'छोट्याश्या गॅरेजपासून सुरुवात करून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंतचा प्रवास!

छोट्याश्या गॅरेजपासून सुरुवात करून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंतचा प्रवास!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पूर्वी काही खरेदी करायचं म्हटलं की बाजारात जाण्याशिवाय पर्याय नसायचा. काहीही करून ओढूनताणून कंटाळत बाजार भरून खांद्यावर ते बोचकं मारून घरी आणावे लागायचे. बाजार जवळ असेल तर ठीक पण जर लांब असले तर मात्र प्रवासात वेळ आणि पैसा दोन्ही खर्च व्हायचा तो वेगळा. पण १०-१५ वर्षांपूर्वी ऑनलाईन शॉपिंगचा उदय झाला आणि सारं काही बदलून गेलं. शॉपिंगच्या साऱ्या कटकटी मिटल्या. घर बसल्या सारं काही मिळू लागलं, गरज असायची ती केवळ मोबाईल/कम्प्यूटर आणि इंटरनेटची. आज तर दर १०० पैकी ८० जण ऑनलाईन शॉपिंग वापरतात इतके हे क्षेत्र प्रगत झाले आहे. आज अनेक ऑनलाईन शॉपिंग साईट्स आपल्या सेवेत तत्पर आहेत. पण तुम्हाला माहित आहे का आजच्या ह्या ऑनलाईन शॉपिंगच्या क्रांतीला कारणीभूत ठरली होती एक वेबसाईट जी आजही जगातील अग्रगण्य वेबसाईट म्हणून गणली जाते. आम्ही बोलतोय ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम’ बद्दल!

amazon-marathipizza01
gizmodo.co.uk

आज या वेबसाईटचे करोडो युजर्स आहेत आणि या कंपनीने देखील आपल्या युजर्सना आजही आपल्याशी बांधून ठेवलं आहे. एकदा का ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम’ वरून खरेदी केली की युजर कायमचा त्या वेबसाईटशी जोडला जातो असा या वेबसाईटचा नावलौकिक! आज आपण याच ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम’च्या संस्थापकाबद्दल जाणून घेऊया.

युद्धकाळात लष्कराचे संगणक एकमेकांशी जोडण्यासाठी इंटरनेटचा जन्म झाला होता. इंटरनेटद्वारे ऑनलाइन खरेदी विक्री स्वस्त आणि वेगाने होईल, असे १९९४ पर्यंत कुणाला वाटलेही नव्हते. मात्र ऑनलाइन पुस्तके विकणारे पहिले उद्योजक जेफ बेजोस यांनी ‘अ‍ॅमेझॉन डॉट कॉम’ या वेबसाइटची स्थापना केली आणि आज ते जगातील सर्वात मोठे ऑनलाइन रिटेलर आहेत.

१२ जानेवारी १९६४ रोजी न्यू मेक्सिकोमध्ये जन्मलेल्या जेफ यांनी लहानपणीच स्क्रू-ड्रायव्हरने आपल्या पाळण्याचे स्क्रू काढून आपले पाय पाळण्यातच दाखवून दिले होते. १९८६ मध्ये प्रिंस्टन विद्यापीठामधून पदवी मिळवल्यानंतर वॉल स्ट्रीटवर अनेक नोकऱ्या करीत ते शेअर बाजारातील डी.ई. शॉ या संगणक कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट बनले. १९९४ मध्ये ते प्रेमात पडले आणि त्यांचे लग्न झाले. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत असल्याची दूरदृष्टी ठेवून १९९४ मध्ये त्यांनी मेल ऑर्डरद्वारे व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.

amazon-marathipizza02
businessinsider.com

हे शेखचिल्लीचे स्वप्न आहे, असे सांगत डी.ई. शॉच्या संचालकांनी त्यांना धुडकावून लावले. जेफ यांनी सुरक्षित नोकरीवर लाथ मारली आणि घरातील छोट्या गॅरेजमध्ये तीन सर्व्हर इन्स्टॉल करून ५ जुलै १९९५ रोजी एक ऑनलाइन बुक साइट सर्वांसाठी खुली केली. दोनच महिन्यांत दर आठवड्याला २० हजार डॉलरची पुस्तक विक्री सुरू झाली. त्यामुळे अनेक उपशाखा असलेली अमेरिकन नदी अ‍ॅमेझॉनचे नाव त्यांनी या वेबसाइटला दिले आणि जन्म झाला – अ‍ॅमेझॉन डॉट कॉमचा!

१९९७ मध्ये त्यांनी शेअर बाजारात उतरताना गुंतवणूकदारांना इशारा दिला की,

‘अ‍ॅमेझॉन’मध्ये त्यांची गुंतवणूक बुडण्याची शक्यता ७० टक्के आहे.

जेफ यांच्या आईवडिलांनी आपली सर्व बचत ३ लाख डॉलर म्हणजे आजचे दीड कोटी रुपये अ‍ॅमेझॉनमध्ये गुंतवले आणि सांगितले की,

ते अ‍ॅमेझॉनला नाही तर जेफला पैसे देत आहेत.

दहा वर्षांत अ‍ॅमेझॉनमध्ये ६ टक्के भागीदार होऊन ते अब्जोपती झाले. यानंतर जेफ यांनी एमपीथ्री डाउनलोड्स, व्हिडिओ, कम्प्युटर सॉफ्टवेअर, व्हिडिओ गेम, म्युजिक आदींची ऑनलाइन विक्री सुरू करून अ‍ॅमेझॉनला सर्वात मोठे ई-शॉपिंग सेंटर बनविले. आज अ‍ॅमेझॉन डॉट कॉम जगातील सर्वात मोठे ऑनलाइन रिटेलर आहे. आज अ‍ॅमेझॉन डॉट कॉमचे वार्षिक उत्पन्न तब्बल १३४.९८ बिलियन डॉलर्स इतके आहे आणि फोर्ब्सच्या यादीनुसार २०१७ साली जेफ यांना जगातील सर्वात श्रीमंत  व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले. त्यांची संपत्ती ९०.६ बिलियन डॉलर्स इतकी आहे!

amazon-marathipizza03
cdn.geekwire.com

जेफ यांची आणखी एक निर्मिती म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स रीडिंग डिव्हाइस किंडल! टीव्ही किंवा संगणकाच्या पडद्याशिवाय यावर पुस्तके वाचता येतात. अमेरिकेतील ई-बुक बाजारात ९६ टक्के वाटा या किंडलचा आहे. ७ इंचाचे हे किंडल फायर म्हणजे एक टॅबलेट कम्प्युटर असून त्याची किंमत अ‍ॅपल आयपॅडच्या निम्मी आहे. जेफ बेजोस यांनी ब्ल्यू होरायझन नावाची एक एरोस्पेस कंपनीही स्थापन केली आहे. ही कंपनी अंतराळ उड्डाणासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करीत आहे. जेफ म्हणतात की,

आळस धोकादायक असतो. आपले मनपसंत काम मन लावून करा करा आणि इतिहास घडवा!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?