' 'ह्या' देशांतील कर्मचारी आहेत सगळ्यात सुखी..!

‘ह्या’ देशांतील कर्मचारी आहेत सगळ्यात सुखी..!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नोकरी ही गोष्ट सर्वच लोकांसाठी महत्त्वाची असते. माणसांना आपल्या उपजीविकेसाठी नोकरी करणे भाग पडते, काहींना नोकरी करायला आवडते तर काहींना अजिबात आवडत नाही. पण पैसे कमावण्यासाठी ही नोकरी करण्यासाठी लोक तयार होतात. नोकरी म्हटले की, प्रत्येक दिवसाचे एक नियमित वेळापत्रक तयार होते. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक दिवस सारखाच वाटू लागतो, त्यातच आपल्या भारतामध्ये दिवसभरामध्ये एक माणूस कमीत कमी ८ ते १० तास काम करतो. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये एका माणसाला वर्षभरामध्ये जवळपास २५०० तास काम करावे लागते, म्हणजे एका आठवड्यात जवळपास ४५ ते ५० तास काम करावे लागते.

पण विकसित देशांमध्ये मात्र परिस्थिती उलटी आहे, तेथे आठवड्यातील कामाचे तास हे भारतापेक्षा आणि इतर विकसनशील देशांपेक्षा खूप कमी आहेत. तरीदेखील या देशांचा जीडीपी हा भारतापेक्षा कितीतरी जास्त आहे. चला मग आज अशा १० देशांबद्दल जाणून घेऊया, ज्यांचे प्रत्येक आठवड्यातील कामाचे तास सर्वात कमी आहेत.

१. नेदरलँड

Minimum hour work.marathipizza
eurail.com

नेदरलँडचा सर्वात कमी कामाचे तास असलेल्या देशांमध्ये पहिला क्रमांक लागतो. कमी बेरोजगारी असल्याने आणि प्रोफेशनल कामगारांना प्राधान्य असल्याने येथे कामाचे तास कमी आहेत, तसेच नेदरलँडचे सरकार देखील व्यक्तिगत विकासाचे समर्थन करते. याव्यतिरिक्त सरकारद्वारे पार्टटाईम जॉबला प्रोत्साहन दिले जाते आणि कायद्याद्वारे अश्या कामगारांना संरक्षण दिले जाते. नेदरलँडचे कर्मचारी प्रत्येक वर्षी जवळपास १३८० तास म्हणजेच सरासरी प्रत्येक आठवड्याला जवळपास २७.५ तास काम करतात.

२. जर्मनी

Minimum hour work.marathipizza1
cdn.munplanet.com

प्रत्येक आठवड्यात सर्वात कमी तास काम करणाऱ्या देशांमध्ये जर्मनीचा दुसरा क्रमांक लागतो. २००९ मध्ये जर्मनीमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामासाठी प्रत्येक वर्षी जवळपास १२९० तास ठरवण्यात आले होते. पण सध्याच्या वर्षांमध्ये अजून चांगला परिणाम मिळवण्यासाठी कामाच्या वेळेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सध्या जर्मनीचे कर्मचारी प्रत्येक वर्षी जवळपास १३८८ तास काम करतात, म्हणजेच प्रत्येक आठवड्याला सरासरी २७.७५ तास काम करतात.

३. नॉर्वे

minmum workhors.marathipizza
travelandleisure.com

नॉर्वेचा सर्वात कमी तास काम करणाऱ्या देशांमध्ये तिसरा क्रमांक लागतो. नॉर्वेमध्ये जगातील सर्वात उदार श्रमिक कायदा आहे. येथे प्रत्येक कर्मचाऱ्याला तीन आठवड्यांची भर पगारी सुट्टी दिली जाते, तसेच आई – वडिलांसाठी कामाच्या तासांमध्ये कपात करण्याची तरतूद कायद्यामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर स्त्रियांना पार्टटाईम जॉब करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. सध्याच्या काळामध्ये नॉर्वेमध्ये कर्मचारी प्रत्येक वर्षी जवळपास १४०० तास काम करतात, म्हणजेच प्रत्येक आठवड्याला सरासरी २८ तास काम करतात.

