अत्यंत स्फूर्तीदायक फळ – ‘केळी’ : आहारावर बोलू काही – भाग ८

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : फळांच्या राजाचे तुम्हाला अजिबात माहित नसलेले असेही फायदे : आहारावर बोलू काही – भाग ७

===

केळ हे खाद्य फळ असुन त्याचे शास्त्रीय नाव Musa Acuminata आहे.

banana-marathipizza01
i.ndtvimg.com

पोषणमुल्ये:

Calories 89 %

Total Fat 0.3 g0%

Saturated fat 0.1 g0%

Polyunsaturated fat 0.1 g

Monounsaturated fat 0 g

Cholesterol 0 mg0%

Sodium 1 mg0%

Potassium 358 mg10%

Total Carbohydrate 23 g7%

Dietary fiber 2.6 g10%

Sugar 12 g

Protein 1.1 g2%

Vitamin A 1%

Vitamin C14%

Calcium0%

Iron1%Vitamin D 0%

Vitamin B-6 20%

Vitamin B-1 20%

Magnesium27mg

 

केळीतील जीवतत्वांचे प्रमाण पाहता ते अत्यंत स्फुर्तीदायक फळ आहे. व्यायामापुर्वी खाण्यास उत्तम फळ आहे. तंतुबाहूल्य असल्यामुळे बद्धकोष्टतेसाठी उपयुक्त ठरते. केळातील पोटॅशिअम हा घटक धमनीविस्फारण(vasodialation )करतो.त्यामुळे ऊच्च रक्तदाबाच्या रूग्णांमध्ये ऊपयुक्त ठरते. तसेच पोटॅशिअम शरीरातील द्रवपातळी (fluid level) नियमीत करून पोषणद्रव्ये व मल यांच्या पेशीतील देवाण घेवाणीस मदत करते. पोटॅशिअम हा घटक पेशिंचे आकुंचन व मज्जावाहिन्यांच्या प्रतिक्रिया (nerve response) यास मदत करते.

banana-marathipizza02
i.ndtvimg.com

मुत्राश्मरी(kidney stone)चे प्रमाणही पोटॅशिअम ने कमी होते. केळातील मॅगनेशिअम या घटकामुळे चयापचय क्रिया चांगली राहते. vitC हा घटक प्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत करतो. केळीमध्ये असणारे vit b6 हे मज्जासंस्था मजबुत करते. यातील प्रोबायोटीक बॅक्टेरीया आहारातील कॅल्शीअमच्या शोषणास मदत करते. बद्धकोष्ठतेस मदत करत असल्याने अर्श (मुळव्याध), भगंदर अशा रोगांमध्ये ऊपयुक्त ठरते.

टीप- Latex allergy असणाऱ्या व्यक्तीनी केळी खाऊ नये .

केळफुल

केळिचे फुल (केळफुल ) हे औषधिय दृष्ट्या अत्यंत ऊपयुक्त आहे. पोषणमुल्ये बहुतांशी केळीप्रमाणेच असुन फायदे पुढीलप्रमाणे आहेत. जीवनसत्व c व A अधिक प्रमाणात असते. मॅगनेशिअम,काॅपर, लोहतत्व यात भरपुर असते. तसेच dietory fiber ही अधिक असते.

औषधीय ऊपयोग

1) वेदनाशामक आहे.

2) ही फुले ethenol नामक द्रव स्त्रवतात. ज्यामुळे pathogenic growth ला आळा बसतो. व कुठलेही infection लवकर बरे होते.

3) Fibre प्रमाण अधिक असल्याने प्रसुतीपुर्व काळातील बद्धकोष्ठता कमी करते.

4) लोहाधिक्यामुळे रक्तवर्धक ठरते.

5) त्यामुळे प्रसुतिपुर्व काळात अवश्य खावे.

6) तसेच केळफुल स्तन्यजननास मदत करते. म्हणून प्रसुतीनंतरही ऊपयुक्त ठरते.

7) रक्तशर्करा कमी करण्यास मदत करते.

8) Antioxidentsअधिक प्रमाणात असल्याने Anti-aging आहे.

9) मॅगनेशिअम अधिक असल्याने antidepressent सारखे काम करते. स्त्रीयांनी अवश्य खावे.

10) progesteron ची निर्मीती वाढवुन मासीक पाळीतील अतिरीक्त रक्तस्त्राव थांबवण्यात मदत करते.

banana-marathipizza03
pixabay.com

11) ग्रामीण भागात मासिक पाळीनंतरही अतिरक्तस्त्राव (Menorrhagia) होत असेल तर केळफुल व दही एकत्र खाण्यास देतात. त्याचे ऊत्तम परीणाम मिळाले आहेत.

12) आयुर्वेदाने केळफुल कृमीहर सांगीतले आहे. Worm Infestation मध्ये उपयुक्त ठरते. तसेच ते शुलशामक सांगीतले असून पोटदुखीत सुद्धा उपयुक्त ठरते.

13) तसेच ”रूचीवर्धक” सांगितले आहे. त्यामुळे ज्वर, पचनेसंबधीत व्याधी यानंतर निर्माण होणारी अरूची (nausea) यात हे ऊपयुक्त ठरते.

14) केळफुल हे शीतल गुणात्मक सांगितले आहे. त्यामुळे ऊन्हाळ्यात आहारात अवश्य वापरावे.

15)तसेच आयुर्वेदानुसार हे पित्ताचे नियमन करते असे वर्णिले आहे .पित्तजन्य व्याधी (gastritis,burning feet etc) यात अवश्य वापरावे.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?