' ‘कोणत्याही’ लॅपटॉपसाठी ‘कोणतेही’ चार्जर वापरणे हे किती योग्य ? – InMarathi

‘कोणत्याही’ लॅपटॉपसाठी ‘कोणतेही’ चार्जर वापरणे हे किती योग्य ?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लॅपटॉप वापरणाऱ्यांची सगळ्यात जास्त गैरसोय कधी होते, तर चार्जर जवळ नसल्यावर ! मग अश्यावेळेस नाईलाजाने मोबाईलचा चार्जर शोधावा तसा आपण लॅपटॉपचा चार्जर शोधू लागतो. मग या कठीण समयी जो चार्जर लॅपटॉपला लागेल तो घेऊन आपण आपले काम भागवतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असा अनुभव अनेकदा आला असेल. पण अनेकजण असेही असतील ज्यांच्या मनात दुसरा चार्जर वापरताना अनेक प्रश्न देखील उद्भवले असतील जसे की, दुसऱ्या लॅपटॉपचा चार्जर वापराने माझ्या लॅपटॉपसाठी किती सुरक्षित आहे? किंवा असे केल्याने लॅपटॉपच्या परफॉर्मन्सवावर तर काही परिणाम होणार नाही ना? किंवा वेगळ्या वेटेजच्या चार्जरमुळे लॅपटॉपची बॅटरी तर खराब होणार नाही ना???

असे एक ना अनेक प्रश्न तुमच्याही मनात आले असतील तर ते अतीशय योग्य आहेत आणि त्यांची उत्तरे देखील तुम्हाला माहित असायलाच हवीत. चला तर मग आज जाणून घेऊया दुसऱ्याच्या चार्जरने लॅपटॉप चार्ज केल्यास काही धोका आहे का की ही फक्त एक पोकळ शंका आहे?

laptop-charging-marathipizza01
batteriesplus.com

तुम्हाला कदाचित हे माहित असेल की प्रत्येक पावर अडाप्टर हा विशिष्ट एसी इनपुट सोबतच काम करतो. त्यामुळे हे इनपुट ठराविक डीसी आऊटपुटमध्ये कन्व्हर्ट होतं आणि आपले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस सुरु होतात. बहुसंख्य उत्पादक चार्जरच्या वर अगदी लहान शब्दांमध्ये भलीमोठी माहिती लिहून ठेवतात, ज्यामुळे व्होल्टेज आणि करंटची योग्य संख्या जाणून घेणे सोपे जाते, परंतु बहुतांश उत्पादक असेही असतात जे चार्जरवर अगदी कमी किंवा काहीच माहिती देत नाही. त्यामुळे चार्जर शोधण्याच्या समयी जर असा एखादा माहिती नसलेला चार्जर सापडला तर तो आपल्या लॅपटॉपला न लावलेलाचं बरा  !

laptop-charging-marathipizza02
ebay.com

आपल्याला गरजेच्या वेळी चार्जर सापडला की, आपण पहिली ही गोष्ट बघतो की चार्जर लॅपटॉपला फिट बसतो आहे किंवा नाही, जर तो फिट बसला तर आपण मानतो की हा चार्जर आपल्या लॅपटॉपसाठी योग्य आहे, परंतु असा थेट अंदाज बांधणे चुकीचे आहे. चार्जर लॅपटॉपला लावण्यापूर्वी सर्वप्रथम त्याचा वोल्टेज आणि एम्परेज  (Voltage and Amperage) तपासणे गरजेचे आहे. (पण यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या चार्जरचा वोल्टेज आणि एम्परज माहित असणे देखील गरजेचे आहे .)

जर वोल्टेज  तुमच्या  लॅपटॉपच्या चार्जर शी मिळत जुळता असेल तर त्याचा वापर करण्यास हरकत नाही. जर वोल्टेज अतिशय जास्त असेल तर मात्र तुमचा लॅपटॉप ओव्हरलोडमुळे बंद पडू शकतो. एम्परेज तुमच्या चार्जर मधून पर युनिट वेळेला किती पावर लॅपटॉपला पुरवली जावी याचे नियंत्रण करते. दुसऱ्याच्या चार्जरने लॅपटॉप योग्यरितीने चार्ज व्हावा असे वाटत असेल तर तुमच्या चार्जरवरची एम्परेज संख्या दुसऱ्या चार्जरवरील एम्परेज एवढीच असावी किंवा त्यापेक्षा थोडी जास्त असेल तरी चालते.

laptop-charging-marathipizza03
lifewire.com

एकंदर दुसऱ्याचा चार्जर वापरण्याची गरज पडल्यास काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

  • चार्जर कनेक्टरची साईज आणि शेप मिळतीजुळती असावी .
  • वोल्टेज संख्या सामान असणे गरजेचे आहे.
  • एम्परेज संख्या समान किंवा थोडी जास्त असेल तरी चालते.
  • कमी एम्परेजमुळे चार्जर गरम  होऊ शकतो परिणामी त्याचा परिणाम लॅपटॉपवर होऊन लॅपटॉप देखील तापू शकतो.
laptop-charging-marathipizza04
laptopchargers.ie

एका वाक्यात सांगायचे झाल्यास चार्जरची आणि दुसऱ्या चार्जरची स्पेसिफिकेशन समान असल्यास दुसरा चार्जर वापरण्यास हरकत नाही अन्यथा दुसरा चार्जर वापरण्यापूर्वी दहा वेळा  विचार करावा.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?