४. डेन्मार्क

minimum workhours,marathipizzza
worldtravelguide.net

डेन्मार्कचा सर्वात कमी तास काम करणाऱ्या देशांमध्ये चौथा क्रमांक लागतो. डेन्मार्कमध्ये कर्मचाऱ्यांना आपल्या मर्जीनुसार कामाचे तास निवडण्याचा हक्क आहे. तसेच कर्मचाऱ्यांना सुट्टीचे पैसे देणे, तणावमुक्त वातावरण आणि वेळेवर पगार देणे ह्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. सध्याच्या काळामध्ये डेन्मार्कमध्ये प्रत्येक कर्मचारी प्रत्येक वर्षी १४११ तास काम करतो, म्हणजेच प्रत्येक आठवड्याला सरासरी २८.२ तास काम करतात.

५. फ्रान्स

Minimum hour work.marathipizza4
socialmatter.net

फ्रान्सचा सर्वात कमी तास काम करणाऱ्या देशांमध्ये पाचवा क्रमांक लागतो. सध्याचा काळामध्ये फ्रान्समध्ये कर्मचारी प्रत्येक वर्षी जवळपास १४८९ तास काम करतात, म्हणजेच प्रत्येक आठवड्याला सरासरी २९.७ तास काम करतात.

६. स्लोव्हेनिया

Minimum hour work.marathipizza5
hotels.ng

स्लोव्हेनियाचा  सर्वात कमी तास काम करणाऱ्या देशांमध्ये सहावा क्रमांक लागतो. २०१० च्या सुरुवातीला स्लोव्हेनियामध्ये नवीन श्रमिक कायदा लागू करण्यात आला होता. जो मजदूर वर्गांच्या हिताचे रक्षण करतो. या नवीन कायद्यामुळे सध्याच्या काळामध्ये स्लोव्हेनियामध्ये कर्मचारी प्रत्येक वर्षी जवळपास १५४७ तास काम करतात, म्हणजेच प्रत्येक आठवड्याला सरासरी ३१ तास काम करतात.

७. बेल्जियम

Minimum hour work.marathipizza6
transat.com

बेल्जियमचा सर्वात कमी तास काम करणाऱ्या देशांमध्ये सातवा क्रमांक लागतो. २००५ पासून बेल्जियममधील कर्मचारी प्रत्येक वर्षी जवळपास १५७० तास काम करतात, म्हणजेच प्रत्येक आठवड्याला सरासरी ३१.५ तास काम करतात.

८. स्वित्झर्लंड

Minimum hour work.marathipizza7
chef.bbci.co.uk

स्वित्झर्लंडचा सर्वात कमी तास काम करणाऱ्या देशांमध्ये आठवा क्रमांक लागतो. सध्याच्या काळामध्ये स्वित्झर्लंडमधील कर्मचारी प्रत्येकवर्षी जवळपास १५८५ तास काम करतात, म्हणजेच प्रत्येक आठवड्याला सरासरी ३१.७५ तास काम करतात.

९. स्वीडन

Minimum hour work.marathipizza8
counter-currents.com

स्वीडनचा सर्वात कमी तास काम करणाऱ्या देशांमध्ये नववा क्रमांक लागतो. सध्याच्या काळामध्ये स्वीडनमधील कर्मचारी प्रत्येकवर्षी जवळपास १६०७ तास काम करतात, म्हणजेच प्रत्येक आठवड्याला सरासरी ३२.१ तास काम करतात.

१०. ऑस्ट्रिया

Minimum hour work.marathipizza9
media1.britannica.com

ऑस्ट्रियाचा सर्वात कमी तास काम करणाऱ्या देशांमध्ये दहावा क्रमांक लागतो. सध्याच्या काळामध्ये ऑस्ट्रियामधील कर्मचारी प्रत्येकवर्षी जवळपास १६०७ तास काम करतात, म्हणजेच प्रत्येक आठवड्याला सरासरी ३२.५ तास काम करतात.

असे हे सर्वात कमी तास काम करणाऱ्या देशांबद्दल जाणून घेतल्यावर नक्कीच तुम्हाला वाटत असेल की, कदाचित आपल्या देशामध्ये देखील असे असते तर किती बरे झाले असते…नाही का?!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?