' मोदी सरकारचे हे २ निर्णय भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करणार आहेत – InMarathi

मोदी सरकारचे हे २ निर्णय भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करणार आहेत

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

====

भारतीय अर्थव्यवस्था revive करण्याचं मोठं challenge मोदी सरकार पुढे आहे.

राज्यसभेत बहुमत नसल्याने अनेक निर्णयांना कायद्याचं समर्थन देण्यास असमर्थ असलेल्या मोदी-जेटली जोडीने शेवटी executive orders देण्याचा धडाका लावला आहे.

modi jaitley marathipizza

स्त्रोत

ह्या orders पैकी २ अश्या orders आहेत, ज्यामुळे अर्थव्यवस्थेची जाण असणारे बरेच लोक आनंदित आहेत.

 

१ – केरोसीन किमतीत ९ महिने नियमीत वाढ करण्याचे निर्देश, सिबसिडीवरील ओझं कमी करण्याकडे वाटचाल

UPA सरकारने, दर महिन्याला डिझेलच्या किमती ५० पैश्यांनी वाढवत नेण्याचं धोरण अवलंबलं होतं – ज्याचा सकारात्मक परिणाम हा झाला की NDA सरकारला ऑक्टोबर २०१४ मधे डिझेलला deregulate करता आलं. आता सरकारने केरोसीनच्या किमतींमध्ये दर महिन्याला २५ पैसे अशी वाढ एप्रिल २०१७ पर्यंत करत राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ह्यामुळे सबसिडीत घट होऊन चालू आर्थिक वर्षात १००० कोटी रुपयांची बचत होणार आहे.

सध्या सरकार सबसिडीवर किती खर्च करत असते ह्याचा अंदाज पुढील तक्त्यावरून येतो :

kerosine subsidy chart marathipizza

 

महत्वाची गोष्ट ही, की मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या सबसिडीचा लाभ गरिबांना होतच नाही. ४६% केरोसीन खुल्या बाजारात विकलं जातं किंवा इतर देशात तस्कर होतं. त्यामुळे आता वाचलेले हे एक हजार कोटी रुपये योग्य ठिकाणी वापरले जातील.

 

२) PSU म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीज विक्रीस आहेत ! (Finally!!! 😀 )

नीती आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कायम तोट्यात असणाऱ्या १६ PSU विकण्याचा आणि २६ बंद करण्याचा विचार चालू आहे.

हा निर्णय कित्येक वर्षांपूर्वीच घ्यायला हवा होता – पण असं दिसतंय की हे कडू औषध आता घेतल्या जाईल.

एकट्या २०१४-१५ वर्षात तोट्यात असणाऱ्या ह्या कंपनीजने २७,००० कोटी रुपयांचं नुकसान केलं आहे. (ज्याची भरपाई अर्थातच आपल्या करातून होते!)

सरकार जर हा निर्णय अमलात आणणार असेल – तर ती एक खूप मोठी achievement असणार आहे.

इथे महत्वाची गोष्ट ही – की ह्या कंपनी बंद केल्याने केवळ पैश्यांची प्रचंड बचत होणार नाहीये. सरकारची खूप मोठी यंत्रणा इतर महत्वाच्या कामांमधे गुंतवता येणार आहे.

==

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?