' पहिलं प्रेम...गाणी...आठवणी...!

पहिलं प्रेम…गाणी…आठवणी…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : प्रशांत शिरूर

===

शाळेतून कॉलेजात जायचा पहिला दिवस, आपण कॉलेजमध्ये जाणार याच हुरहूरीने भरलेला उत्साह…

“सिनेमात पाहातो तसं असेल, की वेगळं असेल..?? ”

शाळेत असताना “अभ्यास” आणि “ती” इतकाच काय तो प्रपंच … ! आणि जग किती ही प्रगतीपथावर असलं तरी, एक मुलगा आणि मुलगी बोलतेय हे पचनी पडणारं त्यावेळी आजूबाजूला कोणी नव्हतचं… तसा कोणी बोलणारा असलाच, तर त्याला शांततेचं नोबेल वा आॅस्कर मिळालाय असा आव…!

आणि तिच्याशी बोलण्याचं धाडस करणं म्हणजे “खतरो के खिलाडी” मध्ये असलेला थरार पण कमीच पडेल, त्यातही यश मिळालचं तर “तिच्याशी काय बोलायचं होतं” असं विचारणारा तिचा सो कॉल्ड मानलेला भाऊ, कोणी प्रतीस्पर्धी किंवा शहरात सुव्यवस्थेची मक्तेदारी घेतलेलं व पोरींशी फक्त बोलणाऱ्या पोरांना मनसोक्त धुवून काढणारं “मानव हक्क आयोगा”च्या totally विरूद्ध काम करणारं “छेडछाड विरोधी पथक”…

love article- marathipizza

 

संवाद असा नव्हताच फारसा, जो व्हायचा तो नजरेतूनच आणि सोबतीला असलेली नव्याने सुरू झालेल्या म्युझिक चॅनेल वरची गाणी, ती पाठवायला व्हॉट्सअॅप नसल्यानं मनातल्या इमारती मनातच आणि त्या सगळ्या इमारतींचं मनातलंच विस्कटणं…!

ही भावना आपल्या आधीही कोणाच्यातरी मनात आलीय, असं असणंही, फार सुखावून जातं आणि स्वत:च्या भावनांना वाट मोकळी करून द्यायला गाण्यांची सोबत होत जाते !

त्या त्या पिढीला त्यांच्या Teenage मधली गाणी आवडत असावीत, कारण बदलत जाणाऱ्या वेळेसोबत व्यक्त होण्याची पद्धतही बदलत जात असावी… हा तर हे सगळं सुरू होतं, त्या पहिल्या भावनेसह, जेव्हा ती दिसते, अगदी पहिल्या क्षणी आणि आर.डी.बर्मन साहेबांचं “एक लडकी को देखा तो ऐसा लगा” ऐकू येतं आणि जावेद अख्तर साहेबांच्या लेखणीतून अवतरलेल्या या गीतातल्या ती मध्ये “ती”चं स्थान आपली “ती” कधी घेते याचा थांगही लागत नाही,

love article- marathipizza
youtube

 

” जैसे नाचता मोर, जैसे रेशम की डोर
जैसे परियों का राग, जैसे संदल की आग
जैसे सोला सिंगार, जैसे रस की पुहार
जैसे आहिस्ता आहिस्ता बढ़ता नशा ”

नशेचा पहीलावहीला संबंध येतो तो इथंच, मोह…

कसला तो माहीत नाही, अर्थाअर्थी कोणत्याही नियमात विचार करण्याची सोय नाही, खरं प्रेम की टाईमपास, अश्या विविध कॅटेगिरीचं विश्लेषण करण्याची सोय नाही…! लाईन हा गावठी शब्द असो, वा न्याहाळणं हा गोड शब्द असो, क्वचितच आता तिची नजरही मिळायला लागते, अर्थ असो वा नसो…खरं तर आपण घेवू तो अर्थ…

“जादू भरी आँखों वाली सुनो
तुम ऐसे मुझे देखा न करो”

“ती” च्या कौतूकात रमून जाण्याचे क्षण कोणत्यातरी बेसावध क्षणी भितीची जागा घेतात, अन् भिती ही किती गोड ? हीच भिती ते प्रेम अधोरेखीत करत जाते..! याच्या अजून विश्लेषणात जायची आता इच्छा नाही… किंवा ती ही वेळ नाही…
तर प्रेम … परेम … लव्ह … !

love article02- marathipizza
marriage.com

 

मग ऐकू येतं…
“क्यों नये लग रहे हैं ये धरती गगन
मैंने पूछा तो बोली ये पगली पवन…
प्यार हुआ चुपके से, ये क्या हुआ चुपके से”

प्रेमात पडल्याची भावना … हळूवार आपल्या विश्वाशी एकरूप होत जाते आणि या सगळ्यात तिच्या मनाचा थांगही न लागणाऱ्या या आगतिक क्षणी विचारांशिवाय दुसरं काही सुचेनासं झाल्यावर साथ देतं ते बाबूल सुप्रियोचं…

” सोचता हूँ… उसका दिल कभी मुझपे आये तो
जान भी… उसे दे दूँ मैं वो किसी तरह मुझे आजमाएँ तो… !!”

