' तुमच्या आवडत्या या ब्रॅंडच्या टॅगलाईन मागे दडलेली हत्याकांडाची कथा वाचून हैराण व्हाल! – InMarathi

तुमच्या आवडत्या या ब्रॅंडच्या टॅगलाईन मागे दडलेली हत्याकांडाची कथा वाचून हैराण व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

Nike या ब्रांडची संपूर्ण जगात एक वेगळीच ओळख आहे. हा जगातील सर्वाधिक लोकांचा आवडता ब्रांड मानला जातो. Nike हा एथलेटिक कपडे आणि स्पोर्ट शूज चा सर्वात मोठा उत्पादक आहे. तर अधिकाधिक एथलेटिक्स देखील या ब्रांडला आपली पहिली पसंती देतात.

 

nike05-marathipizza

 

Nike ला पोर्टलंड स्टेट विद्यापीठाच्या कार्लीन डेविडसन या विद्यार्थ्याने डिझाईन केलं होत. १९७१ साली बनविण्यात आलेल हे डिझाईन त्याने केवळ ३५ डॉलर मध्ये बनवून दिल होत.

त्याचा Swoosh Logo आणि ‘Just Do It’ या घोषणेच्या जोरावर Nike ने विश्वस्तरावर आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. या ब्रांड बद्दल खूप गोष्टी तुम्हाला माहित असतील पण आज आम्ही तुम्हाला Nike बद्दल एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी तुमच्यासाठी अतिशय धक्कादायक असेल.

 

nike logo InMarathi

 

तुम्हाला हे वाचून आश्चर्य होईल की Nike या ब्रांडचं प्रसिद्ध स्लोगन म्हणजेच घोषवाक्य ‘Just Do It’ हे काही असच ठेवण्यात आलं नाही तर याची आयडिया एका हत्याकांडापासून प्रेरित आहे. बसला न धक्का, अहो पण हे खर आहे.

 

just-do-it InMarathi

 

Advertising Agency विडेन केनेडीच्या को-फाउंडर डेन विडेन यांनी एका मॅगजीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला आहे.

त्यांनी सांगितले की १९७७ साली गैरी गिलमोर नावाच्या हत्याऱ्याने पोर्टलँडमध्ये कितीतरी लोकांना जीवानिशी मारून टाकलं. तर, फायरिंग टीमने कित्येक लोकांना मृत्युची शिक्षा देऊन त्यांना तुरुंगात पाठवले. तोच हत्यारा खून करायच्या आधी हा स्लोगन बोलायचा, त्याच स्लोगनला आता Nike च स्लोगन बनविण्यात आलं आहे.

 

gary gilmore InMarathi

विडेन सांगतात की ,

तुरुंगात कैद असलेल्या एका व्यक्तीला फायरिंग टीम ने विचारल की तुम्ही मरण्याआधी काही बोलू इच्छिता, तर त्या व्यक्तीच उत्तर होत ‘Let’s do this’… कंपनीला टॅग लाईन देताना मला त्या व्यक्तीचे शेवटचे शब्द आठवले, पण मला ‘Let’s do this’ आवडल नाही तर मी ते बदलून ‘Just do it’ केलं. बघता बघता या स्लोगनने कंपनीला खूप प्रसिद्ध बनवले.

nike04-marathipizza
facebook

खरंच Nike या ब्रांडच्या या स्लोगन मागील कहाणी धक्कादायक आहे,पण याच स्लोगनने Nike या ब्रांड ला एवढी प्रसिद्धी मिळवून दिली हेही तेवढेच खरे आहे.

यावरून हेच दिसून येत ही प्रेरणा ही कुठल्याही गोष्टीपासून मिळू शकते, आता हे आपल्यावर अवलंबून असते की आपण त्याचा कशाप्रकारे उपयोग करतो.

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?