' मोजकेच पैसे खिशात असतांना आयुष्य पणाला लावून "यश" मिळवणारा अवलिया...

मोजकेच पैसे खिशात असतांना आयुष्य पणाला लावून “यश” मिळवणारा अवलिया…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फिल्ममेकिंग एक असं क्षेत्र आहे जेथे प्रत्येकालाच यश मिळेल असे नाही. अनिश्चितता या क्षेत्रात ठासून ठासून भरली आहे. प्रत्येक दिग्दर्शकाला नवीन काहीतरी एक्सपिरीमेंट केल्याशिवाय यशाची चव चाखायला मिळतच नाही. पण हे एक्सपिरीमेंट करतानाही काळजी घ्यावी लागते.

प्रेक्षकांना काय आवडेल? समीक्षक काय म्हणतील? सामाजिकरित्या आपला चित्रपट कसा मान्य केला जाईल याचा विचार करणे देखील गरजेचे असते आणि अश्या तरंगत्या नावेमध्ये पाय रोवून सुकाणू हातात धरणे प्रत्येकालाच जमतेच असे नाही – कारण –

प्रत्येकजण अनुराग कश्यप नसतो…!

 

anurag-kashyp-marathipizza01
saddahaq.blob.core.windows.net

 

बॉलीवूडच्या मॉडर्न, इंडिपेंडंट चित्रपटांचा पोस्टर बॉय आणि नवोदित दिग्दर्शकांना आपल्या प्रोडक्शन हाऊसचा आसरा देणारा गॉड फादर म्हणून त्याची ओळख आहे.

खरंतर अनुराग वर देखील कोण्या फिल्म इंडस्ट्रीमधील मोठ्या व्यक्तीचा हात नव्हता, तो स्वत: स्वत:च्या मेहनतीने इथवर आला आहे, त्यामुळे तो कष्टाची आणि कष्ट करणाऱ्यांची कदर करतो.

गोरखपूरमध्ये जन्मलेला अनुराग तसा लहानपणापासूनच शांत होता. शाळेत मित्रांसमवेत वेळ घालवण्यापेक्षा लायब्ररीमध्ये जाऊन वाचन करणे त्याला पसंत असे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

म्हणतात ना वाचन तुम्हाला वेगळा विचार करण्यात आणि चाकोरीबाहेरच्या कल्पना फुलवण्यात मदत करतं. अगदी तसंच होत हे. अनुराग तयार होत होता. नकळत तो शब्दांच्या विश्वात गुरफटत चालला होता.

पण अनुरागला तर वैज्ञानिक बनायचं होतं. त्या दृष्टीने पहिले पाउल टाकत त्याने हंसराज कॉलेजमध्ये झु-लॉजी विषय निवडत प्रवेश केला. पण जे नशिबात नाही त्यात यश तरी कसं येणार?

शेवटी वैज्ञानिक होण्याचा विचार झटकून १९९२ मध्ये अनुरागने जननाट्य मंचामध्ये प्रवेश केला. येथून तो नाटक आणि चित्रपटांच्या कधीही न अनुभवलेल्या आणखी एका वेगळ्या विश्वात येऊन पोहोचला.

१९९३ चे ते वर्ष अनुरागसाठी कलाटणी देणारे ठरले, कारण याचं वर्षी त्याच्या एका मित्रासोबत त्याला एका फिल्म फेस्टिव्हलला जाण्याची संधी मिळाली. त्या १० दिवसांच्या फिल्म फेस्टिव्हलच्या काळात अनुरागने ५० पेक्षा जास्त फिल्म्स पाहिल्या.

त्या फिल्म्स पाहून शब्द मांडण्याचे प्रभावी साधन सिनेमाशिवाय दुसरे काही असूच शकत नाही असे त्याला वाटले आणि सुरु झाला त्याचा फिल्ममेकर बनण्याचा प्रवास!

 

anurag-kashyp-marathipizza02
static.koimoi.com

 

३ जून १९९३ रोजी भर पावसाच्या वेळेस अनुराग खिश्यात केवळ ५००० रुपये घेऊन मुंबईमध्ये दाखल झाला आणि खरं स्ट्रगल काय असतं याची त्याला जाणीव झाली.

खिश्यातले पैसे संपले, कोणी काम देत नव्हतं. शेवटी नाईलाजाने पृथ्वी थियेटरमध्ये फुकट वेटरचे काम करण्यास त्याने सुरुवात केली. पण हे काम करणे म्हणजे देखील त्याच्यासाठी भाग्याचे होते, कारण त्याकाळी पृथ्वी थियेटरमध्ये बॉलीवूडमधल्या कलाकारांचा गोतावळा जमत असे. म्हणजे कुठेना कुठे तरी आपलयाला संधी मिळेल अशी भाबडी आशा मनात ठेवून हा भावी दिग्दर्शक वेटरच्या भूमिकेत शिरला.

पण त्याचे नशीब उजळायला बराच अवकाश होता. असे कित्येक महिने निघून गेले. दरम्यानच्या काळात १९७६ मध्ये आलेला मार्टिन सोर्सीसचा जगप्रसिद्ध चित्रपट टॅक्सी ड्राईव्हर अनुरागच्या पाहण्यात आला आणि आपण दिग्दर्शनाऐवजी लेखनाकडे वळावे असे त्याच्या मनात आले.

