कधी विचार केलाय – एखाद्याला जांभई देताना पाहून आपल्याला जांभई का येते?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मंडळी तुमच्या मनात देखील कधी ना कधी हा प्रश्न आलाच असेल. पण हा प्रश्न हास्यास्पद किंवा तर्कहीन समजून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असेल. पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की खरंच या प्रश्नामागे एक विज्ञान आणि तर्कशुद्ध कारण आहे. जे एका संशोधनातून देखील सिद्ध झाले आहे आणि त्या संशोधनाचा निष्कर्ष आहे की, एखाद्याला जांभई आली की ती आपल्यालाही येते. हा सर्वसामान्य अनुभव आहे. म्हणूनच ती संसर्गजन्य असून जांभई देणाऱ्याचे इतर व्यक्तीशी असलेल्या संबंधांवर तिचा संसर्ग अवलंबून आहे.

Yawning-marathipizza01
sites.psu.edu

ईटलीच्या पिसा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की,

जांभई देताना एखाद्या व्यक्तीला बघितले किंवा ऐकले तरी व्यक्तीला जांभई येते, परंतु यामध्ये महत्त्वाचे आहे त्या व्यक्तीशी असलेले नाते. जवळचा नातेवाईक किंवा मित्राला आपण जांभई देताना पाहिले की याचा संसर्ग तातडीने होतो, असे या संशोधनात म्हटले आहे.

जांभई संसर्गजन्य असेल तर तिचा नातेवाइकांशी किती संबंध आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे, असे डेली टेलिग्राफने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

जांभई ही सामाजिक गटामध्ये घडणारी सहानुभूतीवर आधारित कृती असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. जांभईच्या शास्त्रीय अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी शंभराहून अधिक ज्येष्ठांचे निरीक्षण केले. कुटुंबातील सदस्यांमध्ये जांभई ही तुलनेने मित्र किंवा इतर घटकांपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचे यातून दिसून आले. नातेवाइकांत हे प्रमाण दहामध्ये आठ, तर अनोळखींमध्ये ते दहात केवळ एक असल्याचे आढळून आले.

Yawning-marathipizza02
health.thefuntimesguide.com

दुसरीकडे जांभई देण्यास उशीर झाला तर ती अधिक लांबण्याची शक्यता असते. हे परिचित व अपरिचित दोन्ही व्यक्तींबाबत घडू शकते. या प्रकल्पात जगातील विविध देशांतील लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यातून जांभईवर परिणाम करणारी काही तथ्ये गोळा करण्यात आली. यात राष्ट्रीयत्व, त्वचेचा रंग, भिन्न सांस्कृतिक सवई, सहभागी व्यक्तीचे वय, लिंग.

संशोधन प्रकल्पाच्या प्रोफेसर एलिझाबेटा पालागी यांनी म्हटले आहे की,

याशिवाय दोन व्यक्तींमधील नातेसंबंध हे ते घटक असतात . मुलांमध्ये जांभईची ही संसर्गजन्य प्रक्रिया पहिल्या पाच वर्षांपर्यंत विकसित होत नाही. त्यामागे भावना हे कारण सांगण्यात आले आहे. इतरांच्या भावना नीटपणे समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झालेली नसते.

Yawning-marathipizza03
i.dailymail.co.uk

परिचित व्यक्तीच्या सहवासात जांभई येते. त्याचबरोबर अनोळखी व्यक्तीला जांभई देतानादेखील जांभई येण्याची वृत्ती होते किंवा त्याला टाळण्यात येते. या शास्त्रज्ञ सामाजिक सहानुभूतीची संकल्पना देतात. ही बाबदेखील संशोधनातून आढळून आली आहे.

आहे की नाही अजब गोष्ट!!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?