' अविश्वसनीय…….! एक अशी इमारत ज्यात संपूर्ण शहर वसतं ! – InMarathi

अविश्वसनीय…….! एक अशी इमारत ज्यात संपूर्ण शहर वसतं !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०१६च्या जणगणनेनुसार भारताची लोकसंख्या १ अब्ज २१ कोटी एवढी आहे. तर आपल्या एकट्या मुंबईची लोकसंख्या ही सुमारे ३ कोटी २९ लक्ष एवढी आहे. जस जसे दिवस जात आहेत भारताची लोकसंख्या वाढते आहे आणि त्यातूनच आपल्या देशांत वसाहतींची संख्याही वाढते आहे. आता मला सांगा काय तुमचं संपूर्ण शहर एकाच इमारतीत राहू शकत… तुम्ही म्हणालं काय वेड्यासारखा प्रश्न आहे हा. हे कसं काय शक्य आहे. अहो पण हे अशक्य नाही आहे. आता तुम्ही म्हणालं ते कस बरं… कसं काय एका शहराची संपूर्ण लोकसंख्या एका इमारतीत नांदू शकते?

begich tower02-marathipizza
wikimapia.org

तर जगात असं एक ठिकाण आहे जिथली संपूर्ण लोकसंख्या केवळ एका इमारतीत राहते. ते ठिकाण म्हणजे अमेरिकेतील ‘व्हिटियर’. अमेरिकेतील उत्तरेकडील अलास्का येथे एक छोटसं शहर आहे व्हिटियर… जे इथली एकमेव वसाहत आणि व्यवस्थेकरिता खूप प्रसिद्ध आहे. व्हिटियर या शहरात केवळ एकच १४ मजल्याची इमारत  आहे, जिला ‘बेगिच टॉवर’ म्हणून ओळखतात. येथे ही एकच इमारत असल्या कारणाने याला वर्टीकल टाउन देखील म्हणतात.

begich tower05-marathipizza
interesting.com

या एकमात्र इमारतीत २०० कुटुंब वास्तव्यास आहेत. या शहरात याचं लोकांची वसाहत आहे. शीतयुद्धाच्या दरम्यान ही इमारत सेनेचे Barrack म्हणजेच सेनेचे निवासस्थान असायची. जिथली कितीतरी रहस्यमयी गोष्टी अजूनही अज्ञातच आहेत.

या इमारतीची विशेषता म्हणजे, इथे केवळ लोकच नाही राहत तर त्याचं संपूर्ण शहर यात वसते. त्यांच्या गरजेची प्रत्येक वस्तू त्यांना येथे उपलब्ध आहे. या इमारतीत, पोलीस स्टेशन, स्वास्थ्य सेवा केंद्र, प्रोव्हिजन स्टोर, लॉन्ड्री इत्यादी सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. या इमारतीच्या तळ मजल्यावर चर्च देखील आहे.

begich tower03-marathipizza
dailymail.com

विशेष म्हणजे येथे लहान-मोठ्यांचा, गरीब-श्रीमंत हा भेदभाव नाहीसा झालेला दिसतो, कारण येथे काम करणारे कर्मचारी आणि मालक एकाच ठिकाणी राहतात. यामुळे या इमारतीला इतर इमारतींपेक्षा जास्त सोयीस्कर बनविण्यात आले आहे.

 

begich tower01-marathipizza
weburbanist.com

इथे राहणाऱ्या लहान मुलांसाठी या इमारतीच्या मागेच एक शाळा आणि प्ले स्कूल बनविण्यात आली आहे, जिथे जाण्याकरिता एल भुयारी मार्ग आहे. त्यामुळे येथील मुलांना व्हिटीयरच्या कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत नाही.

येथे राहणाऱ्या लोकांची व्यवस्था भलेही आपल्यासाठी असामान्य आहे. पण, इथल्या लोकांची जीवन जगण्याची शैलीही आपल्यापेक्षा वेगळी आहे. इथे बाहेरील वातावरण जास्तकरून खराब असत, त्यामुळे लोकं नियमितपणे कुठे ये-जा करू शकत नाही. एवढचनाही रस्तामार्गे या शहरापर्यंत पोहोचणे देखील खूप कठीण आहे, कारण या शहराला इतर शहरांशी जोडणारा कुठलाही सरळ रस्ता नाही. पहाडी बोगदा आणि कठीण रस्तामार्गे येथे पोहोचत येते. तर समुद्रीमार्ग यासाठीचा दुसरा आणि  सोपा पर्याय आहे. म्हणण्यासाठी तर हा एक छोटसं टाऊन आहे पण शिपिंग व्यवसायामुळे याच खूप नाव आहे.

काय मग आहे न भन्नाट… श्रीमंती आणि गरिबीच्या बेद्भावाखाली रुजलेल्या आपल्या सारख्यांसाठी समानता काय असते याच हे एक उत्तम उदाहरण आहे. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?