९० च्या दशकात डेली सोप्सची बरीच चलती होती. प्रोडक्शन हाऊसना देखील भरपूर लिखाण करणाऱ्या लेखकांची गरज असायची. नशिबाने अनुरागला असे काम मिळाले आणि शांती, स्वाभिमान या गाजलेल्या सिरियल्ससाठी त्याने मोफत लेखन केले. त्याचे नाव होऊ लागले.

त्रिकाल हा पहिला शो ठरला ज्यासाठी अनुरागला ऑफिशियल क्रेडीट देण्यात आले. त्याचं नशीब बदलू लागलं होतं.

त्याला थेट महेश भट्ट कडून एक डेली सोप आणि तीन चित्रपटांच्या कथा लिहिण्याची ऑफर मिळाली. महेश भट्ट त्याला या कामासाठी अडीच लाखांच मानधन देण्यास तयार होते, पण अनुरागने ही ऑफर नाकारून सगळ्यांनाच धक्का दिला, त्याच्या घरचे तर त्याच्यावर खूप नाराज झाले.

अनुरागच्या मते या कामात पैसा होता, पण समाधान नव्हते, म्हणून त्याने महेश भट्टची ऑफर नाकारून राम गोपाल वर्माचा सत्या ह्या चित्रपटाची कथा लिहिण्याचे काम हाती घेतले, यासाठी त्याला महिन्याला मिळणार होते केवळ १० हजार रुपये.

anurag-kashyp-marathipizza03
jamuura.com

 

अनुराग कश्यपने सौरभ शुक्ला यांच्या साथीने ह्या चित्रपटाची कथा लिहिली. चित्रपट तयार झाला. पण बॉक्स ऑफिसवर आपटला.

अनुराग पुन्हा एकदा निराश झाला. पण हार न मानता त्याने लो बजेट फिल्म्सच्या कथा लिहिण्याचे काम हाती घेतले. ज्यात शूल, कौन, रात यांसारख्या चित्रपटांचा समावेश होता.

पण यातील एकाही फिल्मने अनुरागच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. शेवटी जे काही होईल ते पाहता येईल असा विचार करून अनुराग दिग्दर्शनाकडे वळला.

१९९९ मध्ये अनुरागने आपला पहिला चित्रपट तयार केला त्याचे नाव होते – पांच! पण दुर्दैवाने अतिशय खालच्या पातळीचा चित्रपट म्हणून त्यावर टीका केली गेली आणि हा चित्रपट कायमचा बॅन करण्यात आला. पण थांबेल तो अनुराग कसला…

त्याने १९९३ च्या मुंबई साखळी स्फोटावर आधारित ब्लॅक फ्रायडे हा चित्रपट बनवला…ज्यात काहीच काल्पनिक नव्हतं…नेत्यांच्या, आरोपींच्या नावांपासून सारं काही खरं दाखवण्यात आलं होतं,. पण हा चित्रपट सुद्धा सुप्रीम कोर्टाने तब्बल २ वर्षे अडकवून ठेवला…!

हा बॉलीवूड मधला एकमेव दिग्दर्शक म्हणावा लागेल ज्याचा प्रत्येक चित्रपट वादग्रस्त ठरला, ज्याची चर्चा झाली.

कमीत कमी बजेटमध्ये चित्रपट बनवणे हे अनुरागचे प्राथमिक ध्येय असते, कारण दिग्दर्शक चित्रपट बनवतो, प्रोड्युसर नाही, त्यामुळे दिग्दर्शकाने कमीत कमी किंमतीमध्ये प्रोड्यूसरला चित्रपट बनवून दिला पाहिजे कारण जरी चित्रपट अयशस्वी ठरला तरी प्रोड्यूसर कंगाल होत नाही असे अनुरागाचे मत!

गुलाल, गँग्ज ऑफ वासेपूर, दॅट गर्ल इन यलो बूट्स हे सर्व चित्रपट त्याने कश्या प्रकाराने आणि किती कमी खर्चात बनवले यावर देखील एक चित्रपट होऊ शकतो…असा आहे हा प्रतिभावंत दिग्दर्शक!

 

anurag-kashyp-marathipizza04
youtube.com

 

त्याने बॉम्बे वेलवेट चित्रपटामधून बड्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम करण्याचा प्रयत्न केला, पण त्या चित्रपटाची काय अवस्था झाली ते तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही.

तेव्हापासून मोठ्या बजेटचे चित्रपट बनवणार नाही अशी जणू त्याने भीष्मप्रतिज्ञा केली आहे.

 

bombayvelvet InMarathi

 

पण आज एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्याने नाव कमावले आहे हे नक्की. ज्या मार्टिन सोर्सीसचा चित्रपट पाहून अनुराग ने आपले सर्वस्व झोकून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले आज त्याच मार्टिन सोर्सीसच्या नावाने जग त्याला भारताचा मार्टिन सोर्सीस म्हणून ओळखतो यातच त्याचे यश समावलेले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “मोजकेच पैसे खिशात असतांना आयुष्य पणाला लावून “यश” मिळवणारा अवलिया…

  • April 5, 2019 at 8:03 pm
    Permalink

    Inspirable personality

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?