' शंकराने गणपतीचे उडवलेले शीर आजही भारताच्या या गुहेत पहायला मिळते – InMarathi

शंकराने गणपतीचे उडवलेले शीर आजही भारताच्या या गुहेत पहायला मिळते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दरवर्षी गणेशोत्सवात संपूर्ण भारतात, खासकरून महाराष्ट्रात आपले आराध्य गणपती बाप्पा यांचे आगमन होते.

बघता-बघता हे १० दिवस जातात आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते.

भगवान शंकर आणि गणपती यांच्या युद्धाबद्दल तर सर्वांचं माहित आहे. शंकरानी त्यांच्या क्रोधामध्ये गणपती बाप्पांचे शीर धडापासून वेगळे केले होते. मात्र या युद्धाच्या खुणा दाखवणारा इतिहास आजही भारतात आहे.

==

हे ही वाचा : आपण आणि देवी-देवतांच्या पुराणकथा : गणपती बाप्पाची “गोष्ट”

==

ganpati-marathipizza00

 

आज बाप्पाच्या आणखी एका रहस्यमय गोष्टीबद्दल जाणून घेऊया… जी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नाहीये.

 

Ganesh secret cave.marathipizza

 

आपल्या गणपती बाप्पाला देवांमध्ये सर्वात पहिल्यांदा पूजनाचा मान कसा मिळाला, यामागील पौराणिक दंतकथा तर तुम्हाला माहित असेलच. गणपतीला पार्वतीने कसे तयार केले ही कथा देखील तुम्हाला माहीतच असेल.

पार्वती स्नानास जात असताना तिने आपल्या मळाने गणपतीला बनवले आणि आपल्या खोलीबाहेर पहारा देण्यास सांगितले, त्याचवेळी तिथे शंकर आले.

 

Goddess-Parvati-inmarathi

 

गणपतीने शंकराला आत जाऊ न देता त्यांना तिथेच रोखले. शंकराला राग आला आणि रागाच्या भरात त्याने गणपतीचे मुंडके उडवले. गणपतीचा आवाज ऐकून पार्वती बाहेर आली आणि समोरील दृश्य पाहून पार्वती संतापली.

 

shiva-ganesha-inmarathi

 

नंतर शंकराला आपली चूक लक्षात आली आणि त्याने इतर देवांना आज्ञा दिली की, जो कोणी पहिल लहान बाळ किंवा प्राणी दिसेल ज्याची माता त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असेल त्याचे शीर कापून आणा.

त्या देवांनी हत्तीचे शीर आणले म्हणून शंकराने गणपतीवर हत्तीचे शीर बसवले आणि त्याला पुनर्जीवित केले.

 

==

हे ही वाचा : जगातील एकमेव मंदिर जिथे १ कोटी शिवलिंगांची पूजा केली जाते!

==

 

ही तर झाली अर्धी गोष्ट.

पण तुम्ही कधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय का की, शंकराने उडवलेले गणपतीचे मानवी शीर कोठे पडले?

तर भारतात एक अशी जागा आहे जेथे एक मंदिर आहे आणि तेथील स्थानिकांमध्ये अशी श्रद्धा आहे की, शंकराने उडवलेले गणपतीचे शीर तेथेच पडले होते.

चला तर जाणून घेऊया या मंदिराबद्दल…!

 

Ganesh secret cave.marathipizza1jpg

 

उत्तराखंडाच्या पिथौरागडामधील गंगोलीहाटपासून १४ किलोमीटर दूर पाताळ भुवनेश्वर हे गाव आहे. जिथे लोक खास पाताळ भुवनेश्वर मंदिर पाहण्यासाठी जातात.

हे गुहेमधील मंदिर गणपतीचे आहे. येथे भक्तगण त्यांची पूजा करण्यासाठी, आपल्या इच्छा मांडण्यासाठी आणि निसर्गाचे सौंदर्य टिपण्यासाठी येतात.

९० फुट खोल आणि १६० मीटर लांब असलेल्या या गुहेचा प्रवास काही सोपा नाही, त्यामुळे काही भक्तगण आपली ही मोहीम अर्ध्यामधेच सोडून परत येतात आणि कधीही परत जाण्याचा विचार करत नाहीत.

येथे जाणाऱ्या अनेक भक्तांनी त्यांना आलेला दैवी अनुभव सांगितला. त्यांनी सांगितले की, येथील गुहेच्या भिंतीना स्पर्श करताच ते तणाव आणि दुःखापासून मुक्त झाले आहेत असे त्यांना वाटले.

 

temple-marathipizza01

 

पाताळ भुवनेश्वर गुहा, ही केवळ एक गुहा नाही तर पवित्र गुहांची शृंखला आहे.

असे मानले जाते की, अजूनही या गुहेमध्ये गणेश देवाचे मानवी कापलेले शीर आहे.

कलियुगामध्ये आदी शंकराचार्य यांना स्कंद पुराणामध्ये या गुहेचा संदर्भ सापडला होता, त्यांनी त्यामध्ये प्रवेश करण्याचा देखील प्रयत्न केला होता. इसवीसन ११९१ मध्ये त्यांनी हिमालयाच्या पर्वतांना भेट दिली आणि ते या गुहेमध्ये स्थित झाले.

 

temple-marathipizza02

==

हे ही वाचा : घरगुती गणेशोत्सवाची सुरूवात का झाली – महाभारतातील रोचक कथा!

==

 

आजही, येथील खोल गुहांमध्ये जाण्यास सक्त मनाई आहे. केवळ वरचा पृष्ठभाग आणि गुहेच्या आतील थोडासा भाग भाविक भक्तांसाठी खुला आहे. असे देखील मानले जाते की, ही गुहा कैलास पर्वताला जोडते.

उत्सुकता चाळवली असल्यास अश्या या रहस्यमय आणि रंजक ठिकाणाला नक्की भेट द्या! 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?