शर्टच्या मागे ‘हे’ लुप्स का असतात? जाणून घ्या माहित नसलेला इतिहास आणि यामागचे उत्तर!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक गोष्टीमध्ये काहीना काही नवीन फॅशन येतेय. त्यात कपडे फारच आघाडीवर आहे. प्रत्येक कपड्यामध्ये मग ते जीन्स असो, शर्ट असो, साड्या असो, ड्रेस असो कुठेतरी काहीतरी वेगळं आढळतं आणि ती वेगळी गोष्टच त्या कपड्याला एक फॅशनेबल लुक देते. असाच एक प्रकार आपल्याला आढळतो शर्टच्या मागच्या बाजूला. आताच्या प्रत्येक नवीन शर्टमध्ये मागे एक loop दिसून येतो. तुमच्यापैकी कित्येक जणांच त्याकडे लक्ष गेलं असेल, पण ती देखील एक फॅशन असेल असा विचार करून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असेल. पण त्याचा खरा उद्देश ऐकून तुम्ही देखील म्हणालं की व्वा! ही खरंच कामाची गोष्ट आहे.

shirt-loops-marathipizza01
scoopwhoop.com

पूर्वीच्या काळी शर्ट वगैरे ठेवायला लोकांकडे कपाट, हँगर नव्हते. तेव्हा हे loop कामाला यायचे. तेव्हा लोक या loop च्या सहाय्याने शर्ट अडकवून ठेवायचे, म्हणजे शर्ट व्यवस्थित राहायचा.

फॅशन इतिहासानुसार जगाला या loop ची ओळख पूर्व किनारपट्टीवरील खलाशांकरवी झाली. बोटीवर वगैरे असताना कपडे अडकवून ठेवता यावेत म्हणून त्यांनी ही loop ची शक्कल शोधून काढली.

shirt-loops-marathipizza02
washingtonstarnews.com

त्यानंतर प्रत्येक शर्टच्या मागे असे loop लावण्याचा प्रकार १९६० साली सुरु झाला. सर्वप्रथम Oxford button down shirts प्रकारामध्ये असे loop लावून लोकांसमोर सादर करण्यात आले.

तेव्हा त्यांना locker loops असे म्हटले जायचे. त्याकाळी या loops चा उपयोग लोकांना जिममध्ये कपडे टांगून ठेवण्यासाठी व्हायचा.

shirt-loops-marathipizza03
daily.bhaskar.com

कालांतराने हे loops म्हणजे Ivy League dating culture चा एक भाग झाले. मुलींना जे तरुण आवडायचे. त्यांच्या शर्टाच्या मागचे loops मुली ओढायच्या आणि ते दोघ डेटला जायचे. जर डेट यशस्वी झाली तर तरुण आपल्या शर्टामागील loops कापून टाकायचे, जेणेकरून इतर तरुणींना कळायचं की त्यांची आधीच कोणीतरी प्रेयसी आहे.

shirt-loops-marathipizza04
askandyaboutclothes.com

असा आहे  shirts loops चा प्रवास! पण सध्याच्या काळात कपाट आणि हँगरची सोय झाल्यामुळे या loops ना पूर्वीसारखे महत्त्व राहिले नाही. आता केवळ एक उपयोगाची पण गरज पडली तरच वापरात येणारी गोष्ट म्हणून तिचे अस्तित्व राहिलेले आहे.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?