचं नसलं तरी काय झालं, गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूच्या कारकीर्दीमधील त्या विजयी सोनेरी क्षणाची किंमत मात्र काही केल्या कमी होत नाही.

त्या खेळाडूला गोल्ड मेडल मिळालेलं पाहून एक देशवासीय म्हणून आपल्याला होणारा अभिमान आणि वाटणारा आनंद, त्या खेळाडूसाठी लाखमोलाचा असतो…!

जाताजाता…

गोल्ड मेडल खरोखरंच पूर्णत: शुद्ध सोन्याचं असतं तर त्याची किंमत काय असती?

आजच्या बाजारभावानुसार – तब्बल ५०, ८०, ५९६ रुपये…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 54 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?