' जर या गोष्टी घडल्या नसत्या, तर सहारा वाळवंट कधीही ‘उजाड’ झालं नसतं ! – InMarathi

जर या गोष्टी घडल्या नसत्या, तर सहारा वाळवंट कधीही ‘उजाड’ झालं नसतं !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वाळवंट म्हणजे सारंक काहु उजाड आणि उष्ण… कुठेही कसली सोय नाही आणि त्यामध्येच मोठी कमी म्हणजे पाण्याची. वाळवंटी प्रदेशामध्ये पाणी मिळवण्यासाठी काय काय कसरत करावी लागते हे तेथे राहणाऱ्यांनाच माहित, खाण्यापिण्याच्या शोधामध्ये तर कधी-कधी वाळवंटामध्ये कित्येक दिवस असेच निघून जातात असे ऐकिवात आहे. अश्या वाळवंटात आपल्या सारखी शहरीमाणसं फसली तर, मग बघायलाच नको, त्यावेळी वाळवंट आपल्याला कोणकोणते रंग दाखवेल याचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही. तशी तर मनुष्याच्या जीवावर उठू शकणारी अनेक वाळवंटे जगात आहेत, पण सध्या जगात अस्तित्वात असलेले सगळ्यात मोठे उष्ण आणि धोकादायक वाळवंट आहे सहारा वाळवंट!

shara desert.marathipizza
beautifulworld.com

सहारा वाळवंट हे जगातील सगळ्यात उष्ण वाळवंट आणि तिसरे मोठे वाळवंट आहे. उत्तर आफ्रिकेमध्ये स्थित असलेले हे वाळवंट साहसी पर्यटकांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. पण तुम्ही कल्पना करू शकता का ? १०,००० वर्ष आधी हे भयानक ओसाड वाळवंट कसे असेल ? नाही ना ! बहुतेकांचे म्हणणे हेच असेल की, आता आहे तसेच असेल, अजून काय वेगळे असणार आहे. चला मग जाणून घेऊया १०,००० वर्षांपूर्वी हे सहारा वाळवंट कसे होते आणि त्याची परिस्थिती आता अशी का झाली…

सियोल नॅशनल विद्यापीठामधील पर्यावरणीय पुरातत्वज्ञ लेखक डेव्हिड राइट म्हणतात की,

८००० वर्षांपूर्वी मनुष्य वस्ती ही नाईल नदीपासून पश्चिमेकडे पसरलेली होती. तिथे त्यांनी बकऱ्या, गाई आणि मेंढ्या आणल्या, येथील वनस्पती तोडल्या त्यामुळे येथील डोगरांचा भाग ओसाड पडू लागला आणि त्यामुळे वातावरणावर देखील त्याचा परिणाम होऊ लागला.

sahradesert.mrathipizza
fthmb.tqn.com

डेविड राइट पुढे म्हणतात की,

या परिस्थितीला पहिली कारणीभूत गोष्ट म्हणजे बकरी. बकरी ही काहीही खाते. बकरी जमिनीवरील कोणतीही गोष्ट खाण्यासाठी मागचा-पुढचा विचार न करता खाण्यास सुरुवात करते. बकरी आणि इतर जनावरांनी येथील बहुतेक वनस्पती खाल्यामुळे येथील डोंगर हळूहळू खचले आणि मोठ्या प्रमाणामध्ये लँडस्केप होऊ लागले. त्यामुळे त्याचा परिणाम हा स्थानिक वातावरणावर देखील होऊ लागला.

आपण सर्वच शाळेमध्ये शिकलो आहोत की, प्रखर रंग हे अधिक प्रकाश परावर्तीत करतात, याचप्रकारे पृथ्वीचा पृष्ठभाग देखील कार्य करते. पिवळसर तपकिरी रंगाची वाळू आणि माती ही सूर्यप्रकाश परावर्तीत  करते. त्यामुळे ही उर्जा वातावरणामध्ये पसरते आणि वातावरण उष्ण होते. उष्ण कटीबंधाच्या प्रदेशामध्ये थंड वातावरण असलेल्या प्रदेशापेक्षा कमी ढग जमा होतात, कमी ढग म्हणजे कमी पाऊस, असेच काहीसे सहारामध्ये घडले आहे.

saharadesert.marathipizza1
upload.wikimedia.org

शास्त्रज्ञांनुसार पृथ्वीच्या भ्रमण कक्षातील बदलांमुळे सहाराचे असे परिवर्तन झाले आहे. त्या बदलांमुळेच हा भाग नेहमी उष्णकटीबंधात असतो. परिणामी येथील उन्हाळ्यातील पाऊस देखील कुचकामी ठरतो.

orbit-marathipizza
wittyfeed.com

येथील मोठ्या प्रमाणात झालेले मानवी स्थलांतर देखील महत्त्वाचे कारण आहे, ज्यामुळे या प्रदेशाची अशी अवस्था झाली आहे. मनुष्य जेथे जेथे गेला तेथे तेथे त्याने त्या भागाची नासधूस केली.

राइट यांचा असा विश्वास आहे की, येथे वनस्पती संपुष्टात आल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ पडला. या दुष्काळामुळे नंतर वनस्पती येथे वाढल्या नाहीत आणि त्याचमुळे लँडस्केप होण्याचे प्रमाण वाढले आणि ही जागा गरम, कोरडी आणि धूळयुक्त एक अशी मोठे वाळवंट बनली. अखेरीस, अमेरिकेएवढे मोठे वाळवंट या ठिकाणी निर्माण झाले, नाहीतर १०००० वर्षापूर्वी हे सहाराचे वाळवंट आफ्रिकेतील सवाना सारखे दिसायचे.

saharadesert.marathipizza2
i.dailymail.co.uk

त्यानंतर मनुष्य आपले जीवन व्यतीत करण्यासाठी आणि आपल्या जनावरांना चरण्यासाठी चांगली जागा पाहत, आशिया आणि उत्तर अमेरिकेकडे वळला. शास्त्रज्ञांचे असे मानने आहे की, अॅमेझॉनमध्ये होणाऱ्या जंगलतोडीमुळे वातावरणावर परिणाम होत आहे, तसेच जागतिक पातळीवर देखील याचा परिणाम होत आहे. अॅमेझॉनचे रेनफॉरेस्ट हे प्रचंड प्रमाणात उष्णकार्बन प्रदूषण शोषून घेतात, त्यामुळे जागतिक तापमान वाढ होण्यापासून वाचते, म्हणून ते वाचवणे गरजेचे आहे.

असे हे कोरडे, गरम आणि धूळयुक्त सहारा वाळवंट एकेकाळी एक सुंदर हिरवळ आणि नयनरम्य प्रदेश होता.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?