' नवीन वर्षाची सुरूवात – हे बघितल्याशिवाय करू नका! – InMarathi

नवीन वर्षाची सुरूवात – हे बघितल्याशिवाय करू नका!

 

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

जाहिरातींचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो.

फार ग्रेट नसलेल्या जाहिरातींच्या बाबतीत हा परिणाम केवळ त्या वस्तू किंवा brand लक्षात रहाण्यापुरता असतो.

पण ज्या जाहिराती उत्कृष्ट असतात – त्या आपल्या मनात घर करून बसतात.

‘जलेबी’ चं वेड दर्शवणारी “धारा धारा…शुद्ध धारा…” ची जाहिरात असो वा Cadbury चॉकलेट हाच ‘असली स्वाद जिंदगी का’ हे ठसवणारी जाहिरात असो – त्या त्या पिढीवर ह्या जाहिरातींनी अवीट गोडीचा ठसा उमटवला आहे.

सध्याचं जग मात्र जाहिरातींच्या कोलाहलाने व्यापलेलं आहे.

चहूकडे इतक्या साऱ्या जाहिराती झाल्यात, की १० वर्षांनी एखादी जाहिरात मुद्दाम आठवावीशी वाटेल असं काही मनावर ठसत नाहीये.

पण ह्याचा अर्थ चांगल्या जाहिराती बनतच नाहीत, असं नाही ना!

आम्ही ह्या आधीच – तरुण पिढीच्या, तरुण advertisements: ४ ads ज्या तुम्ही बघायलाच हव्या! – ह्या आर्टिकलमधे ४ अतिशय उत्कृष्ट advertisements तुमच्या समोर ठेवल्या आहेत.

आज आम्ही आणखी २ सुरेख जाहिराती दाखवत आहोत – पहिली आहे महिंद्राच्या ezo ह्या इलेक्ट्रिक कार ची आणि दुसरी, सॅमसंग सर्व्हिसची.

छोटीशी कथा, त्यात कारचे फीचर्स दर्शवणे – त्या सोबत उत्तम संदेश देणे – ही कला ह्या जाहिरातीत लीलया साधल्या गेलीये.

संदेश आहे –

Goodness is a choice you make!

कठीण प्रसंगात आपल्यातील चांगुलपणा आपोआप येत नसतो – ती आपण केलेली निवड असते!

व्हिडिओ बघा, एन्जॉय करा !

 

 

दुसरी सॅमसंगची जाहिरात – हिच्याबद्दल फारसं नं बोलणंच उत्तम. जाहिरात बघून डोळे भरून येतील एवढं मात्र नक्की.

मस्तच…! नाही?!

नवीन वर्षाची सुरूवात हे बघून, त्यातील भावना समजून आणि त्यानुसार काहीतरी छानसं ठरवून केलीत…तर तुमचं वर्ष झकास जाणार ह्यात शंका नाही!

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?