‘रिअॅलिटी शो’मागील रिअॅलिटी, जी अतिशय धक्कादायक आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही वेळ मनोरंजन व्हावे यासाठी आपल्यातील बहुतेक लोक रिअॅलिटी शो बघत असतील. असे रिअॅलिटी शो बघण्यामध्ये तरुण वर्गासह महिलांचा समावेश जास्त असतो.

रिअॅलिटी शोमध्ये दाखवण्यात येणाऱ्या धक्कादायक आणि रंजक गोष्टींना अनेकदा खुलवतात.

त्यांच्यानुसार हे रिअॅलिटी शो जीवन वेगळ्या पद्धतीने जगण्या-यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात आणि दिवसभरातील थकवा काढून टाकतात.

कधी- कधी या रिअॅलिटी शोमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भांडणे तसेच, वेगवेगळे आश्चर्याचे धक्के हे देत असतात. त्यामुळे कधी-कधी त्यांचा हा प्रेक्षकवर्ग दुखावला जातो.

पण हे सर्व खरच सत्य असते का ? की त्यामागे प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ह्या गोष्टी दाखवतात.

त्या रिअॅलिटी शोमधील लोकांबद्दल जाणून घेण्यासाठी हा प्रेक्षक वर्ग नेहमीच उत्सुक असतो.

मग, खरचं हे सर्व स्क्रिप्टेड असते का? लेखक आणि दिग्दर्शक जे आपल्याला दाखवू इच्छित आहे, तेच दाखवतो का?

चला तर मग जाणून घेऊया हे रिअॅलिटी शो कशाप्रकारे चालवले जातात.

 

truth of Reality shows.marathipizza
womansera.com

 

या रिअॅलिटी शोमध्ये जे काही घडते ते टीआरपी ( Television Rating Point ) वाढवण्यासाठी घडते.

निर्माते किंवा या शोची स्टोरी बनवणारे एक स्टोरी बोर्ड, आऊटलाईन किंवा शुटींग स्क्रिप्टस, उपयोगी टूल्स तयार करतात, जेणेकरून दिग्दर्शकाला शुटींग करताना त्याची मदत होईल.

तिथे एक उपकरण असते, ज्यामधून एकमेकांमधील संभाषणाचा एक उतारा आणि नवीन संवाद, ध्वनी बीट्स हे एडीट केले जाते. त्यामधून आघाडी, क्रश, भांडणे आणि नाते मूलतः तयार केली जातात.

हे फुटेज काही दिवसांपूर्वी घेतले जातात आणि ते त्या-त्या परिस्थितीनुसार लावले जातात.

आपण जसे दोन विडीओ क्लिप घेऊन त्या जोडतो आणि त्यामधील संभाषण एकच आहे, असे भासवतो. पण काही वेळा त्याचा अर्थ बदलतो. काहीवेळा ते सुरुवातीपासूनच संपूर्ण वाक्य बनवू शकतात.

बहुतेक स्पर्धा असलेल्या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकांबरोबर एक करार करण्यात आले असतो, त्या करारानुसार, शोच्या शेवटी कोण बाहेर जाणार हे परीक्षक नाहीतर शोचे निर्माते ठरवतात असेही काही अभ्यासकांनी यापुर्वी सांगितले आहे.

मुलेदेखील असे निरीक्षण करतात की, कसे एखाद्या चांगल्या स्पर्धकाला डावलून कोणातरी दुसऱ्याला बक्षीस देण्यात आले.

त्यामुळे त्यांच्या बालमनावर परिणाम होऊ शकतो, जास्तकरून तरुणाईकडे वळलेल्या मुलांच्या बाबतीत असे घडते.

 

truth of Reality shows.marathipizza1
2.bp.blogspot.com

 

मोठ्या शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांचा भूतकाळ पूर्णपणे तपासला जातो, तसेच त्यांच्या कुटुबियांना आणि मित्रपरिवाराला फोन केला जातो. त्यांची ड्रग आणि एसटीडी (Sexually transmitted diseases) चाचणी देखील घेतली जाते.

त्यांची न संपणारी मुलाखत घेतली जाते आणि मानसिक व शारीरिक तपासणी देखील घेतली जाते.

त्यांना संगितले गेले असते की, प्रेक्षकांचे लक्ष या शोकडे वळवण्यासाठी कधी-कधी तुम्हाला अपमानास्पद वागणूक देखील दिली जाईल, त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करून घावी लागेल.

या स्पर्धकांना प्रसिद्धी पाहिजे असते, ती या शोमार्फत त्यांना मिळते, त्याचबरोबर पैसा देखील या स्पर्धकांना मिळतो.

गेल्या दशकात बिग बॉस, कौन बनेगा करोडपती आणि रोडीज यांसारख्या रिअॅलिटी शो यांनी प्रेक्षकांचे लक्ष स्वतःकडे वळवले आणि त्यांना आपल्याकडे आकर्षित करून ब्रॉडकास्टरनी जगभरामध्ये खूप पैसे कमावले.

रिअॅलिटी शोची परिभाषा खूप अवघड आहे. कार्यक्रमांचा मुलभूत स्तर असलेल्या नाटक किंवा कॉमेडी यांचा आधार न घेता, स्क्रिप्टचे अनुसरण करून लोकांची मने आपल्याकडे ही रिअॅलिटी शो वळवतात.

एकप्रकारे रिअॅलिटी शो हे अश्या लोकांचा समूह तयार करते ज्यांना अभिनयाचा अनुभव नाही परंतु ते असामान्य परिस्थितीमध्ये चित्रीकरण करू शकतात.

सध्या रिअॅलिटी शोमध्ये व्यवसायिक मोठमोठे गायक, अभिनेते, क्रीडापटू इत्यादींचा समावेश करणे वाढले आहे. या रिअॅलिटी शोमार्फत त्यांचे व्यक्तिगत जीवन आणि ते नवीन परिस्थितींशी सामना कसा करतात, हे दाखवले जाते.

रिअॅलिटी टीव्ही शो हा खूप चर्चेचा मुद्दा आहे, कारण वकिलांच्या मते, न होणाऱ्या गोष्टी अशाप्रकारे रंगवून दाखवणे चुकीचे आहे, त्यामुळे समाजावर आणि लहान मुलांवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

 

dubeat.com

 

असे आहे या रिअॅलिटी शोमागील सत्य. जर तुम्ही अजूनही त्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी खऱ्या मनात असाल, तर हे वाचून तुमचे डोळे नक्की उघडतील हीच अपेक्षा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?