' इतिहासजमा होणाऱ्या ‘खाकी’ वर्दीमागील खाकी रंगाची कहाणी…! – InMarathi

इतिहासजमा होणाऱ्या ‘खाकी’ वर्दीमागील खाकी रंगाची कहाणी…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पोलीस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहत ते खाकी वर्दी घातलेल्या पोलिसाचं चित्र… एकट्या कोलकात्याला सोडून देशातील इतर सर्व राज्यांतील पोलिसांच्या वर्दीचा रंग हा खाकी आहे. आपल्या देशातील पोलीस सध्या ब्रिटीशकालीन खाकी वर्दी परिधान करतात. पण आता देशभरातील पोलिसांची ही खाकी वर्दी लवकरच इतिहासजमा होणार आहे. पोलिसांच्या गणवेशात बदल करण्यात येणार असून यापुढे आता हे पोलिस कर्मचारी आपल्याला खाकी वर्दीत नाही तर स्मार्ट युनिफॉर्ममध्ये दिसणार आहेत.

ही खाकी वर्दी जणू पोलिसांची ओळखच बनली आहे… पण तुम्ही कधी विचार केलाय की पोलिसांच्या या वर्दीचा रंग खाकीच का असतो..? आता तुम्ही विचार करत असाल, जगात प्रत्येक देशाच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्दीचा रंग वेगवेगळा असतो तसेच आपल्या देशात तो खाकी आहे… पण असं नाहीये… चला तर मग ही खाकी वर्दी इतिहासजमा होण्याअगोदर या वर्दीमागील खाकी रंगाचं रहस्य जाणून घेऊ…

indian-police-marathipizza

१९०७ च्या अगोदर पार्ट्यांत भारतात शासन ते प्रशासनापर्यंत ब्रिटिश सरकारच राज्य होतं. तेव्हा त्यांची पोलीस पांढऱ्या रंगाची वर्दी परिधान करायची. पण ड्युटी करत असताना ही पांढरी वर्दी लवकर घाण व्हायची, याचा कर्मचाऱ्यांना खूप त्रास व्हायचा. या डागांना लपविण्यासाठी पोलिसांनी आपल्या वर्दीला वेगवेगळ्या रंगात रंगविण्यास सुरवात केली. पण त्यामुळे त्यांची वर्दी वेगवेगळी दिसू लागली. हे बघून ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची वर्दी एकसारखी दिसावी आणि ती ड्युटी दरम्यान लवकर घाण न व्हावी यासाठी “खाकी” रंगाची डाय तयार केली. या खाकी रंगावर धुळीचे आणि इतर डाग दिसतात म्हणून हा रंग वर्दीसाठी ठरविण्यात आला तसेच हा रंग इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही आवडला. त्यानंतर या खाकी रंगाला अधिकृतपणे पोलीस वर्दीत समाविष्ट करण्यात आले. पण याला अपवाद म्हणून कोलकाता पोलिसांची वर्दी आजही पांढऱ्या रंगाची आहे.  यामागील कारण म्हणजे, १७२० साली सुरक्षा वाढविण्यासाठी तसेच गुन्ह्यांवर लगाम लावण्यासाठी कोलकाता पोलीस नियुक्त करण्यात आली. तेव्हा तेथीलचा रंग हा पांढरा होता जो आजही बदलण्यात आलेला नाही. त्याला इतिहासाचा एक भाग मानून आजही तिथले पोलीस पांढऱ्या रंगाची वर्दी परिधान करतात.

indian-police02-marathipizza
indiatoday.in

 

पोलिसांची ओळख असणारी ही खाकी वर्दी का बदलण्यात येत आहे त्यामागील कारण जाणून घेऊ…

देशातील नऊ राज्यांकडून खाकी वर्दी विषयी मिळालेल्या प्रतिक्रियांनुसार, सध्याच्या वर्दीमध्ये अनेक अडचणी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे देशातील पोलिसांच्या वर्दीत समानता नाही म्हणजे संपूर्ण देशातील पोलिसांची वर्दी ही एकसारखी असायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांच्या गणवेशाचे कापड फारच जाड असल्याने उन्हाळ्यात पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचा फार त्रास होता. याशिवाय वर्दीत जास्तीत जास्त गोष्टी ठेवण्याची पर्यायी जागा देखील नाही. पोलिसांची टोपी लोकराची असल्याने उन्हाळ्यात ती अतिशय त्रासदायक ठरते. पोलिसांना देण्यात येणारे हेल्मेट एवढे जड आहेत की, आपत्कालीन परिस्थितीत ते घालून काम करणे अडचणीचे जाते. पोलीस गणवेशातील पट्टाही फार जड असल्याने तो घालून वाकता येत नाही. जगभरातील इतर देशांमधील पोलिसांच्या पट्ट्यात फोन ठेवण्याची जागा आणि स्मार्ट कीज असते, तशीच सोय देशातील पोलिसांच्या गणवेशात असावी अशा या प्रतिक्रिया होत्या.

indian-police01-marathipizza
jagran.com

त्यामुळे सर्व हवामानात आरामदायी ठरणारा आणि पुरेशी व्यवस्था असलेला गणवेश आता पोलिसांना दिला जाणार असून हे काम अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन या संस्थेकडे सोपवण्यात आले आहे. सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशातील पोलिस आणि निमलष्करी दलासाठी नवा गणवेश ही संस्था बनवणार आहे. ब्युरो ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या सहकार्याने वर्दीचे ९ नमूने देखील तयार करण्यात आले आहेत. यात शर्ट, पॅण्ट, पट्टा, टोपी आणि जॅकेटचा समावेश आहे. याशिवाय रेनकोट आणि हेडगिअरचे डिझाईनही बनवले आहे. राज्यांच्या सर्व पोलिसांना हे डिझाईन शेअर केले असून ते आपल्या पसंतीने गणवेश निवडू शकतात.

गणवेशातील इतर त्रुटींसोबतच चामड्याचे बुट देखील पोलिसांसाठी बरोबर नाहीत. चामड्याचे बूट जास्त वेळ घालणे सोपे नसते त्याने पायांना त्रास होतो. त्यामुळे आता गणवेषासोबतच बुटांमध्ये देखील बदल होणार आहे.

तर अशी ही भारतीय पोलिसांची शान आणि ओळख असलेली खाकी वर्दी लवकरच नव्या रंग-रूपात आपल्या समोर येणार आहे. भारताच्या सर्व बऱ्या-वाईट प्रसंगात पोलिसांना साथ देणारी ही खाकी वर्दी आता लवकरचं इतिहासजमा होणार आहे… 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?