' नवरात्रोत्सवा बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी! – InMarathi

नवरात्रोत्सवा बद्दल तुम्ही कधीही न ऐकलेल्या गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गणेशोत्सव तर धुमधडाक्यात आपल्या लोकांनी साजरा केला आणि आता नवरात्री देखील त्याच जोशा-जल्लोषात सुरू होत आहे.

यंदा सगळ्याच उत्सवांवर कोरोनाचं सावट असलं तरी या परिस्थितीतही आपण घरातल्या घरात आनंदाने, उत्साहाने हे सण साजरा करणं हे महत्वाचं आहे.

नवरात्रीचे हे नऊ दिवस हे लोकांसाठी खूप भक्तीभावाचे आणि तेवढेच उत्साहाचे असतात.

याच काळात घरामध्ये घट देखील बसवले जातात. या दिवसामध्ये सगळीकडेच धूम असते, जिथे देवीची प्राणप्रतिष्ठापणा होते त्या ठिकाणी मोठमोठे मंडप बांधले जातात.

लोकं देवीची मनोभावे पूजा करतात, सगळीकडे दिव्यांची आरास, दांडिया रास आणि मनमोहक वातावरण आपल्याला पाहण्यास मिळतो. पण  की नवरात्र का साजरा केला जातो हे तुम्हाला माहित आहे का?

 

navratri.marathipizza
wikimedia.org

 

कदाचित तुम्हाला देखील या मागची एखादी गोष्ट माहित असेल. या एवढ्या मोठ्या भव्य उत्सवाची वस्तुस्थिती ज्ञात करून घेणे खूपच कठीण आहे.

विविध पंथांमध्ये आपल्याला नवरात्रबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत आणि प्रत्येकजण त्यांच्या सांगितलेल्या गोष्टीच सत्य आहेत, असा दावा करतो. चला तर जाणून घेऊया नवरात्रीबद्दल अजून थोडी माहिती, जी कदचित तुम्ही ऐकली नसेल.

नवरात्री या शब्दाची फोड केल्यास त्याचा अर्थ ‘नऊ रात्र’ असा होतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, वर्षातून सुमारे ४ वेळा नऊ रात्रीचा उत्सव येतो. पण त्यामधील आपण दोनच उत्सव साजरे करतो. त्या नवरात्री म्हणजे शरद नवरात्री आणि चैत्र नवरात्री.

नवरात्र हा सण देवी दुर्गेचा महिषासूर राक्षसावरील मिळवलेल्या विजयाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. राक्षसांच्या अत्याचारांचा नाश करण्यासाठी देवतांनी दुर्गेची निर्मिती केली.

महिषासुराने तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पण दुर्गेने लग्न करण्याआधी एका युद्धामध्ये स्वतःला हरवण्याची अट महिषासुराला घातली. हे युद्ध ९ दिवस आणि ९ रात्र चालले होते. दहाव्या दिवशी दुर्गा देवीचा विजय झाला आणि दुर्गेने म्हशीचे डोके असलेल्या वाईट वृत्तीच्या महिषासुराला ठार केले.

म्हशीसारखे डोके असल्यामुळेच त्याला महिषासूर हे नाव दिले गेले होते.

 

navratri.marathipizza1
i1.wp.com

 

महिषासुराचे डोके हे म्हशीचे होते, त्यामुळे भारतातील खूप भागांमध्ये नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गेसमोर म्हशीचा बळी दिला जातो. सहसा, पुजारी जीवनाच्या आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त करण्यासाठी या प्राण्यांचा बळी देण्यापूर्वी त्यांच्या कानामध्ये मंत्र उच्चारतात. एका प्रहारात म्हशीचे शीर उडवावे अशी अट देखील असते.

नवरात्रीचे नऊ दिवस देवीचे नऊ वेगवेगळे अवतार दर्शवतात. या नऊ दिवसांच्या दरम्यान देवीच्या नऊ वेगवेगळ्या अवतारांची पूजा केली जाते. प्रत्येक रात्रीचे देखील एक वेगळे रूप असते.

पुराणांनुसार, भगवान रामांनी ९ दिवस देवीच्या ९ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली होती, परिणामी त्यांना रावणाला मारण्याची आणि सीतेला लंकेमधून सुखरूप परत आणण्याची शक्ती दुर्गेने प्रदान केली.

 

navratri.marathipizza2
blogspot.com

 

इंडिया टाईम्सच्या एका लेखानुसार, देवी दुर्गेला आपल्या मातेला म्हणजेच पृथ्वीला भेटता यावे ह्यासाठी भगवान शंकरांनी वर्षातील ९ दिवस तिला मर्त्यलोकात जाण्याची परवानगी दिली होती आणि हाच तो ९ दिवस आणि ९ रात्रींचा कालावधी आहे.

याचाच उत्सव म्हणून नवरात्री हा सण साजरा केला जातो. म्हणूनच बहुतेक लोक देवी दुर्गा आपल्या आईला पृथ्वीला भेटण्यासाठी आली आहे असे म्हणतात.

नवरात्रीच्या नवव्या दिवशी लोक शस्त्रपूजन आणि आपल्या उपजीविकेचे साधन असलेल्या गोष्टींची पूजा करतात. भारताची सिलिकॉन व्हॅली समजल्या जाणाऱ्या बँगलोरमध्ये आयुध पूजेच्या दिवशी संगणक, सीडीज आणि सॉफ्टवेअर पुस्तकांची पूजा केली जाते. तसेच, वाहने, यंत्रसामग्री, रायफल्स इत्यादींची देखील पूजा केली जाते.

 

navratri.marathipizza3
i1.wp.com

 

शारदीय नवरात्री ही नऊ दिवस आणि नऊ रात्रींची असते. यामध्ये दर तीन दिवशी देवींच्या तीन अवतारांची पूजा केली जाते.

यामधील पहिले तीन दिवस देवी दुर्गेची पूजा केली जाते. त्यानंतरचे तीन दिवस देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि शेवटच्या तीन दिवसांमध्ये देवी सरस्वतीची पूजा केली जाते. आता जी नवरात्र सुरू आहे, ती शरद नवरात्र आहे.

नवरात्रीचा शेवट दसऱ्याने म्हणजेच विजयादशमीने होतो. याच दिवशी रामाने रावणाला मारून विजय साजरा केला होता, त्या क्षणाच्या स्मरणार्थ आणि वाईट गोष्टींवर विजय मिळवून चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?