''ह्या' देशांत आपला भारतीय रुपया तुम्हाला श्रीमंत असल्याचा 'फील' करून देईल!

‘ह्या’ देशांत आपला भारतीय रुपया तुम्हाला श्रीमंत असल्याचा ‘फील’ करून देईल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये एकदा तरी परदेशाची सैर करण्याची खूप इच्छा असते आणि ही इच्छा असणे साहजिक आहे. चित्रपटामध्ये जसे परदेशातील काही भाग दाखवले जातात, ते पाहून प्रत्येकाला तिथे जावे, असे नेहमी वाटत असते. तुम्हालाही नक्कीच वाटले असेल.

पण न्यूयॉर्क, पॅरिस, ऑस्ट्रेलिया, अमेरिका यांसारख्या ठिकाणी प्रवासाला जाण्याची योजना आखण्याच्या आधी आपण नेहमी दोनदा तरी विचार करतो. कारण त्यावेळी आपल्याला वाटते की, आपले भारतीय चलन हे कमकुवत आहे आणि परदेशी देशांमध्ये प्रवास करण्यासाठी भरपूर पैशाची आवश्यकता आहे.

पण आम्ही जर तुम्हाला असे सांगितले की, जगामध्ये काही असे देश देखील आहेत, जिथे पैशांमुळे तुमच्या प्रवासाच्या अनुभवावर काही परिणाम होणार नाही. कारण भारतीय रुपया त्या देशांच्या चलनाच्या तुलनेत मजबूत चलन आहे.

चला तर मग जाणून घेऊया की, असे कोणते देश आहेत जिथे आपला रुपया मोठा आहे.

१. श्रीलंका

 

higherRupee value country.marathipizza
lanka.com

 

थरार आणि वन्यजीवन आवडणाऱ्या लोकांसाठी श्रीलंका हे प्रवासासाठी एक उत्तम ठिकाण आहे. तुम्हाला माहित आहे का ? की, हा देश जरी आकाराने लहान असला तरी देखील याला जगातील सर्वात मोठ्या पाच जैवविविधतांच्या संवेदक्षम स्थळांपैकी एक मानले जाते.

येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वन्य प्राणी पाहण्यास मिळतील.

येथे, १ भारतीय रुपया = २.५१ श्रीलंका रुपया

 

२. इंडोनेशिया

 

higherRupee value country.marathipizza1
condenast.co.uk

 

इंडोनेशिया हा देश १३४६६ लहान-मोठ्या बेटांनी तयार झालेले आहे. आपल्यातील बहुतेकांना समुद्रकिनारा आवडत असेलच, मग या देशाला भेट देणे तुम्हाला खूप आवडणार आहे. येथे समुद्रकिनाऱ्याबरोबरच वातावरण देखील खूप रम्य असते.

निळा समुद्र, मोहक संस्कृती, नृत्य, संगीत आणि फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा हे मन मोहून घेतात.

येथे, १ भारतीय रुपया = २०१.३९ इंडोनेशियन रुपीह

 

३. व्हिएतनाम

 

higherRupee value country.marathipizza2
govietnam.tours

 

व्हिएतनाममध्ये जुनी शहरे, किनारे, निळाशार समुद्र आणि बेटे हे पाहण्यासारखे आहे. व्हिएतनाममध्ये राईस वाईन आणि स्नेक वाईन प्रसिद्ध आहे. येथील भाषा ही सहा वेगवेगळ्या टोनमध्ये बोलली जाते. प्रत्येकवेळी टोन बदलली जात असल्याने शब्दांचा अर्थ तोच असूनदेखील भाषा समजण्यास कठीण जाते.

येथे, १ भारतीय रुपया = ३१४.१९ व्हिएतनामी डोंग

 

४. पराग्वे

 

higher rupeevalue.marathiipizza
nationsencyclopedia.com

 

पराग्वे हा देश देखील खूप सुंदर आहे. सुंदर धबधबे, डोंगररांगा, जंगल आणि निसर्गरम्य वातावरण हे अनुभवण्यासाठी या देशाला भेट नक्की द्यावी.

येथे, १ भारतीय रुपया = ९४.९४ पराग्वेयन गुआरानी

 

५. कंबोडिया

 

higherRupee value country.marathipizza4
wikimedia.org

 

कंबोडियाच्या जुन्या परंपरेनुसार येथे वाढदिवस साजरा केला जात नाही. येथील जुन्या लोकांना तर त्यांचे वाढदिवस कधी असतात, हे माहित देखील नाही. कंबोडियामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्यास मिळतील. या देशाच्या शहरामध्ये खूप खुले मार्केट आहेत.

येथे, १ भारतीय रुपया = ५५.८० कंबोडियन रिएल

 

६. आईसलँड

 

higherRupee value country.marathipizza5
intrepidtravel.com

 

आयलँडमध्ये कोणत्याही प्रकारचे जंगल नाही आहे. या देशात खूप अश्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील. आयलँडमध्ये कोणाचेही आडनाव नसते. येथे पारंपारिक नॉर्डिक नावाची प्रणाली नावांसाठी वापरली जाते. खूप सारा बर्फ पाहायचा असल्यास तुम्ही या देशाला नक्की भेट द्या.

येथे, १ भारतीय रुपया = १.८४ आईसलँडिक क्रोना

 

७. कोस्टा रिका

 

higherRupee value country.marathipizza6
express.co.uk

 

कोस्टा रिका हा एक असा देश आहे, ज्याला तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी भेट देऊ शकता. कोस्टा रिका हे सर्वाधिक भेट दिले जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे. जंगल, समुद्र किनारे आणि मस्त नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी कोस्टा रिकाला नक्की भेट द्या.

येथे, १ भारतीय रुपया = ८.११ कोस्टा रिकन कोलन

 

८. हंगेरी

 

higherRupee value country.marathipizza7
vajdahunyadcastle.com

 

हंगेरी एक असा विलक्षण देश आहे, जिथे ५ व्या शतकापासून मद्य बनवले जाते. हंगेरीमध्ये फ्रुट ब्रँडी खूप प्रसिद्ध आहे. जेव्हा तुम्ही हंगेरी देशाला भेट द्याल, तेव्हा तेथील बुडापेस्ट सिटी पार्कला नक्की भेट द्या.

या पार्कमध्ये एका अज्ञात माणसाचा पुतळा आहे आणि या पुतळ्याच्या हातामध्ये एक पेन आहे. येथे असे म्हटले जाते की, जर तुम्ही त्या अज्ञात पुतळ्याच्या हातातील पेनाला स्पर्श केलात तर तुम्ही उत्तमप्रकारे लिहू शकता.

येथे, १ भारतीय रुपया = ४.१० हंगेरियन फॉरिंट

असे हे आपल्यापेक्षा कमी किमतीचे चलन असलेल्या देशांना एकदातरी नक्की भेट द्या. मग वाट कसली बघताय, आता पैशांची चिंता न करता बिंधास फिरा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?