त्याने कोट्यावधींची जाहिरात नाकारली, ज्यामुळे चाहत्यांच्या मनात ‘विराट’ आदर निर्माण झालाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणजेच आपला सर्वांचाच लाडका विराट कोहली. क्रिकेटच्या मैदानावर Impossible ला Possible करून दाखवणारा हा तरुण खेळाडू. तो त्याची खेळाप्रती, त्याच्या टीमप्रती तसेच देशासाठी असलेली जबाबदारी चोख पार पाडतो आहे.

आज भारतीय टीमचा कणा बनलेल्या विराट कोहलीने स्वतःच्या हिम्मतीवर स्वतःचं नाव कमावून, टीममध्ये आपली जागा आणि आता कर्णधार पद मिळवलं आहे. तो त्याच्या फॅन्सना कधी निराश करत नाही, आपल्या खेळातून विराटने सर्वांच्याच मनात एक विशिष्ट स्थान प्राप्त केले आहे.

तसाच तो त्याच्या कृत्यातूनही करत असतो. असचं काहीसं प्रशंसनीय कृत्य विराटने पुन्हा एकदा केलयं. यासाठी त्याच कौतुक करावं तेवढ कमी आहे. आपले फॅन्स जे आपल्यावर जीव ओततात त्यांना आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी कोहलीने चक्क करोडोंची डील धुडकावून लावली आहे.

Virat-Kohli01-marathipizza
hindustantimes.com

विराट कोहली याने एक सॉफ्ट ड्रिंक कंपनीची करोडो रुपयांच्या डीलची ऑफर अक्षरशः लाथाडली.

The Hindu च्या रिपोर्टनुसार,

विराट स्वतः कुठल्याही प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक पीत नाही, म्हणून त्याने या सॉफ्ट ड्रिंक कंपनीसोबतल करण्यास नकार दिला.

Virat-Kohli03-marathipizza
businessinsider.in

विराटच्या मते, तो त्याच गोष्टीचा प्रचार करतो जी तो स्वतः वापरतो. पण विराटच्या कडक ट्रेनिंग आणि डाएट मध्ये सॉफ्ट ड्रिंकला जागा नाही. आता विराट किती फिटनेस फ्रिक आहे त्याबद्दल वेगळ्याने सांगायला नको.

तो स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप कडक ट्रेनिंग करतो. एवढच काय तर त्याच्या साठी पाणी देखील फ्रान्सहून येतं. विराट कुठल्याच प्रकारचं जंक फूड कधीच खात नाही. आपल्या कॅप्टनने  एकदा एका रिपोर्टरला सांगितले होते की,

मी माझ्या कुठल्याही टीममेटला असं काही करायला सांगत नाही जे मी स्वतः नाही करू शकत, आधी मी स्वतःला समजवतो की मी ते करू शकतो नंतर मी कुठल्याही खेळाडूला ते करण्यास सांगतो.

Virat-Kohli02-marathipizza
expertherald.com

याधीही विराटने प्रसिद्ध सॉफ्ट ड्रिंक कंपनी कोलाची जाहिरात करण्यापासून देखील नकार दिला होता. साखर आणि कार्बोनेटेड पेय यांमुळे आरोग्या संबंधी वाढता धोका लक्षात घेऊन विराटने ही जाहिरात नाकारली होती.

जेव्हा की विराट मागील सहा वर्षांपासून कोला कंपनीसोबत करारबद्ध होता आणि कंपनी त्यांचे कॉन्ट्रॅक्ट वाढवण्याच्या विचारात होती, पण विराटने या गोष्टीला नकार दिला.

माजी बॅडमिंटन खेळाडू आणि राष्ट्रीय बॅडमिंटन कोच असलेले पुलेला गोपीचंद यांनी देखील २ दशकांपूर्वी अशीच एक ऑफर नाकारली होती. ते म्हणाले होते की,

जेव्हा मी २००१ साली ऑल इंग्लंड टायटल जिंकल होत, तेव्हा मला एका सॉफ्ट ड्रिंक कंपनीची ऑफर आली होती. मी योगा, ध्यान आणि एक कडक डाएट फॉलो करतो आणि मी सॉफ्ट ड्रिंक्स न पिण्याची शपथ घेतली होती.

जेव्हा मीच कुठली सॉफ्ट ड्रिंक पीत नव्हतो, म्हणून केवळ पैश्यांसाठी मी इतरांना ते पिण्यास प्रवृत्त करणे मला पटले नाही.

Pullela-Gopichand-marathipizza
northeasttoday.in

पण त्या सोबतच पुलेला गोपीचंद यांनी हे देखील मान्य केले की लहानपणी त्यांना सॉफ्ट ड्रिंक्स आवडायच्या, पण प्रोफेशनल खेळाडूंसाठी ही सॉफ्ट ड्रिंक काही कामाची नाही. त्यांनी सांगितले की, “माझ्या अकॅडमीमध्ये तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक्स मिळणार नाहीत.”

साईना नेहवाल, पी.व्ही. सिंधू आणि पी. कश्यप सारख्या आपल्या शिष्यांना त्यांनी काय सांगितले आहे असे विचारले असता, ते म्हणाले की,

मी त्यांना सॉफ्ट ड्रिंक्सचा प्रचार करण्यापासून नाही थांबवले, ती त्यांची चॉइस आहे. पण मी त्यांना सॉफ्ट ड्रिंक्स न पिण्यास सांगितले आहे.

आता पुलेला पाठोपाठ विराटनेही सामाजिक जाणीव जपत केवळ पैश्यांसाठी सॉफ्ट ड्रिंक्सचा प्रचार करण्याच्या करोडोंच्या ऑफरला धुडकावून लावले आहे. आधी त्याच फिटनेस प्रेम आणि आता सॉफ्ट ड्रिंक्सचा प्रचार न करण्याचा निर्णय यामुळे यंग इंडियाच्या यंग जनरेशनसाठी विराट हा एक परफेक्ट आयडॉल म्हणून समोर येत आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?