' एका खोडकर ग्राहकाला अद्दल घडवण्याच्या नादात झाला होता जगप्रसिद्ध ‘चिप्स’चा जन्म! – InMarathi

एका खोडकर ग्राहकाला अद्दल घडवण्याच्या नादात झाला होता जगप्रसिद्ध ‘चिप्स’चा जन्म!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुणाची वाट बघत बसले असताना, स्नॅक्समध्ये काही खायचे असल्यास, टीव्हीवर आपला फेवरेट शो बघत असताना, असच काही करायला नाही म्हणून आपल्या टाईमपासचा साथी म्हणजेच “चिप्स”… आणि त्यातही सर्वांचे आवडते म्हणजे बटाट्याचे चिप्स…

बटाट्याचे चिप्स म्हणजे सर्वांचा आवडता टाईमपास स्नॅक्स. कधी खारट, कधी चटपटे मसालेदार तर कधी प्लेन असे हे चिप्स आपल्यातील सर्वांनीच नक्की चाखले असतील.

जगातील एकूण स्नॅक्स्च्या विक्रीपैकी जवळपास ३५% विक्री फक्त या चिप्स्ची होते. काही संशोधकांच्या मते चिप्स खाल्ल्यामुळे तणाव कमी होण्यासही मदत होते.

 

potato-chips-marathipizza

पण मंडळी या चिप्सचा शोध कुणी आणि कसा लावला याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

काय नाही म्हणताय… अरे असं करून कसं चालणार, आपल्या आवडत्या खाद्याचा शोध कसा लागला हे आपल्याला माहित असायलाच हवं, म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी या चिप्सच्या शोधामागील कहाणी घेऊन आलो आहोत…

आता तुम्ही म्हणालं की त्यात वेगळ काय? या जगात जसा प्रत्येक डिशचा शोध हा शेफ किंवा कुक ने लावलाय, तसाच या चीप्सचाही शोध लागला असेल.

तसं तुमचं म्हणणही बरोबरचं आहे, पण आपल्या या फेवरेट चिप्सचा शोध हा काही मुद्दाम किंवा कुठला experiment करून लावण्यात आला नव्हता, तर तो accidentally लागला होता आणि याची कहाणी खरचं खूप रंजक आहे.

१८५३ ला न्यूयॉर्क मधील सॅराटोगा स्प्रिंग्स (saratoga psrings) या ठिकाणी आपल्या चिप्सचा जन्म झाला. सॅराटोगा (saratoga) स्प्रिंग्स येथे प्राकृतिक झरे, तलाव आणि बरीच निसर्गरम्य पर्यटनाची स्थळे आहेत. हे गाव तिथल्या नैसर्गिक सुंदरतेमुळे एक गजबजलेलं पर्यटन स्थळ होते.

 

Moon'sLakeHouse-marathipizza

त्यामुळे सॅराटोगा येथील तलावाच्या आजूबाजूला रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स इत्यादी बऱ्याच प्रमाणात होते. या तलावाच्या काठावरच ‘मुन्स् लेक हाऊस’ नावाचे रेस्ट्रॉरंट होते.

तर झालं असं की, ‘मून्स लेक हाऊस’ या रेस्ट्रॉरंटमध्ये दोन आचारी काम करायचे. त्यापैकी एक आचारी कॅथरीन जिला लोक आंट कॅट म्हणून ओळखायचे आणि दुसरा म्हणजे जॉर्ज क्रम्प. या हॉटेलात काम करणा‍ऱ्या जॉर्ज क्रम्पला स्वयंपाकाचा खूप छंद होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

लेक हाऊसमध्ये येणाऱ्या प्रत्येक खवय्याला चविष्ट पदार्थ करून खायला घालण्यासाठी क्रम्प सतत नवनवे पदार्थ तयार करत असत.

