' सर्व जीवनमूल्यांनी परीपूर्ण असे ‘सीताफळ’ : आहारावर बोलू काही – भाग १० – InMarathi

सर्व जीवनमूल्यांनी परीपूर्ण असे ‘सीताफळ’ : आहारावर बोलू काही – भाग १०

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील भागाची लिंक : अगदीच सहज उपलब्ध होणारी बहुगुणी ‘पपई’ : आहारावर बोलू काही – भाग ९

===

सिताफळ

custard-apple-marathipizza01
shoprolls.com

सिताफळ हे अबालवृद्धांना आवडणारे व हिवाळ्यात मिळणारे फळ सिताफळ ही सर्व जीवनमुल्यांनी परीपुर्ण आहे.

custard-apple-marathipizza04

 

आधुनिकदृष्ट्या सिताफळ हे अत्यंत ऊपयुक्त सांगितले आहे.

1) चयापचय क्रिया वाढवुन वजन वाढवण्यास ऊपयुक्त ठरते.

2 )vit.c चे प्रमाण अधिक असल्याने रोगप्रतिकारक्षमता वाढवते.

3) अत्यंत स्फुर्तिदायक फळ आहे.

4) बुंध्याची सालीमध्ये astringent properties असतात. ज्या कर्करोगावरील बर्याच औषधीमध्ये ऊपयुक्त ठरतात.

5) b-complexचा हा स्त्रोत असल्यामुळे मेंदुतील GABA nuron च्या chemical level नियंत्रीत करतात. यामुळे ताण, तणाव, अस्वस्थता, नैराश्य नाहीसे होते.

6) सिताफळाची त्वचा दात व हिरड्यांच्या वेदनेचे शमन करतात.

7) लोहतत्व भरपुर प्रमाणात असल्याने anaemia मध्ये ऊपयुक्त ठरते.

8) Riboflavin व vit.C अधिक असल्याने दृष्टी चांगली राहते.

9) magnessiumचे प्रमाण अधिक असल्याने  आमवात(rhumatoid arthritis) मध्ये ऊपयुक्त ठरते.

10) pregnancyमध्ये हे अत्यंत ऊपयुक्त फळ आहे.

custard-apple-marathipizza02
jamnagarmart.com

सिताफळ सेवनामुळे

• गर्भची त्वचा व केस मुलायम होते.

• Copper ची मात्रा भरपुर असल्याने मुदतपुर्व प्रसुती (premature labor) ची शक्यता कमी होते. कारण copper ची कमतरता premature birth ला कारणीभुत ठरते.

• गर्भाच्या बौद्धिक विकासासाठी ऊपयुक्त ठरते.

• लोहतत्व मुबलक असल्याने pregnancy मध्ये ऊपयुक्त ठरते.

आता आयुर्वेदीय दृष्टीकोन पाहुया.

चवीला गोड असणारे हे फळ शीत गुणात्मक सांगितले आहे. मात्र याची बीजे ऊष्ण गुणात्मक सांगीतली आहेत. हे वात व पित्ताचे शमन करणारे असुन कफ दोषाचे वर्धन करणारे आहे.

custard-apple-marathipizza03
4.bp.blogspot.com

• सिताफळाचा गर हा सौम्य विरेचक (mild laxative) असतो.
• सिताफळाची पाने व बीया कृमीघ्न (Anti helmenthic) सांगीतली आहेत.
• तसेच ही पाने शुलप्रशमक (anti spasmodic) आहेत.
• बुंध्याची साल ही व्रण बरे करण्यास मदत करते.
• सिताफळाचे ‘आसव’ वर्षभर घेतल्यास पचनाच्या व्याधी नाहीशा होतात.
• सिताफळाच्या बीयांमध्ये गर्भपात जनक गुणधर्म असतात. त्यामुळे त्या टाळाव्यात.

अशाप्रकारे सिताफळ हे दोन्ही शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत ऊपयुक्त फळ आहे व ऋतुपरत्वे त्याचे नक्की सेवन करावे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?