जगातील वाहतुकीचे १० भन्नाट नियम…

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

या धावत्या जगाशी आपल्याला संतुलन राखण्यास, मागे पडू न देण्यात मदत करते ती आपली गाडी. वाहन हे आपल्यासाठी एक सोयीचे साधन आहे. ज्याने आपण स्वतःला जास्त कष्ट न देता प्रवास करू शकतो. पण जगातील प्रत्येक देशाने आपल्यासारख्या वाहनचालकांसाठी काही नियम आखून ठेवले आहेत. जे आपल्यालापाळावेच लागतात. जसे आपण आपल्या देशात पाळतो…. भारतातील ट्राफिक रुल्स हे जर तुम्हाला खूप कठीण किंवा अति वाटत असतील तर हा लेख वाचल्यावर तुमचा हा समज नक्कीच दूर होईल.

जगात काही असे देश आहेत ज्यांचे ट्राफिक रुल्स ऐकाल तर तुमचं डोक चक्रावेल… चला पाहूयात मग काय आहेत या देशांचे भन्नाट ट्राफिक रुल्स..

१. थायलंड : 

weard driving rules-marathipizza
pattayarentacar.com

 

थायलंड म्हणजे पर्यटकांसाठी मेजवानीच. वर्षभर येथे पर्यटकांची रीघ बघायला मिळते. त्यामुळेच थायलंड हा देश पर्यटनासाठी जगात अतिशय लोकप्रिय आहे. पण येथे वाहनचालकांसाठी असणार्‍या कायद्यात एक कायदा असा आहे की, उघड्या अंगाने तुम्ही येथे वाहन चालवू शकत नाही. म्हणजे पुरूष चालक असेल तरी त्याला विनाशर्ट वाहन चालविण्यास मनाई आहे. कितीही उकाडा असला तरी हा नियम वाहनचालकांचा पाळावा लागतो अन्यथा ३०० ते ४०० रूपये दंड आकारला जातो.

२. सायप्रस :

weard driving rules01-marathipizza
eatthis.com

सायप्रस हा देश तिथल्या बिचेस साठी खूप प्रसिद्ध आहे. या देशात वाहन चालविताना चालकाला काहीही खाणेपिणे करता येत नाही. जर वाहन चालविताना तुम्ही काही खाताना अथवा पिताना पकडल्या गेले तर तुमच्यावर दंड ठोठावण्यात येईल.

३. चीन : 

weard driving rules02-marathipizza
express.co.uk

चीन या देशांत वाहनांची संख्या खूप आहे, तसेच येथे हर प्रकारची वाहने रस्त्यावर फिरताना दिसतात. चीनमधील रस्त्यांवर गर्दीही खूप असते. त्यामुळे वाहनचालकांना कोणत्याही परिस्थितीत फुटपाथवरून गाडी नेता येत नाही. फुटपाथवर पार्क केलेल्या गाड्या येथे तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत आणि असे आढळले तर २५० रूपये दंड भरावा लागतो.

४.जपान : 

weard driving rules03-marathipizza
blogspot.in

जपानमध्ये वाहनचालकांसाठी नियम मुळातच कडक आहेत. मात्र एका नियमानुसार रस्त्यात पाणी साठले असेल व तुमच्या कारमुळे ते उडविले गेले तर ते बेकायदेशीर मानले जाते आणि  त्यासाठी शिक्षेची तरतूद देखील आहे.

५. रशिया : 

weard driving rules04-marathipizza
pistonheads.com

राशियातील मास्को येथे तुम्ही रस्त्यावर घाणेरडे वाहन आणू शकत नाही, असा नियम आहे. तुमची कार रस्त्यावर येते तेव्हा ती स्वच्छ असायलाच हवी असा नियम असून तो मोडल्यास ३४०० रूपये दंड भरावा लागतो. विचार करा जर असा नियम भारतात असता तर…

६. स्पेन :

weard driving rules05-marathipizza
hellehollis.com

हा आणखी एक भन्नाट नियम, स्पेनमध्ये वाहनचालक वाहन चालविताना स्लीपर घालू शकत नाही आणि एवढच नाही तर ते पायात काहीच न घालता म्हणजे अनवाणीही वाहन चालवू शकत नाहीत. तसेच हाय हिल्स घालूनही येथे वाहन चालविण्यावर बंदी आहे. म्हणजे सर्वांनी बूट घालूनच वाहन चालवावे असा नियम आहे तिथे. इथे आणखी एक अजब कायदा आहे, तो म्हणजे जर तुम्हाला चष्मा असेल, तर गाडी चालविताना तुमच्या जवळ कारमध्ये एक अतिरिक्त चष्मा ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

७. स्वीडन : 

weard driving rules06-marathipizza
shutterstock.com

स्वीडनमध्ये तुम्ही भरदिवसा गाडी चालवित असलात तरी देखील गाडीचे हेडलाईट सुरू ठेवणे बंधनकारक आहे. थंडीच्या दिवसांत हेडलाईट बंद करून कुणी दिसले तर त्याला जागेवर दंड ठोठावला जातो. सरकारने हा नियम अपघात होऊ नयेत यासाठी केला आहे.

८. अमेरिका : 

weard driving rules-07-marathipizza
wired.com

अमेरिकेतील डेनेव्हर येथे रविवारी काळ्या रंगाची कार अथवा वाहन रस्त्यावर आणता येत नाही. हा नियम मोडल्यास दंड अथवा शिक्षेची तरतूद आहे.

९. स्वित्झर्लंड : 

weard driving rules-08-marathipizza
rvcj.com

स्वित्झर्लंड या देशात रविवारी कार धुण्यावर बंदी आहे. म्हणजे तुम्ही येथे रविवारी तुमची कार धुवू शकत नाही. असे करताना जर कुणी आढळले तर त्याच्यावर दंड ठोठावला जातो.

१०. फिलिपिन्स :

weard driving rules09-marathipizza
liveinthephilippines.com

फिलिपिन्समधील मनीला येथे जर वाहनाच्या नंबरप्लेटवर शेवटचा आकडा १ किवा २ असेल तर ते वाहन सोमवारी रस्त्यावर आणता येत नाही.

Just Imagine  जर या देशांसारखे कायदे आपल्या देशात असतील तर… काय होईल आपलं ? करा विचार…

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?