'फळांच्या राजाचे तुम्हाला अजिबात माहित नसलेले असेही फायदे : आहारावर बोलू काही - भाग ७

फळांच्या राजाचे तुम्हाला अजिबात माहित नसलेले असेही फायदे : आहारावर बोलू काही – भाग ७

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : दुर्लक्षित पण सर्वात उपयुक्त फळ – ‘डाळिंब’ : आहारावर बोलू काही – भाग ६

===

आंबा (शास्त्रीय नाव – Magnifera Indica)

mango-marathipizza01
bettermangojuice.com

हे फळ मुळतः भारत व बर्मा देशातील असून त्याचा कालावधी साधारणतः जानेवारी ते ऑगस्ट असतो. भारतामध्ये केशर, हापूस, बेगमपल्ली, तोतापुरी, दशहरी प्रांतानुसार वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते.

 

पोषकांश टक्केवारी

स्निग्धांश 0%
कोलेस्ट्राल 0%
कार्बोदके 5%
तंतुमय पदार्थ 6%
प्रथिने 1%
जीवनसत्वA- 21%
जीवनसत्व c 60%
जीवनसत्वb6 5%
Glycemic index 41-60
Glycaemic load 12

 

वैद्यकिय फायदे

1) आंब्यामध्ये असणारे antioxidenrs आंत्र, स्तन, पौरूष ग्रंथी यांच्या कर्करोगापासून रक्षण करते.

2) कोलेस्ट्राल/स्निग्धांश नसल्याने तसेच तंतुमय पदार्थ व ‘क’ जीवनसत्व असल्यामुळे serum cholestrol व low density lipoprotein यांचे प्रमाण कमी करते. त्यामुळे ह्रदयरोगामध्ये ऊत्तम फळ आहे.

3 ) आंब्यात जीवनसत्व E व C भरपूर असून antioxidents ही भरपूर असतात. त्यामुळे त्वचा नितळ व चमकदार होते.

4) आंब्यातील जीवनसत्व A मुळे दृष्टी चांगली राहून रातांधळेपणा, डोळ्यांचा कोरडेपणा असे विकार होत नाहीत.

 

mango-marathipizza03
simplyrecipes.com

5) पपईप्रमाणेच आंब्यातही प्रथिनांचे पचन करणारी जीवद्रव्ये असतात.

6) आंबा हे अत्यंत स्फुर्तीदायक (enegetic) फळ असून जीवनसत्व व खनिजांची खाण आहे.

7) जीवनसत्व C आणि Aहे आंब्यातील घटक प्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत करतात.

8) American Association Of Diabetics च्या नवीन संशोधन नुसार आंब्याचा glycemic load 12.8 असुन आंबा low G L. प्रकारात मोडतो. (G.L.—पदार्थाचा रक्तशर्करेवर होणारा परीणाम..20पेक्षा अधिक असल्यास glucose level वाढते) आंब्यातील ईतर पोषकांश पाहता योग्य प्रमाणात सेवन केल्यास मधुमेहींनाही तो हितकर ठरतो.

9) पाण्याचे व तंतूमय पदार्थ भरपूर असल्याने बदधकोष्टता दुर होते.

10) कैरी हे आंब्याचे त्यात B6, B12,Vit C ही भरपूर असते. त्यामुळे रक्ताल्पता ,अशक्तपणा दातांचे विकार(scurvy) हे विकार होत नाहीत. सर्व ऋतुंमध्ये खाण्यासारखे कैरीची पाककृती म्हणजे लोणचे होय.

 

mango-marathipizza02
netdna-cdn.com

ऋतुनुसार सेवन

ऊन्हाळा – पन्हे, आंबेडाळ, आमरस
हिवाळा – साखरांबा, गुळांबा
पावसाळा – मेथांबा
विशेष पाककृती
मेथांबा

साहित्य :

कैरी – ½ कप
गुळ – 1/4 कप
तिखट – 1चमचा
मिठ – चवीनुसार
तेल – 2चमचे
मोहरी – 1/4 चमचा
मेथिदाना – 1/2 चमचा

प्रथम तेल तापवावे. मोहरीची फोडणी करावी. नंतर मेथिदाने टाकून छान वास आल्यावर कैरी व तिखट टाकावे. पाणी टाकून चांगले शिजू द्यावे. शेवटी गुळ व मिठ टाकून 10मिनीट शिजू द्यावे.

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “फळांच्या राजाचे तुम्हाला अजिबात माहित नसलेले असेही फायदे : आहारावर बोलू काही – भाग ७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?