'अमानुष अत्याचार सहन करीत ५० वर्ष कैदेत असलेल्या राजू हत्तीची मन हेलावणारी कहाणी

अमानुष अत्याचार सहन करीत ५० वर्ष कैदेत असलेल्या राजू हत्तीची मन हेलावणारी कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

हत्ती हा प्राणी खूपच शांत आणि दयाळू असतो. तो सहसा कोणाच्याही अंगावर विनाकारण धावून जात नाही. जुन्या काळामध्ये राजे-महाराजे हत्तींचा उपयोग त्यांचे वाहन म्हणून करत असत. हत्तीच्या त्या अंबारीमध्ये बसून मोठ्या थाटामाटाने ते आपल्या राज्याचा फेरफटका मारत असत.

हत्तीच्या अंबारीमध्ये बसून फिरणे तेव्हा प्रतिष्ठेचे समजले जाई.

 

King_George_V_and_Queen_Mary_in_Calcutta_InMarathi
wikipedia.org

हे लोक आपल्या हत्तींची काळजी देखील तेवढीच घेत असत. तुम्ही काही ऐतिहासिक चित्रपटांमध्ये देखील हे पहिले असाल, हळूहळू ही राजघराणी कमी झाली आणि त्यानंतर हत्तींचा वापर अवजड वस्तू उचलण्यासाठी तसेच झाडांचे ओंडके वाहून नेण्यासाठी करण्यात होऊ लागला.

पण नंतर मनुष्याकडे यंत्रसामग्री आली आणि हत्तींचा वापर कमी झाला. अशावेळी त्या लोकांनी एक तर हत्तींना प्राणीसंग्रहालयात एक शोभेची वस्तू म्हणून ठेवले किंवा त्यांना मारून त्यांचे हस्तिदंत, त्वचा, शेपटीचे केस यांचा वापर व्यावसायिकांकडून विक्रीसाठी करण्यात येऊ लागाला.

आता तर पृथ्वीतलावरून हत्तींचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. वन्यजीवन संरक्षण एसओएस-यूकेने उत्तर प्रदेशाच्या उत्तर भागामधून एका हत्तीला सोडवले आणि त्या हत्तीला मथुरामधील हत्ती संवर्धन व देखभाल केंद्रात पाठवण्यात आले. त्या हत्तीचे नाव राजू आहे.

 

Raju elephant.mrathipizza
thenewsminute.com

राजू हत्ती हा ५० वर्षापेक्षा जास्त काळ कैदेत होता, त्याला वन्यजीवन संरक्षण एसओएस-यूकेने त्या कैदेतून सोडवले.

चला मग जाणून घेऊया राजू बद्दल, नेमके त्याच्याबरोबर काय झाले होते, आणि त्याला ब्रिटनमधील संघटनेने आपल्या धाडसी प्रयत्नांनी कसे सोडवले…!

वन्यजीवन एसओएसचे संस्थापक कार्तिक सत्यनारायण यांनी राजूच्या मालकांवर आणि त्यांच्या हालचालीवर दोन दिवस आधीपासूनच लक्ष ठेवले होते. हे बचावकार्य काही घाईघाईने करण्यात आले नाही. ते पूर्णपणे योजना आखून करण्यात आले होते.

राजूला त्या कैदेतून बाहेर काढण्याचे काम मध्यरात्री करण्यात आले. जेणेकरून त्याच्या मालकाला याबद्दल काहीही समजणार नाही. एक वर्ष आधीच उत्तर प्रदेशच्या वनविभागाने याबद्दल लंडनमध्ये असलेल्या एजन्सीला संपर्क साधला होता आणि त्यांना या हत्तीवर करण्यात येणाऱ्या क्रूरतेबद्दल सांगण्यात आले होते.

 

Raju elephant.mrathipizza1
i.ytimg.com

या राजू हत्तीची खूप दयनीय अवस्था होती.

