अपयशातून उभा राहिलेला पाण्यातला फिनिक्स – मायकेल फेल्प्स

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मायकेल फेल्प्स, जलतरणपटू, अमेरिका

काही आठवतंय का?

२००८ चं ऑलंपिक? सलग आठ गोल्ड मेडल पटकावून विक्रम करणारा ‘मासा’

 

Michael-Phelps-8

 

एका जागतिक किर्तीच्या खेळाडूला अजून काय हवं असतं? मान मरातब, मोठा fan club, उच्च राहणीमान

हे सगळं यशासोबत येतंच आणि आलंच. अख्खं जग जिंकल्यावर राहतंय काय एका खेळाडूसाठी?

२०१२ च्या लंडन ऑलंपिक नंतर सर्वोत्तम जलतरणपटू म्हणून मायकेल निवृत्त झाला. मायकेल खुश होता, त्याच्या Swimming सोडून मित्रांची गर्दी वाढत होती आणि त्याने त्याच्या कोच आणि स्विमिंगपासून स्वतःला लांब केलं.

 

MP suits

 

एके दिवशी एका पार्टीमधून घरी परतत असतांना मायकेल ची गाडी पोलिसांनी पकडली आणि चाचणीत त्याने ‘अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली गाडी चालवल्याचे’ आढळले. पोलिसांनी कारवाई केली. सगळ्या कारकीर्दीवर एक डाग लागला, तो ही न पुसता येणारा.

निराश झालेला मायकेल म्हणतो,

 

नंतर कित्येक दिवस मी माझ्या बाल्टिमोर च्या घरात बसून होतो. जेवण नाही, झोप नाही, कुणाशी संपर्क नाही. मी विचार करायचो की एवढा त्रास देऊन, चाहत्यांना निराश करून जगण्यात काय मजा आहे? ह्यापेक्षा आयुष्य संपवणं बरं.

 

पण ह्या निराशेच्या क्षणी मायकेलला त्याच्या जुन्या मित्राने, बाल्टीमोरच्या हिरो – रे लुईस – ने समजावलं :

 

हे बघ माईक, हीच ती वेळ आहे जेव्हा आपण लढतो! असा हारून नको जाऊ. तू हरलास तर ती आमची पण हार आहे. तुला असं वाटतंय का की सगळं उध्वस्त झालंय? मी दाखवतो नेमकं उध्वस्त होणे म्हणजे काय असतं ते. (मग मला माझ्या भूतकाळाचा वापर करून त्याला समजवावं लागलं)

 

Rey

 

ह्या शब्दांनी जादू केली. नंतर मायकेल Rehabilitation center मध्ये गेला.

 

४५ दिवसांनी तिथून “clean” होऊन बाहेर पडला. तिथे त्याला सोबत केली एका छोट्याश्या स्विमिंगपूलने आणि रे ने दिलेल्या एका पुस्तकाने, The Purpose Driven Life. त्या पुस्तकाने मायकेल ला मदत झाली तेव्हा, जेव्हा त्याला खूप गरज होती.

 

MP REhab

 

नोव्हेंबर २०१४ मध्ये मायकेलची ट्रेनिंग सुरु झाली. आणि मायकेल त्याच्या आयुष्यातल्या ५ व्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला. त्याने एखाद्या देशाच्या बेरजेपेक्षाही जास्त पदक मिळवून सुवर्णपदकांचा विश्वविक्रम बनवला.

 

MP rio 2016

 

शेवटी ह्या प्रवासाबद्दल बोलतांना तो म्हणतो :

जेव्हा मी आयुष्यात शेवटच्या वेळी स्विमिंग सूट बाजूला ठेवेन, रेकॉर्ड्स, मेडल्स बाजूला ठेवेन तेव्हा मी आत्मविश्वासाने एवढं म्हणू शकेन की मला जे करायचं होतं ते सगळं मी केलं. मी ह्या खेळाच्या प्रेमात पडलो कारण माझ्या आई ने मला Water Safety मध्ये टाकलं. बघा त्याचं रुपांतर कश्यात झालंय. माझ्यासाठी माझं करिअर म्हणजे असंय जे मी जगलो आणि शेवटी तेच महत्वाचं असतं.

मायकेलच्या आजतागायत रेकॉर्डस् चा स्नॅपशॉट :

michael phelps marathipizza

 

मायकेल काय “चीज” आहे हे जाणून घेण्यासाठी हा छोटासा व्हिडीओ नक्की बघा :

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 50 posts and counting.See all posts by abhidnya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?