ह्यांच्या सौंदर्यावर भाळू नका, कारण ही सरोवर क्षणार्धात एखाद्याचा जीव घेऊ शकतात!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

समुद्र किनारा, नदी, सरोवरे, जलाशये हे नैसर्गिक सौंदर्य दर्शवतात. एखाद्या संध्याकाळी नदीच्या किंवा समुद्राच्या किनारी बसून तिथली शांतता अनुभवणे म्हणजे जीवनातील सर्व चिंतांचे निराकरण झाल्या सारखे वाटते. असे हे पाणी सर्वांनाच नेहमी आपल्याकडे आकर्षित करते, पाण्याची ओढ सर्वांना असते. हेच पाणी आपल्यासाठी जीवनदायीही आहे. पाण्याविना आपण जगू शकत नाही. त्यामुळेच आपण या जीवनदायी नद्या आणि सरोवरांना पुजतो. पण याच जीवनदायी सरोवरांपैकी काही सरोवरे अशीही आहेत जे जीवदायी नाहीतर जीवघेणे आहेत. आश्चर्य होत आहे ना… पण हे खार आहे, जगात अशी काही सरोवरे आहेत जी दिसायला तर अतिशय सुंदर आहेत पण जीवघेणी देखील आहेत.

आज आम्ही अशाच काही सरोवरांची माहिती घेऊन आलो आहोत…

१. लेक नेट्राॅन : 

lake natron-marathipizza
pandotrip.com

टांझानियातील लेक नेट्राॅन (Lake Natron) हे ‘गुलाबी सरोवर’ म्हणून प्रसिद्ध आहे. या सरोवरातील पाण्यात मीठ व सोडा यांचे प्रमाण खूप जास्त आहे. तर पाण्याचे तापमानही १४० अंशापर्यंत असते. म्हणजेच येथे पाण्याला स्पर्श करणे देखील जीवावर बेतू शकते.

२. डोमिनिका सरोवर :

boiling-lake-dominica-marathipizza
amusingplanet.com

डोमिनिका या कॅरेबियन देशातील डोमिनिका सरोवर हे ‘बॉयलिंग लेक’ (Boiling Lake)म्हणजे उकळते सरोवर म्हणून जगप्रसिद्ध आहे. हे सरोवर अतिशय धोकादायक आहे. या सरोवराचे तापमान १९४ अंशांपर्यंत असते.

३. रिओ टिटो : 

rio-tinto-river-marathipizza
orangesmile.com

स्पेन मधील रिओ टिंटो (Rio Tinto) हे पाण्याचे नव्हे तर ऍसिडचे सरोवर आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. या सरोवरच्या पाण्यात अॅसिडची मात्रा मोठ्या प्रमाणात आहे. नासातील वैज्ञानिकांनी या सरोवरातील पाण्याची तपासणी केली तेव्हा असे दिसले की, या पाण्याचे तापमान मंगळ ग्रहाएवढे आहे.

४.लेक न्यॉस :

lake nyos-marathipizza
geo.arizona.edu

कॅमेरून मधील लेक न्यॉस (Lake Nyos) हे एक ज्वालामुखी सरोवर आहे. या पाण्यात कार्बन डाय ऑक्साईडची मात्रा अधिक आहे. ऑगस्ट १९८६ मध्ये या सरोवराच्या सानिध्यात राहणारे १७०० नागरिक रात्री जे झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. गुदमरल्यामुळे या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

५. मानोलेक :

Mono-lake-marathipizza
wikipedia

कॅलिफोनिर्यातील मानो लेक (Mono Lake) या सरोवरातही मीठ व सोडा यांचे प्रमाण खूप जास्त आहे. तसे तर हे पाणी पाहायला एकदम स्वच्छ दिसते मात्र ते अतिशय जड आहे. त्यात कार्बोनेट जास्त असल्याने त्याची पीएच व्हॅल्यू १० इतकी प्रचंड आहे. त्यामुळे या पाण्यापासून दूर राहणेच बरे.

६.बर्कली पिट :

Berkeley-Pit-marathipizza
failuremag.com

मोंटानियातील बर्कली पिट (Berkeley Pit) या सरोवराचे पाणी अॅसिडीक असून यात अनेक रसायने मिसळलेली आहेत. असे सांगतात की, खूप वर्षांपूर्वी या सरोवरचे पाणी पिण्यासाठी वापरले जात होते, मात्र नंतर हे पाणी अधिकाधिक खराब होत गेले व आता ते वापरण्यायोग्य राहिलेले नाही.

७. सितराम नदी :

citarum river-marathipizza
austroindonesianartsprogram.org

इंडोनेशियातील सितराम नदी (Citarum River) ही इंडोनेशियातीळ सर्वात मोठी आणि सर्वात लांब नदी आहे. तसेच ही जगातील सर्वाधिक प्रदूषित नदी असल्याचे सांगितले जाते. या नदीच्या पाण्यात शिसे, कॅडमियम, क्रोमियम हे धोकादायक धातू आहेत तसेच पेस्टीसाईडचे प्रमाणही अधिक आहे.

८. कराकाय लेक :

lake-karachay-marathipizza
nuclear-news.net

रशियातील कराकाय लेकचे (Karachay Lake) पाणी म्हणजे विषचं आहे. हे पाणी रेडिओअॅक्टीव्ह आहे. म्हणजेच यातून रेडिएशन होते जे माणसासाठी अतिशय घातक असते.

 

बघितलं या सरोवरातील पाणी किती भयंकर आहे. दुरून जरी ही सरोवरे अगदी मनमोहक दिसत असली तरी त्यांच्या जवळ जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं होय…

कदाचित म्हणूनचं “दिसतं तसं नसतं..!” असं म्हणतात…

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?