त्याला दिवसभर खूप काम करायला दिले जात असे, राजूच्या मालकाने राजूला त्याचा दास बनवूनच ठेवला होता. राजूला त्याचा मालक कितीतरी दिवस काहीही खायला देत नसे, स्वत:ची भूक संपुष्टात यावी यासाठी राजूने कागद आणि प्लास्टिक देखील खाल्ले आहे.

राजूला त्याचा मालक दोरखंडाने बांधून ठेवत असे.

बचावकार्य करणारी टीम जेव्हा तिथे पोहचली, तेव्हा त्यांनी पहिले की, राजूच्या पायाला एक जाड दोरखंड बांधण्यात आलेला होता. तो दोरखंड एवढा घट्ट होता की, त्याच्यामुळे त्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या.

तो दोरखंड निघत नसल्याने बचावकार्य करायला गेलेल्या टीमला तो दोरखंड कापून काढावा लागला.

शेवटी तो दोरखंड तुटला आणि राजूची सुटका झाली.

त्यानंतर राजूला एका खुल्या ट्रकमधून मथुरेच्या हत्ती संवर्धन व देखभाल केंद्रात नेण्यात आले. तिथे पोहचल्यावर त्या ५००० किलोच्या हत्तीला म्हणजेच राजूला आपल्या घरीच आल्यासारखे वाटले.

पण जेव्हा राजूला सोडवण्याचा प्रयत्न चालू होता, त्यावेळी मात्र राजू खूप मोठमोठ्याने ओरडत होता आणि प्रतिकार करत होता.

कारण एवढी वर्ष कैदेत राहून त्याला कोणावरही विश्वास नव्हता. काही वेळाने त्याच्या लक्षात आले की, ही माणसे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात आल्यावर तो गप्प बसला.

 

Raju elephant.mrathipizza2
simomot.com

उपचार करून राजूला एक आठवडा एकटेच ठेवले गेले होते. त्याच्यावरील काही उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला राजेश आणि भोला या इतर दोन हत्तींबरोबर ठेवण्यात आले. जेव्हा पहिल्यांदा राजूसमोर अन्नपदार्थ ठेवण्यात आले तेव्हा तो तबल ४५ मिनिटे खातच होता.

राजू हत्तीच्या बचावकार्याच्या पथकामध्ये सामील असलेले कार्तिक म्हणाले की,

जेव्हा आम्ही राजूला सोडवले, तेव्हा त्याची ती परिस्थिती पाहून आमच्या डोळ्यांमध्ये देखील अश्रू आले. जेव्हा त्या दोरखंडाच्या जबरदस्त पकडीतून बाहेर पडून राजूने आपल्या स्वातंत्र्याचे पहिले पाऊल उचलले, तेव्हा आम्ही सुटकेचा श्वास सोडला.

एवढी वर्ष कैदेत असल्याने त्याच्या मानसिक स्थितीचे खच्चीकरण झाले होते.

आतापर्यंत राजूने जवळपास २७ मालकांनी दिलेले कष्ट सहन केले होते. पण आता तो या सर्व जाचामधून बाहेर पडून एक सुंदर आयुष्य जगत आहे.

 

Raju elephant.mrathipizza3
i.ytimg.com

४ जुलै २०१७ मध्ये राजूचा ५३ वा वाढदिवस साजरा करण्यात आला, याच तारखेला मध्यरात्री त्याला तीन वर्षांपूर्वी सोडवण्यात आले होते. आता राजू इतर १४ हत्तींबरोबर (ज्यांना राजूसारखेच वाचवण्यात आलेले आहे) या ठिकाणी राहत आहे.

अशा या राजूने आपल्या जीवनामध्ये खूप कष्ट सहन केले आहेत.

पण आता तो खूप खुश आहे आणि मजेत आपले जीवन जगतो आहे…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “अमानुष अत्याचार सहन करीत ५० वर्ष कैदेत असलेल्या राजू हत्तीची मन हेलावणारी कहाणी

  • March 13, 2019 at 2:44 pm
    Permalink

    mast

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?