'फोन हरवलाय? चोरीला गेलाय? फिकर नॉट....'ही' पद्धत तुमची मदत करेल!

फोन हरवलाय? चोरीला गेलाय? फिकर नॉट….’ही’ पद्धत तुमची मदत करेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

अन्न, वस्त्र, निवारा या तर आपल्या मुलभूत गरजा आहेतच, पण या २१ च्या शतकात त्यात अजून एका अति महत्त्वाच्या गरजेची वाढ झाली आहे ती गरज म्हणजे मोबाईल फोन!

मोबाईल फोन एका सेकंदासाठी जरी दूर झाला तरी जीव कासावीस होतो. एकवेळ जेवण मिळालं नाही तर चालेल पण मोबाईल फोन हवा अशी सध्याची गत आहे. अश्या वेळेस जर मोबाईल फोन हरवला तर मात्र जणू आपलं हृदय थांबलंय की काय अशी अवस्था होते.

कारण त्या फोनमध्ये आपला महत्त्वाचा डेटा देखील असू शकतो. ज्याचा कोणीही गैरवापर करू नये अशी आपली तीव्र इच्छा असते. मग काय…पळापळ करण्याशिवाय पर्याय नसतो.

इकडे शोध, तिकडे शोध आणि तरी काही पत्ता लागला नाही की पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करण्याशिवाय पर्याय नसतो.

पण पोलीस देखील तुमचा फोन आणून देतील की नाही याची खात्री नसते. तर मंडळी हे सगळ तुमच्या बरोबर होऊ द्यायचं नसेल, तुमचा हरवलेला फोन तुम्हाला लवकरात लवकर परत मिळवायचा असेल तर खालील माहिती तुम्ही नक्कीच वाचली पाहिजे.

 

phone-theft-marathipizza011
dignited.com

हरवलेला फोन शोधून काढण्याचे तसे बरेच पर्याय आहेत, पण आज आम्ही तुम्हाला जो पर्याय सांगणार आहोत तो सर्वात विश्वसनीय, सोपा पण जास्त लोकांना माहित नसणारा असा आहे.

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण तुमचा हरवलेला फोन गुगल शोधून देऊ शकतं…१००%

यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे जीमेल अकाऊंट असायला हवं. या जीमेल अकाऊंटने तुम्ही त्तुमाच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोरवर लॉग इन करा, झालं तुम्ही पहिली स्टेप पूर्ण केली आहे. आता कधी तुमचा फोन हरवला तर तुम्हाला फक्त एका कॉम्प्यूटरची सोय करायची आहे आणि त्यामध्ये खाली स्टेप्स करायच्याय…

 

google-marathipizza
madeby.google.com

आता खालील चित्र नीट पहा, त्यात रेड बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर लॉग इन करा. त्यानंतर जे पेज ओपन होईल त्यात फाईन्ड युअर फोनचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा आणि तुम्ही अजून एका वेबपेजवर जाल.

 

google-marathipizza01

हे उघडलेलं नवीन पेज खाली दिसतंय त्याप्रमाणे असेल. त्यात तुम्हाला तुमच्या फोन बद्दलची माहिती दिसेल. हा तो फोन असेल ज्यातून तुम्ही तुमचं गुगल अकाऊंट लॉग इन केलं असेल.

 

google-marathipizza02

 

तुमच्या फोनवर क्लिक करा आणि तुमच्या समोर अजून एक पेज ओपन होईल जे खालीलप्रमाणे दिसेल.

 

google-marathipizza03

यापैकी योग्य तो पर्याय निवडून तुम्ही तुमचा फोन परत मिळवू शकता किंवा तो फोन लॉक करून त्यातील डेटा सुरक्षित ठेवू शकता, पण त्यासाठी तुमचा फोन इंटरनेटशी कनेक्ट असणे गरजेचे आहे.

काय ,म्हणता? आहे की नाही जबरदस्त मार्ग!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?