या आगतिकतेत गुंतणं अजून वाढत जातं हवं तसं, वाढायला हवं की नको, याचं भविष्य काय ? असंही भविष्य ठरवणारे आपण कोणीच नाही…
होतं असं की, तीची आठवणीत असणारी नजर आणि दिवाळीच्या सुट्टीत तिची येणारी याद…आठवण…! आणि ध्यानीमनी नसताना कुठेही वास्तविक आकार घेत नसलेल्या या लव्हस्टोरीत अचानक लकी अली ची एन्ट्री होते…!

त्या तिव्र आठवणीला तो, शाम सवेरे तेरी यादे आती है असं म्हणून मोकळी वाट करून देतो आणि सुरू होतो तो हक्काचा प्रवास, आता ती पुर्णपणे आपली झालेली असते… आता ऐकायचं असतं ते “कहो ना प्यार है…!”

 

love article03- marathipizza
songlyrics.com

 

तो उताविळपणा सुनने को बेकरार है मधून येतो आणि या बेकरार पणात “किस्सा हम लिखेंगे…” सारखी स्वत:च स्वत:ला द्यायची वचनं जन्माला यायला लागतात,
आपण प्रेमात पडलेल्या या महान प्रेमकथेचे लेखक आणि दिग्दर्शक ही आपणच असल्याने एकतर्फी कोणताही अडथळा नसणाऱ्या वेळी प्रेमाची भावना स्वप्नवत वाटत राहाते..!

रोमान्स… त्यातली हूरहूर लावणारी गम्मत… आयी मुसिबत तो अब सोचता हूँ मैं क्यूँ रह सका न तेरे बिन्……ताजा ताजा कली …!

इतक्या सगळ्यांचा अत्यूच्च बिंदूवरचा कल्पना विलास म्हणजे, सर्दी की रातो मे हम सोये रहे एक चादर मे…….होणाऱ्या गुदगुल्या आणि अस्वस्थ करणारे अनामीक सुखाची ओळख करून देणारे शहारे …!!!

याला किती अर्थ होता किंवा हे किती निरर्थक होतं… असा विचार करवत नाही. खरी गम्मत… या सगळ्या प्रवासाला फुलस्टॉप कसा ??

“तिच्या बाबांची बदली झालीय … ती शिफ्ट होतेय 😥”

“कोण होता की तीचा भाऊ ..? म्हणे तिच्याकडे का बघतोस ??…”
“बघना गेलीय यार …पूर्वीसारखी …!!!”
“माझ्या आधी ते पिंट्या बोललं तीला … 😞 ”

आणि या किती तरी भावना…भावनाच मुक्त कल्लोळ करणाऱ्या… ! आणि मग कोण्यातरी अजब वेळी एका वेड्या शायरच्या लेखणीतून उतरलेलं दु:ख … ते ही फक्त न फक्त आपल्याच प्रेमासाठी …!

 

lovestory-marathipizza

दोनो ने किया था प्यार मगर , मुझे याद रहा तू भूल गयी…!
….भुला देंगे तुमको सनम धीरे धीरे …

फक्त आणि फक्त मनात चाललेल्या तिच्या ही नकळत करूण अंत होणारी ही प्रेम प्रकरणं संपून जातात, यात वेळ जात असेलही, पहिल्या गाण्यापासून अंतापर्यंत तिच्या परवानगी शिवाय तिच्या सहभागाला नोंदवत “सिनेमा” खराही असू शकतो…

या विचाराला थांबवून, आपण वास्तविकतेत प्रवेश करतो आणि हे काल्पनिक जग “जीना इसी का नाम है” म्हणत “रस्ते न बदले ना बदला जहाँ फिर क्यूँ बदलते कदम है यहाँ ?? ” असे प्रश्न विचारत पुढे जावू लागतं… उरते ती आठवण…

आणि ही आठवण हळू हळू तिचा निष्पापपणा हरवत जाते … !

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

:InMarathi.com |वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात.  InMarathi.com  त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. ।आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?