शिव कर्माचे हे ७ नियम तुमच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवू शकतात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

हिंदू धर्म हा जगातील एक श्रेष्ठ धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये देवतांचे महत्त्व खूप जास्त आहे. हिंदू धर्माच्या लोकांच्या मनामध्ये तुम्हाला या देवतांविषयी आदर नेहमीच अनुभवयाला मिळेल. याच हिंदू धर्मामध्ये भगवान शंकर हे एक श्रेष्ठ दैवत मानले जातात.

पौराणिक कथेनुसार ब्रम्हा, विष्णू आणि महेश ह्या तीन देवांनी संपूर्ण ब्रम्हांडाची निर्मिती केली आहे, असे मानले जाते. या तिघांचीच अवतारे आपल्याला इतर देवांमध्ये पाहण्यास मिळतात.

 

bramha, vishnu, mahesh InMarathi

 

त्यामधील महेश म्हणजेच भगवान शंकर हे आहेत. महेशा, भोलेनाथ, ओमकारा, रुद्रा अशा वेगवेगळ्या नावाने त्यांना ओळखले जाते. भगवान शंकर खूप रुद्र आणि रागीट असले तरी आपल्या भक्तांवर ते तितकेच प्रेम देखील करतात अशी त्यांची महती!

shiv bhagavn InMarathi

आकाश विजयवर्गीय हे एक प्रसिद्ध लेखक आहेत, त्यांनी शिवपुराणाचा गाढा अभ्यास करून शिव धर्म नेमका काय ते समजून घेतले. अभ्यास केला तेव्हा त्यांना शिव कर्माच्या नियमांविषयी उमगले, त्यानंतर त्यांनी हे नियम त्यांच्या ‘देव से महादेव’ या पुस्तकातून जगापुढे मांडले आहेत. त्यांच्या मते ह्या नियामांचे आचारण केल्यास तुम्ही तुमचे जीवन बदलू शकता.

१. सत्य

 

shiva 1 InMarathi

शिव कर्माचा पहिला नियम खऱ्याची साथ देणे हा आहे. या नियमानुसार शंकर देवांनी आपल्या अनुयायांना सांगितले आहे की, तुम्ही नेहमी सत्याचा आणि न्यायाचा मार्ग निवडा. तसेच आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना देखील सत्याच्या मार्गावर चालण्यास सांगा.

कारण अप्रामाणिकपणे आणि खोटे बोलून लहान गोष्टी जिंकता येतात, पण मोठ्या युद्धामध्ये नेहमी सत्यच जिंकते.

२. ज्ञान ही देवता आहे.

 

shiva 4 InMarathi

 

एका व्यक्तीला सर्वच गोष्टींचे ज्ञान असू शकत नाही, पण प्रत्येकाला काही न काही ज्ञान अवगत असते. आपण स्वतः नेहमी नवनवीन ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतरांपर्यंत आपले ज्ञान पोहोचवले पाहिजे.

३. सर्वकाही आभास आहे.

 

shiva 5 InMarathi

तुम्ही तुमचेे जीवन कसे जगत आहात आणि कोणत्या ठिकाणी राहत आहात, यावर तुमचे सुख अवलंबून नसते. जर तुमचे सुख भौतिक गोष्टींवर अवलंबून असेल, तर तो आनंद तुमच्यासाठी भ्रम आहे, कारण त्या गोष्टी कधी निघून जातील याचा तुम्हाला अंदाज देखील लागणार नाही आणि तुमचा आनंद मावळून जाईल.

त्यासाठी शिव कर्माचा तिसरा नियम सांगतो की, तुम्ही कधीही पृथ्वीवरील कोणत्याही गोष्टींमध्ये तुमचा आनंद शोधू नका.

४. आनंदाच्या पलीकडे

shiva 6 InMarathi

आपण ज्या जगामध्ये राहत आहोत, त्या जगतात प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ बघत आहे. प्रत्येकजण हा स्वतःच्या आनंदासाठी चिंतित आहे, त्यामुळे आपल्या भोवतालचे लोक आनंदी आहेत की नाहीत याची त्याला काहीही काळजी नाही.

पण खरा आनंद हा त्या पलीकडे आहे, असे शिव कर्माच्या चौथ्या नियमामध्ये सांगितले गेले आहे. स्व साक्षात्कार हेच तुम्हाला खरा आनंद मिळवून देईल, म्हणून लक्षात ठेवा की, आनंद बाहेर शोधण्यापेक्षा तो स्वत:मध्ये शोधा. त्यामुळे तुमचे जीवन सुखमय होईल.

५. निराकार व्हा

 

shiva 7 InMarathi

 

जर आपण आपल्या आजूबाजूला आनंदी व्यक्ती पाहिली असेल, तर तुम्हाला लक्षात येईल की, त्यांना कोणत्याही प्रकारचा भ्रम नियंत्रित करत नसतो. आपण त्यांना कोणत्याही भागामध्ये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ठेवले तरीदेखील ते समाधानीच असतात. तर शिव कर्माचा पाचवा नियम हे सांगतो की, तुम्ही पाण्यासारखे शांत आणि निराकार व्हा.

६. आपल्या सर्व भावनांचा वापर करा.

 

shiva 8 InMarathi

जेव्हा मन आणि हृद्य शांत असते आणि आपण आत्म-पूर्ततेच्या मार्गावर चालत असतो, तेव्हा आपल्या सर्व संवेदना एकत्रित काम करण्यासाठी संक्रमित होतात. त्यावेळी आपण प्राप्त केलेले भौतिक सुख हे अतुलनीय असते. असे शिव कर्माच्या सहाव्या नियमामध्ये सांगितले गेले आहे.

७. स्वतःचा साक्षात्कार होणे.

 

shiva 9 InMarathi

शिव कर्माच्या सातव्या नियमानुसार, आपल्याला स्वतःचा साक्षात्कार होण्यासाठी म्हणजेच आपण काय आहोत हे समजण्यासाठी व अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला वास्तविकतेचे भान असणे गरजेचे आहे. तसेच आपण मन शांत ठेवणे गरजेचे आहे. साक्षात्कार ही शिव कर्माची अंतिम स्थिती आहे आणि ती आपण घरगुती जीवनाचा त्याग न करता देखील मिळवू शकतो.

असे हे शिव कर्माचे नियम तुमच्या जीवनाला एक वेगळे वळण देण्यासाठी, खूप महत्त्वाचे ठरू शकतात.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?