' पुरुषांच्या शर्टच्या मागे 'हे' लुप्स का असतात? जाणून घ्या रंजक इतिहास आणि यामागचे उत्तर!

पुरुषांच्या शर्टच्या मागे ‘हे’ लुप्स का असतात? जाणून घ्या रंजक इतिहास आणि यामागचे उत्तर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक गोष्टीमध्ये काहीना काही नवीन फॅशन येतेय. त्यात कपडे फारच आघाडीवर आहे. प्रत्येक कपड्यामध्ये मग ते जीन्स असो, शर्ट असो, साड्या असो, ड्रेस असो कुठेतरी काहीतरी वेगळं आढळतं आणि ती वेगळी गोष्टच त्या कपड्याला एक फॅशनेबल लुक देते.

असाच एक प्रकार आपल्याला आढळतो शर्टच्या मागच्या बाजूला. आताच्या प्रत्येक नवीन शर्टमध्ये मागे एक loop दिसून येतो. तुमच्यापैकी कित्येक जणांचं त्याकडे लक्ष गेलं असेल, पण ती देखील एक फॅशन असेल असा विचार करून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं असेल.

पण खरंच तुम्हाला असं वाटतं का, की ही फक्त एक फॅशन आहे? तुम्ही तसं समजत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. हा लूप म्हणजे फॅशन नसून, एक अत्यंत महत्त्वाची आणि कामाची गोष्ट आहे.

त्याचा खरा उद्देश ऐकून तुम्ही देखील म्हणालं की व्वा! ही खरंच कामाची गोष्ट आहे.

 

shirt-loops-marathipizza01
scoopwhoop.com

 

पूर्वीच्या काळी शर्ट वगैरे ठेवायला लोकांकडे कपाट, हँगर नव्हते. तेव्हा हे loop उपयोगी पडत असत. तेव्हा लोक या loop च्या सहाय्याने शर्ट अडकवून किंवा टांगून ठेवायचे, म्हणजे शर्ट व्यवस्थित राहायचा. वापरलेला शर्टची घडी घालावी लागू नये, यासाठी ही युक्ती अमलात आणली होती असंही म्हणता येईल.

फॅशन इतिहासानुसार जगाला या loop ची ओळख पूर्व किनारपट्टीवरील खलाशांकरवी झाली. बोटीवर वगैरे असताना कपडे अडकवून ठेवता यावेत म्हणून त्यांनी ही loop ची शक्कल शोधून काढली. यामुळे त्यांना हे शर्ट व्यवस्थित ठेवणं आणि टांगलेले शर्ट वापरायला काढणं या दोन्ही गोष्टी सोप्या जात असत.

 

shirt-loops-marathipizza02
washingtonstarnews.com

 

त्यानंतर प्रत्येकच शर्टच्या मागे असे loop लावण्याचा प्रकार १९६० साली सुरु झाला. म्हणजेच सर्व सामान्य माणसांनी सुद्धा असे लूप असणाऱ्या शर्टाचं वापर करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम Oxford button down shirts प्रकारामध्ये असे loop लावून लोकांसमोर सादर करण्यात आले.

तेव्हा त्यांना locker loops असे म्हटले जायचे. त्याकाळी या loops चा उपयोग लोकांना जिममध्ये कपडे टांगून ठेवण्यासाठी व्हायचा.

 

shirt-loops-marathipizza03
daily.bhaskar.com

 

कालांतराने हे loops म्हणजे Ivy League dating culture चा एक भाग झाले. मुलींना जे तरुण आवडायचे त्यांच्या शर्टाच्या मागचे loops मुली ओढायच्या आणि ते दोघे डेट ला जायचे. जर डेट यशस्वी झाली तर तरुण आपल्या शर्टामागील loops कापून टाकायचे, जेणेकरून इतर तरुणींना कळायचं की त्यांची आधीच कोणीतरी प्रेयसी आहे.

म्हणजेच शर्ट अडकवून ठेवण्यासाठी बनवण्यात आलेल्या या लूप्सचा वापर मुलींनी चक्क मुलांना त्यांच्या प्रेमबंधनात अडकवण्यासाठी करण्यास सुरुवात केली. लूप्सचे हे नवे स्वरूप मोठे गमतीशीर आहे की नाही.

 

shirt-loops-marathipizza04
askandyaboutclothes.com

 

असा आहे  shirts loops चा प्रवास! पण सध्याच्या काळात कपाट आणि हँगरची सोय झाल्यामुळे या loops ना पूर्वी सारखे महत्त्व राहिले नाही. आता केवळ एक उपयोगाची पण गरज पडली तरच वापरात येणारी गोष्ट म्हणून तिचे अस्तित्व राहिलेले आहे.

काही प्रमाणात या लूप्स चा उपयोग आता फॅशन म्हणून सुद्धा केला जातो. शर्टचा लुक यामुळे वेगळी छाप पाडतो. अर्थात फॅशन म्हणूनही या लूप्सचा फार प्रभाव आता उरलेला नाही. त्यामुळे हल्ली शर्टाच्या आतल्या बाजूने असे लूप्स पाहायला मिळतात. त्यावर कंपनीचे ब्रॅण्डिंग केलेलं सुद्धा पाहायला मिळतं.

मग, यापुढे दारामागे शर्ट टांगताना या लूप्सचा वापर कराल ना…!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?