खाण्यासारखं कुठलंही साहित्य त्याला दिलं, तर त्यापासून तो चविष्ट खाद्यपदार्थ तयार करूनच राहील, अशी संपूर्ण परिसरात क्रम्पची ख्याती होती की. क्रम्पच्या हातात असलेल्या या जादुमुळे या हॉटेलमध्ये नेहमीच खवय्यांची गर्दी असायची.

एक दिवस रात्रीच्या जेवणाला तेथे एक ग्राहक आला आणि त्याने मुन्स् रेस्ट्रॉरंटची फेमस डिश फ्राईड पोटॅटो ऑर्डर केली. 

 

fried-potato-inmarathi

क्रम्पने नेहमीप्रमाणे ती तयार करून त्याच्या पुढे सादर केली. पण ती डिश बघून हे काय बेचव, जाड बटाटे आहेत अशी तक्रार त्याने केली आणि त्याने दुसऱ्या डिशचा हुकूम क्रम्पला दिला. हे बघून क्रम्प कमालीचा चिडला. आपली डिश काही वाईट नव्हती, हे त्याला माहित होतं.

तरी क्रम्पने परत थोडे कमी जाड असलेले फ्राईड पोटॅटो त्याच्या समोर मांडले, पण यावेळीही त्या ग्राहकाने ती डिश नाकारून परत ऑर्डर सोडली. आता मात्र क्रम्प संतापला.

या ग्राहकाची खोड जिरवण्यासाठी त्याने एक युक्ती केली. त्याने बटाट्याचे अगदी कागदाएवढे पातळ काप केले आणि ते कुरकुरीत होईपर्यंत तळले.

त्यावर मुद्दामून जास्त प्रमाणात मीठ ओतले जेणेकरून त्या ग्राहकाला धडा शिकवता येईल. त्याला वाटलं की, ग्राहक हे तोंडात टाकताच ओकायला लागेल, पण त्या ग्राहकाने पहिला चिप्स खाल्ला… मग दुसरा..तिसरा.. आणि खातच गेला.

एवढंच नव्हे – तर त्याने परत एक डिश ऑर्डर केली. ही डिश खाऊन तो एवढा खुश झाला की, त्याने रेस्टॉरंट मधील सर्व ग्राहकांना याबद्दल सांगितलं आणि पूर्ण गावभर या चिप्सची स्तुती करत फिरला. तो दिवस होता २४ ऑगस्ट १८५३.

 

potato chips-origin-marathipizza

 

क्रम्पच्या या नव्या डिशची कीर्ती लवकरच परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मुन्स् रेस्टॉरन्ट मालकाने देखील या डिशला मेन्यू कार्डमध्ये एक विशिष्ठ स्थान दिले. क्रमची ही स्पेशल डिश खाण्यासाठी रेस्टॉरंट बाहेर लोकांच्या रांगा लागू लागल्या.

कुठल्याही प्रकारच्या पातळ कापाला इंग्रजीत चिप्स् असे म्हणतात आणि म्हणून या प्रसंगानंतर क्रम्पने त्याच्या या क्रिस्पी रेसीपीचे नाव ‘सॅराटोगा चिप्स्’ असे ठेवले.

आपल्या हातातील ही जादू ओळखून क्रम्पने लवकरच ‘क्रम्प्स हाउस’ नावाचं एक रेस्टॉरन्ट सुरू केलं. त्यानंतर या चिप्समध्ये वेगवेगळे फ्लेवर टाकून त्याची लज्जत वाढवण्याचे प्रयत्न केले गेले.

 

potato chips02-marathipizza

 

Accidentally तयार करण्यात आलेले हे चिप्स आज जगभरातील खवय्यांच्या आवडीचे झाले आहेत. तर याच चिप्सच्या भरवश्यावर Lays सारख्या मोठ-मोठ्या कंपनींची दुकाने चालतात.

तर मग कशी वाटली ही आपल्या आवडत्या चिप्सची कहाणी…

जर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर ती आपल्यासारख्याच प्रत्येक Chips Lover बरोबर शेअर करायला विसरू नका…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?