' भारताचं स्वप्न पूर्ण करणारा पडद्यामागचा सुत्रधार अर्थात मेट्रोमॅन : डॉ. ई. श्रीधरन – InMarathi

भारताचं स्वप्न पूर्ण करणारा पडद्यामागचा सुत्रधार अर्थात मेट्रोमॅन : डॉ. ई. श्रीधरन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काळ नुकतंच मोदीजी पुण्यात येऊन गेले, पुणे मेट्रोच्या उदघाटनाच्या निमित्ताने मोदीजी पुण्यात आले होते. या उदघाटनाच्या प्रसंगी राजकीय मंडळींनी एकमेकांना कोपरखळ्या देखील मारल्या, अनेक वर्षांपासून रखडलेला मेट्रोचा प्रश्न मार्गी लागला.

आज भारतातील मेट्रो शहरांमध्ये मेट्रो सुरु होत आहे, मेट्रोवर अनेकजण अहोरात्र काम करत असतात. अशीच एक व्यक्ती आहे जिला मेट्रोमॅन म्हंटले जाते त्याव्यक्तीबद्दल आजच्या लेखात जाणून घेणार आहोत…

डॉ. ई. श्रीधरन हे नाव तसे तुम्हा आम्हा सामान्य माणसांसाठी अपरिचित. पण जेव्हा कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रो सारख्या मोठ्या प्रकल्पांची नावे घेतली जातात आणि हाच मनुष्य त्या प्रकल्पांमागचा सूत्रधार होता हे आपल्या लक्षात येते तेव्हा मात्र आपसूकच आपले डोळे विस्फारले जातात.

 

E_Sreedharan-marathipizza01
wikimedia.org

 

डॉ. ईलात्तुवलपिल श्रीधरन यांचा जन्म केरळमधील पालघाट जिल्ह्यातील एका खेडेगावात १२ जून १९३२ रोजी झाला होता. श्रीधरन यांनी काकीनाडा येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर १९५४ मध्ये त्यांनी दक्षिण रेल्वेत साहाय्यक अभियंता म्हणून कारकीर्दीस सुरुवात केली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१२५ स्पॅनचा रेल्वे पूल ४६ दिवसांत पूर्ण करणे हा त्यांच्या आयुष्यातील पहिला प्रकल्प ठरला ज्याने त्यांना ओळख मिळवून दिली. त्यासाठी १९६३ मध्ये त्यांचा रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.

हा पूल सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार होता. त्यानंतर त्यांनी १९७० ते १९७५ पर्यंत देशातील पहिली मेट्रो रेल्वे सेवा सुरू करण्यात उपमुख्य अभियंता म्हणून भूमिका बजावली.

ते रेल्वेच्या सर्व प्रकल्पांचे प्रभारी राहिले. १९९० मध्ये कोकण रेल्वे प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक व चेअरमनपदी निवड हे त्यांच्या जीवनातील सर्वात मोठे यश होते.

कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ५ नोव्हेंबर १९९७ रोजी ते डीएमआरसीचे पहिले एमडी बनले.

काहीही करण्याची क्षमता आणि शिस्त या दोन गुणांसाठी श्रीधरन यांना ओळखले जाते. त्यांच्या या गुणांमुळेच दिल्लीतील एका खूप मोठ्या भागात मेट्रोचा विस्तार होऊ शकला.

पहिल्या टप्प्यात ६५ कि. मी. लांबीचा मेट्रो मार्ग त्यांनी निर्धारित वेळेआधी म्हणजेच दोन वर्षे नऊ महिन्यांत पूर्ण केला, त्याचबरोबर भारतात कोणताही प्रकल्प निर्धारित वेळेत व कमी खर्चात पूर्ण होऊ शकत नाही असे म्हणणाऱ्या लोकांची तोंडे त्यांनी बंद केली.

उत्कृष्ट कामाच्या बळावर ते डीएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक बनले आणि १४ वर्षे या पदावर राहिले.

दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मेट्रो मॅनवर पूर्ण विश्वास दाखवला आणि सरकारने त्यांना पाचवेळा मुदतवाढ दिली.

 

E_Sreedharan-marathipizza02
topyaps.com

 

२००९ रोजी जमरूदपूरमध्ये झालेल्या एका अपघातात ५ लोक मृत्युमुखी पडल्यानंतर आपण डीएमआरसीच्या प्रमुखपदी राहणे योग्य नाही.असे ते म्हणाले होते.

तथापि, आठ तासांनंतर सार्वजनिक परिवहनाच्या भविष्याचा हवाला देत दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित त्यांचा राजीनामा स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले होते.

त्यानंतर श्रीधरन यांनी घोषणा केली होती की, दिल्ली मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यानंतर आपण निवृत्त होऊ.

मात्र याआधीही अनेकवेळा त्यांनी निवृत्तीची मागणी केली होती. मात्र, सरकारने ती फेटाळली होती आणि त्यांना पाचवेळा मुदतवाढ दिली होती.

वेळेच्या भानाचे श्रीधरन यांच्यापेक्षा दुसरे सर्वश्रेष्ठ उदाहरण आढळणार नाही.

१९६३ मध्ये आलेल्या एका वादळामुळे रामेश्वरमला तामिळनाडूच्या मुख्य भूभागाशी जोडणाऱ्या पंबन पुलाचे जबर नुकसान झाले होते.

रेल्वेने या पुलाच्या दुरुस्तीसाठी सहा महिन्यांची कालमर्यादा निश्चित केली. ती श्रीधरन यांच्या तत्कालीन बॉसने, ज्यांच्या अखत्यारीत हा पूल येत होता त्यांनी ती घटवून तीन महिने केली आणि त्याची जबाबदारी श्रीधरन यांच्यावर सोपवली. त्यांनी हे काम अवघ्या ४६ दिवसांत पूर्ण केले.

 

E_Sreedharan-marathipizza03
i.dailymail.co.uk

 

सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर हा काही पर्याय ठरू शकत नाही, असे डॉ. ई. श्रीधरन मानतात.

त्यांच्यासाठी पारदर्शकता, कार्यक्षमता, उत्तरदायित्व, सर्व्हिस ओरिएंटेशन व सहभाग या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यांनी आतापर्यंतच्या आपल्या सर्व प्रकल्पांमध्ये त्याच्याशी निगडित सर्व पक्षांचा सहभाग राहील, याची काळजी घेतलेली आहे.

असे हे थोर व्यक्तिमत्त्व  इन्स्टिट्यूट ऑफ द सिव्हिल इंजिनिअर्स (यूके), द चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सपोर्ट (यूके), द इन्स्टिट्यूट ऑफ रेल्वे ट्रान्सपोर्ट (भारत) तसेच द नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअर्स (भारत) या संस्थांचे फेलो देखील आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?