' “ही पिढी नुसती वाया गेली आहे” असं वाटणाऱ्यांनी हे वाचाच! – InMarathi

“ही पिढी नुसती वाया गेली आहे” असं वाटणाऱ्यांनी हे वाचाच!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ज्येष्ठ मंडळीतील अनेकांचा आवडता चर्चेचा मुद्दा म्हणजे आजकालची पीढी. तरुणांतील बहुसंख्य कसे सामाजिक भान नसलेले, संस्कृतीपासुन कोसो दुर असलेले, साहित्य-कला यांबाबत निरस आहेत; हे दाखवणारी उदाहरणे देत तासनतास गप्पा चालतात. या पूर्वग्रहदुषित विचारांना छेद देणारे दृश्य आज नजरेस पडले ते i-clean Amravati च्या रुपाने!

FB_IMG_-marathipizza01
अमरावती शहरातील घाणेरड्या भिंती रंगवुन, शहर सुशोभित करणारी तरुणांची संघटना म्हणजे I-clean Amravati. आदित्य माथनकर हा शेगाव इंजीनियरिंग कॉलेजचा विद्यार्थी ह्या संकल्पनेचा जन्मदाता. दर रविवारी एकत्र जमुन वारली पेन्टिंगच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती ‘इंडिया’पुढे आणत, शहरातील एक भाग सुशोभित करतात.

FB_IMG_-marathipizza03

आपल्या पॉकेटमनी मधील पैसा वापरून ह्या कामाची सुरवात करण्यात आली. सत्कार्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेऊन 1 लाख रुपयांचा रंग संघटनेला उपलब्ध करून दिल्याबद्दल अमरावती महानगरपालिकेचेही अभिनंदन. 7 जणांपासुन सुरु झालेली ही संकल्पना आता चळवळीचे रूप धारण करत 70 पर्यंत पोहोचली असून ह्यांत वृद्ध, गृहिणीसुद्धा यात सहभागी होउन ‘स्वच्छ भारत अभीयानात’ खारीचा वाटा उचलत आहेत.

FB_IMG_-marathipizza02
निव्वळ नकारात्मक चर्चा करून मने कलुशीत करण्यापेक्षा अश्या उपक्रमांना हातभार लावल्यास शहर, राज्य, देश स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. कारण आज i-clean Amravati ने दाखवून दिलेले चित्र म्हणजे

जिंदगी जीने के दो ही तरीके होते है-पहला जो हो रहा है, उसे होने दो. या दूसरा, जिम्मेदारी उठाओ उसे बदलने की.

गर्ल्स हायस्कूल चौकात आज त्यांच्यासोबत कामाची मजा तर अनुभवलीच पण सोबतच आपल्या आगामी थीममध्ये स्वदेशी उत्पादनांचा प्रचार करण्याचे वचन टिम ने दिल्याने, आनंद द्विगुणित झाला. कोणीही न सांगता, न लादता स्वखुशीने उचललेल्या ह्या जबाबदारीने इंग्रजांच्या कोठडीत रक्तबंबाळ झालेल्या त्या क्रांतिकारकाची आठवण करून दिली; ज्याला ‘ब्रिटिश सरकारशी पंगे घेणे कसे चुकीचे आहे आणि तुम्ही इन्कलाब वगैरे सोडुन द्या’ हे गोरे साहेब पटवण्याचा निरर्थक प्रयत्न करत होते. आलेले उत्तर होते,

जो जख्म है मेरे सीने पे, ये काँटे नही फुलोंके गुच्छे है;
हम पागल है, हमे पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे है.

FB_IMG_-marathipizza03
टिका करणाऱ्यांनी आजच्या युवकाला कितीही कमी लेखो, अगदी समस्त तरुण पिढीला आरोपीच्या पिंजऱ्यात जरी उभे केले तरीही त्याची तमा न बाळगता समाजकार्य करणाऱ्या युवकांची संख्या वाढ़तच राहील, हे नक्की. काही कमतरता काही चुका नक्कीच आहेत तरीही देशाला पुढे नेण्यात तरुणांचा सिंहाचा वाटा असेल; यात कुठलीच शंका नसावी.
सकाळ पासुन ओठांवर हेच शब्द पुटपुटले जात आहेत,

मोहे रंग दे बसंती, रंग दे बसंती, रंग दे बसंती यार’.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?