' महागडे कपडे, वस्तू वापरण्यापेक्षा ‘या’ गोष्टी करून लोकांना impress करा! लोक तुम्हाला लक्षात ठेवतील! – InMarathi

महागडे कपडे, वस्तू वापरण्यापेक्षा ‘या’ गोष्टी करून लोकांना impress करा! लोक तुम्हाला लक्षात ठेवतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लोकांनी आपल्याशी बोलावं, आपल्याला आदर द्यावा हे प्रत्येकालाच वाटत असतं, पण हे देखील खरे आहे की लोक उगाचच कोणाला मान वा आदर देत नाहीत, त्यांच्यावर तुमची छाप पडायला हवी, तुमच्या वागण्याने, बोलण्याने ते प्रभावित झाले तरच तुम्ही लोकांमध्ये प्रसिद्ध व्हालं.

आता तुम्ही विचार करत असाल की लोकांवर छाप पाडायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे सुंदर, सुंदर कपडे, महागड्या/ब्रांडेड वस्तू घालून मिरवणे. पण मंडळी हा मार्ग दीर्घकालीन नाही.

कारण बऱ्याचदा होतं काय की तुम्ही लोकांना प्रभावित करण्यासाठी उंची कपडे आणि वस्तू वापरता, पण बऱ्याच जणांना तुम्ही दिखावा करत आहात, मिरवत आहात असे वाटते. त्यामुळे जरी तुमच्यासमोर लोक तुम्हाला मान देत आहेत असे वाटत असले तरी मागाहून मात्र ते तुमची निंदा करत असतात, म्हणजेच काय तर महागडी जीवनशैली अनुसरून तुम्ही लोकांवर जो प्रभाव टाकता तो एकतर खोटा असतो किंवा क्षणभंगुर असतो, म्हणजे लोक काही काळाने तो विसरून जातात.

म्हणूनच तुम्हाला खरंच समाजात एक प्रतिष्ठीत आणि सभ्य व्यक्ती म्हणून वावरायचे असेल, लोकांवर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची कधीही न उतरणारी जादू करायची असेल तर तुम्हाला दीर्घकालीन उपाय करावा लागेल.

आता पुन्हा तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की, म्हणजे नक्की काय करायचे? तर मंडळी जे काही करायचे आहे ते तुम्हाला स्वत:लाच करायचे आहे, पण तुमची काही मदत व्हावी ह्या हेतूने आम्ही तुम्हाला अश्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्या लोकांवर कायमचा प्रभाव टाकण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतात.

 

abdul kalam 3 InMarathi

 

१) सर्वात महत्त्वाच म्हणजे लोक तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचू शकले नाहीत तर ते तुम्हाला विसरून जातील. सगळीकडे तुमची सहज उपस्थिती असणे खूप महत्त्वाचे आहे.

 

amte-marathipizza

 

२) आदर हा वय किंवा समूहापुरता र्मयादित नसतो. तुमच्यापेक्षा मोठा, लहान किंवा समवयीन असो, सर्वांना मान द्या. तुमचे हे औदार्य इतर लोक लक्षात ठेवतील.

 

nana-marathipizza

 

३) तुम्ही इतरांची पर्वा करत नसाल तर तेसुद्धा तुमची पर्वा करणार नाहीत. तुम्ही जेवढी इतरांची मदत कराल तेवढय़ाच प्रमाणात ते मदतीसाठी तत्पर राहतील. प्रेम द्या आणि प्रेम घ्या.

 

ashok-saraf-marathipizza

 

४) जे काम कराल, त्याला थोडा पर्सनल टच द्या. तुम्ही कलाकार असाल तर वेगवेगळ्या पद्धतीने कला सादर करा. तुमच्या कामाच्या ब्रँडिंगचा विचार करून कृती करा.

 

bhau-kadam-marathipizza

 

५) प्रत्येकाला निखळ हास्य आवडत असते. एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमच्याकडे पाहून हसल्यास काही वेळानंतर त्या हास्यामुळे नवी ओळख निर्माण होते. त्यामुळे नेहमी हसत राहा.

 

bharat-jadhav-marathipizza

 

६) प्रत्येकाला स्वत:चे नाव ऐकायला आणि लिहिलेले नाव वाचायला आवडते. त्यामुळे लोकांना त्यांच्या नावाने बोलवा.

 

ratan-tata-marathipizza

 

७) इतरांची स्तुती करणे आणि आजूबाजूच्या नैसर्गिक वस्तूंशी जोडलेले असणे हे उच्च माणुसकीचे लक्षण आहे. सकारात्मक आयुष्य जगण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे आणि लोक याकडे आवर्जून लक्ष देतात.

nagraj-marathipizza

 

तर मग मंडळी ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि नेहमी साधेपणाने वागा. इतरांकडून आदर मिळवण्यासाठी तुम्हाला एक नियम पाळावाच लागेल, इतरांना आदर द्या, ते तुम्हाला आदर देतील.!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?