' अगदी सहज उपलब्ध होणा-या या बहुगुणी फळाकडे लक्ष देणं तुमच्यासह कुटुंबियांसाठीही गरजेचं आहे – InMarathi

अगदी सहज उपलब्ध होणा-या या बहुगुणी फळाकडे लक्ष देणं तुमच्यासह कुटुंबियांसाठीही गरजेचं आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मागील भागाची लिंक : अत्यंत स्फूर्तीदायक फळ – ‘केळी’ : आहारावर बोलू काही – भाग ८

===

लेखिका – डॉक्टर. प्राजक्ता जोशी

बहुगुणी पपई

papaya-marathipizza01
ahealthblog.com

पपई हे अगदीच सहज मिळणारे फळ आहे. आपण ते आवडीने खातो देखील आज आपण पपईचे शरीराला होणारे फायदे बघणार आहोत.

papaya-marathipizza01

प्रथम आधुनिकदृष्ट्या अभ्यास करू.

१) पपई ही antioxidents ची खाण आहे. त्यामुळे ईतर फळाप्रमाणे त्वचेचे आरोग्य कायम राखण्यास मदत करते.

२) तसेच कुठलेही inflamation (शरीरातील अवयवांवरील सुज) कमी करण्यास मदत करते.

३) antioxidents मुळे रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यास मदत करते.

४ ) पपईमध्ये papain नावाचे जीवद्रव्य असते. जे पचन शक्ती वाढवण्यास मदत करते.

५) चयापचय (metabolism) क्रियेत free radicle ची निर्मीती होत असते. जे शरीरास घातक असते व त्यामुळे शरीर व्याधीना आमंत्रण देते. मात्र पपईतील carotinoid ही ऊत्पत्ती थांबवते.

६) नवीन संशोधना नुसार पपईच्या सेवनाने ह्रदयाच्या मांस पेशी मजबुत होतात.

७) पपई कर्करोगामध्येही ऊपयुक्त ठरते.

 

papaya-marathipizza02
ndtvimg.com

गर्भारपणात पपई खावी का ???

एवढे सारे पपईचे फायदे पाहील्यावर प्रश्न पडतो की, आपली आई, आजी घरातील स्त्रियांना गर्भावस्थेत पपई का नको म्हणत असावी?? याला ही शास्त्रीय कारण आहे.

अर्धवट पिकलेल्या पपईत latex चे प्रमाण अधिक असते व latex मुळे गर्भाशय आकुंचन पावुन कळा सुरू होण्याचा धोका असतो. व संभाव्य धोका लक्षात घेता पपई गर्भावस्थेत टाळतात.

आता आयुर्वेदानुसार पपईचे ऊपयोग पाहु.

१) “हृद्य” व “ग्राही” हे दोन महत्वाचे गुण पपईचे सांगितले आहेत.

हृद्य : हृदयासाठी ऊत्तम

ग्राही : मलाची योग्य निर्मीति करणारा (benificial in Ibs, dysentry)

२) तसेच दमा (ashtama), खोकला (allergic cough) यात उपयोगी सांगीतली आहे.

३) यकृत व प्लीहा विकारात पपई अवश्य खावी.

४) विषबाधा (insect bite,scorpion bite) मध्ये उपयुक्त ठरते.

५) पपईचा चिक (latex & papin) तोंडातील फोडे आल्यास वापरतात. हा चिक मुळव्याधेत जर अधिक रक्तस्त्राव असेल तर रक्तस्तंभक म्हणून वापरतात.

 

papaya-marathipizza03
skinnyms.com

६) अंजुत, ईसब अशा त्वक व्याधीत हा चिक लावण्याचा ग्रामीण भागात प्रघात आहे व परीणामही चांगले दिसतात.

७) पपईचे पाने platelets वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे डेंग्यु, मलेरिया यात ऊपयुक्त ठरते. पानाच्या अर्कापासुन डेगुंवर आयुर्वेदीक औषधेही बाजारात आली आहेत.

८) पपईच्या पानांचा रस ज्वर, मुत्राल्पतायात (20-30ml) यात ऊपयुक्त ठरतो.

९) शोथ (सुज, ठणक) व्याधींमध्ये पपईची पाने गरम करून बांधतात. ही आयुर्वेदाची ऊपनाह चिकित्सा होय.

१०) कच्ची पपईकृमी (worm infestation), यकृत विकारात ऊपयुक्त ठरते, तर पीकलेली पपई बद्धकोष्ठतेत (constipation) मध्ये खावी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?