' 'इच्छाशक्तीच्या' बळावर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणारा एक 'ऑलिम्पिकवीर'!

‘इच्छाशक्तीच्या’ बळावर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवणारा एक ‘ऑलिम्पिकवीर’!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

असं म्हणतात की नशिबाचा खेळ कोणालाही आजपर्यंत समजलेला नाही, आपण विचर काही करतो आणि आपल्यासोबत काही वेगळच घडत.

एखादी गोष्ट मिळविण्यासाठी आपण खूप मेहनत करतो, पण कधी कधी ती आपल्या हातात येता-येता राहून जाते. यासर्वांमुळे आपण निराश होऊन त्या ध्येयाला विसरून जातो, सोडून देतो.

पण  या जगात काही असेही लोक ज्यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर असे काही काम केलेत ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. अशीच एक व्यक्ती म्हणजे “Karoly Takacs”.

 

Karoly Takacs
work better india

 

Karoly हे Hungarian Army मध्ये कार्यरत होते. ते अतिशय उत्तम पिस्टल शुटर होते. त्यांनी १९३८ साली नॅशनल गेम्स मध्ये जबरदस्त प्रदर्शन करत ती स्पर्धा जिंकली होती.

त्याचं हे प्रदर्शन बघितल्यावर संपूर्ण हंगेरी वासियांना विश्वास झाला होता की १९४० च्या ऑलिम्पिक गेम्समध्ये Karoly हे देशासाठी मेडल नक्की जिंकतील.

पण ते म्हणतात ना – नशिबात लिहिलेलं कोणी टाळू शकत नाही. तसंच काहीसं Karoly यांच्या सोबत झालं.

१९३८ च्या नॅशनल गेम्स नंतर एक दिवस आर्मी ट्रेनिंग कॅम्पमध्ये Karoly यांच्या उजव्या हातात ग्रेनेड फुटला आणि त्यांचा हात नेहेमीसाठी त्यांच्या शरीरापासून वेगळा झाला…

लहानपणापासून ज्या हाताने त्यांनी ट्रेनिंग केली होती, ज्याच्या भरवश्यावर संपूर्ण हंगेरी ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न पाहत होत त्याचं ते स्वप्न एका क्षणात त्या ग्रेनेडच्या धुव्यात अदृश्य झालं.

ही बातमी मिळताच पूर्ण हंगेरी शहराचा हिरमोड झाला. पण हार मानेल तो योद्धा काय..!

एकीकडे हंगेरीवासी दुखात असताना दुसरीकडे Karoly ने स्वतःला यातून सावरले. एक महिना दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर आता त्याला अर्जुनासारखं केवळ त्याचं लक्ष्य दिसत होतं.

आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याने कोणालाही न सांगता डाव्या हाताने सराव करण्यास सुरवात केली…!

त्यानंतर १९३९च्या नॅशनल गेम्समध्ये तो सर्वांसमोर येतो आणि स्पर्धेत सहभागी होणार असल्याचं सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का देतो. त्याला सहभागी होण्यास संमती मिळते.

तो पिस्टल शुटींगमध्ये सहभाग घेतो आणि त्यात गोल्ड मेडल जिंकतो.

 

Karoly Takacs03-marathipizza
nemzetisport.hu

 

हा कुठला चमत्कार नाही तर यामागे Karoly च त्याच्या खेळाप्रतीचं प्रेम आणि त्याचा प्रबळ इच्छाशक्ती होती म्हणून तो हे करण्यात यशस्वी झाला.

Karoly ला बघून लोक आश्चर्यचकित होतात. ज्या हाताने तो एका वर्षा आधीपर्यंत लिहू देखील शकत नव्हता, त्या हाताला त्यांने एवढ सक्षम कसं बनवल की त्याने तो गोल्ड मेडल जिंकले.

लोकांसाठी हा एक चमत्कारच होता. Karoly च्या या पराक्रमाची गाथा वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना देश विदेशातही सन्मान मिळाला.

हंगेरीला आता परत विश्वास झाला १९४० ऑलिम्पिक गेम्समध्ये पिस्टल शुटींगचं गोल्ड मेडल Karoly जिंकणार,

पण नशिबाने पुन्हा एकदा Karoly ला दगा दिला आणि विश्व युद्धामुळे १९४० चे ऑलिम्पिक गेम्स रद्द करण्यात आले.

तरी हा निराश नाही झाला आणि १९४४च्या ओलीम्पिक्ससाठी त्याने तयारी करण्यास सुरवात केली, पण त्याचं नशीब जणू काही खेळत होत त्याच्याशी.

विश्व युद्धामुळे पुन्हा एकदा ऑलिम्पिक रद्द करण्यात आलं.

 

karoly inmarathi
abdul kalam fab club

 

आता मात्र हंगेरीच्या लोकांचा विश्वास कमी होऊ लागला कारण Karoly चं वय वाढत चाललं होत. खेळात वय आणि प्रदर्शन याचं फार महत्व असतं.

एका वयानंतर तुमचं खेळातील प्रदर्शन कमी होऊलागतं. पण या Karoly चं तर केवळ एकच ध्येय होतं – ते म्हणजे पिस्टल शुटींगमध्ये ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवणे. त्यासाठी त्यांने निरंतर सराव सुरु ठेवला. खूप मेहनत केली.

 

karoly 3 inmarathi
medium

 

१९४८ मध्ये Karoly ने अखेर ऑलिम्पिक्समध्ये भाग घेतला आणि अद्भुत प्रदर्शन करत स्वतःचं आणि हंगेरी वासीयांच स्वप्न पूर्ण केलं…अखेर ते गोल्ड मेडल त्यांनी जिंकलं.

संपूर्ण हंगेरी आनंदाने नाचू लागल. कारण Karoly अखेर ते करून दाखवल होत ज्याची आशा हंगेरी वासियांनी सोडून दिली होती.

पण ते म्हणतात न यशाची चव एकदा चाखली की ती नेहमीच हवी हवीशी वाटते. Karoly चं पण तसंच झाल. त्याचं गोल्ड मेडलच ध्येय पूर्ण झालं होतं,,,त्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती.

पण तो इथेच थांबला नाही…!

त्याने १९५२ च्या ऑलिम्पिक गेम्समध्येही सहभाग घेतला आणि त्यातही त्याने गोल्ड मेडल जिंकून इतिहास रचला. Karoly त्या पिस्टल इवेंटमध्ये regularly दोन गोल्ड मेडल जिंकणारा पहिला खेळाडू बनला.

जानेवारी १९७६ ला या Karoly चा हंगेरी येथे मृत्यू झाला. पण त्याच्या मृत्युनंतरही तो आजही लोकांच्या मनात जिवंत आहे केवळ त्याच्या कर्तुत्वामुळे.

त्याने दाखवलेलं धाडस हे आपल्यासारख्या सर्वांनाच नक्कीच प्रेरणा देणारे आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?