' स्वत:चे शीर हातात घेऊन, “मातृभुमीसाठी” अहोरात्र लढणारा महान शीख योद्धा! – InMarathi

स्वत:चे शीर हातात घेऊन, “मातृभुमीसाठी” अहोरात्र लढणारा महान शीख योद्धा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

शीख इतिहासातील सर्वात धडाडीचा योद्धा म्हणून बाबा दीप सिंग यांना ओळखले जाते. शीख इतिहास हा तसा संघर्षमय आणि रक्तरंजित. आपल्या प्रत्येक हक्कासाठी शिखांना लढा द्यावा लागला, प्रसंगी रक्त सांडवावे लागले आणि त्यातूनच निर्माण झाले सर्वश्रेष्ठ शीख योद्धे!

सहसा एक योद्धा एका हाताने आपली तलवार सांभाळतो तर दुसऱ्या हाताने आपल्यावर होणारे वार रोखण्यासाठी ढाल घेऊन तैनात असतो.

पण बाबा दीप सिंग यांची लढाई पद्धत सर्वांपेक्षा अगदीच वेगळी होती, ते आपल्या बचावाची चिंता न करता केवळ नंग्या तलवारीनिशी शत्रूवर तुटून पडत असत. म्हणूनच आजही त्यांच्या पराक्रमाची थोरवी गायली जाते.

चला जाणून घेऊया या सर्वश्रेष्ठ शीख वीराबद्दल!

 

bababa deep singh.marathipizza

१६८२ मध्ये जन्मलेल्या बाबा दीप सिंग यांनी शीख धर्माची शिकवण घेतली. बाबा दीप सिंग यांचा जन्म पंजाबच्या अमृतसर येथे झाला होता. फक्त २० वर्षाच्या कालखंडामध्ये ते एक योद्धा बनले.

१७०२ मध्ये त्यांनी लग्न केले आणि ते दमदामा साहिब गुरुद्वारामध्ये ते स्थायिक झाले. १७०५ पर्यंत त्यांनी गुरु गोविंद सिंग यांच्याकडून शिक्षण घेतले. जोपर्यंत अब्दालीने पंजाबमध्ये गोंधळ सुरु केला नव्हता, तोपर्यंत त्यांचे जीवन खूप शांततेमध्ये चालले होते.

१७०९ मध्ये त्यांच्या बरोबर अजून एक योद्धा या युद्धामध्ये जोडला गेला, त्याचे नाव बाबा बंडा सिंग बहादूर हे होते. अहमद शाह दुरानी (अब्दाली) याने शीखांना संपवण्याचा प्रयत्न केला होता.

त्याने आपल्या लाहोरच्या तिमूर शाह दुरानी या गवर्नरला शिखांना नष्ट करण्यासाठी पंजाबला पाठवले होते. तिमूर याने श्री हरमंदिर साहिब म्हणजेच द गोल्डन टेम्पलचा आणि श्री दरबार साहिबचा संपूर्ण विनाश करण्याचे आदेश दिले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

हे बाबा दीप सिंग यांना आवडले नाही, त्यांना त्याचा खूप राग आला. त्यानंतर त्याने खूप जलद गतीने पाऊले उचलत उत्साहपूर्ण भाषण करत सुमारे पाचशे शीख सैनिकांची फौज निर्माण केली.

पुढे लवकरच ही शीख पलटण ५००० पर्यंत वाढली, या सर्वांनी आणि बाबा दीप सिंग यांनी श्री हरमंदिर साहिबमध्येच या वर्षीची दिवाळी साजरी करू अशी शपथ घेतली.

 

baba deep singh.marathipizza1

जेव्हा या शीख पलटणीबद्दल तिमूरला समजले, तेव्हा त्याने आपली २०००० सैनिकांची फौज या शीख सैनिकांशी लढण्यासाठी पाठवली. तिमूरची सेना अमृतसरच्या उत्तरेला येऊन बाबा दीप सिंग आणि त्यांच्या पलटणीची वाट पाहत थांबली होती.

हे सर्व १७५७ मध्ये घडले होते, त्यावेळी बाबा दीप सिंग हे ७५ वर्षाचे होते. या दोन्ही सैन्यांमध्ये ११ नोव्हेंबरला गोहलवर येथे युद्ध झाले होते. तिमूरचे सैन्य हे बाबा दीप सिंग यांच्या सैन्याच्या चारपट होते.

या कठीण वेळेला देखील बाबा दीप सिंग हे खचले नाहीत आणि त्यांनी शत्रूंवर त्वेषाने हल्ला करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना आठवण करून दिली की, शत्रूने मनमंदिर साहिब मंदिरावर चढण्याचा निर्धार केला आहे.

तेव्हा त्यांनी अट्टल खान याचा पाठलाग केला आणि त्याला कळसावर जाण्यापासून अडवले. त्यावेळी अट्टल खान आणि बाबा दीप सिंग यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले, पण दुर्दैवाने डाव साधून अट्टल खान याने बाबा दीप सिंग यांचे शीर उडवले –

असे म्हटले जाते की बाबा दीप सिंग हे हातात आपले शीर घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले.

त्यांचे हे शौर्य पाहून उर्वरित सिख सैन्य देखील खवळले आणि शिखांनी या तिमूरच्या सैन्यावर विजय मिळवला. शपथेप्रमाणे त्या वर्षी हरमंदिर साहिब मंदिरामध्ये शीख लोकांनी दिवाळी साजरी केली.

 

baba deep singh.marathipizza2

 

त्यांच्या ह्याच अतुलनीय शौर्यामुळे शीख इतिहासात त्यांना मानाचे स्थान आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?