' गणपती बसवला म्हणून बौद्ध धर्मातून बहिष्कृत! घटनेतील धर्म स्वातंत्र्य धोक्यात येतंय का?

गणपती बसवला म्हणून बौद्ध धर्मातून बहिष्कृत! घटनेतील धर्म स्वातंत्र्य धोक्यात येतंय का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणत्याही धर्मातील लोक देवाला का मानतात हो? कारण त्यांची देवावर श्रद्धा असते. प्रत्येक धर्माची आपल्या देवावर श्रद्धा बाळगण्याची वेगवेगळी पद्धती असते. त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये लोक आपल्या देवाची मूर्तीपूजा करून देवाप्रती असलेली आपली श्रद्धा दर्शवतात. त्यात वाईट असे काही नाही.

आता गणेशोत्सवाचं उदाहरण घ्या.

गणपतीला मानणारा कोणीही मनुष्य हा देव आपल्याला एका रात्रीत श्रीमंत करणार किंवा आपल्याला कधीच काही होऊ देणार नाही या आशेने गणपती घरात बसवतच नाही. आता काळ बदलला आहे. लोकांच्या मनातील देव देखील बदलला आहे. त्यांना माहित आहे की, गणपती घरात बसवल्याने तो काही जादूची कांडी फिरवून आपली विघ्ने हरणार नाही आहे.

पण तरीही गणपती बाप्पावर असलेली श्रद्धा, पाळली जाणारी एक परंपरा, त्याच्या घरातील आगमनामुळे निर्माण होणे चैतन्यमय वातावरण, प्रत्येक संकटात तो आपल्याला शक्ती देईल ही आशा मनात ठेवून लोक मनोभावे गणपतीचा उत्सव साजरा करतात.

अश्या या भक्तांच्या श्रद्धेला उगाचच कर्मकांडपणाचे वा अंधश्रद्धेच रूप देऊन जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न यंदाच्या गणेशोत्सवामध्ये दिसून आला. तुम्हाला देखील कल्पना असेल – हिंदूच नाही तर विविध धर्मीय आपल्या घरी गणेशोत्सव साजरा करतात. त्यात बौद्ध धर्मीय हे देखील आलेच.

तर महाराष्ट्रात काही बौद्ध धर्मियांनी आपल्या घरी गणपती बाप्पा बसवला किंवा त्यांनी गणेशोत्सवामध्ये सहभाग घेतला म्हणून त्यांच्याच समाजाने त्यांना वाळीत टाकण्याची धमकी दिली आहे.

 

ganpati-dispute-marathipizza01

 

हिंगोली जिल्ह्यातील सुशील दामोदर इंगोले यांना गणपती उत्सवात सहभागी का झालात, आपल्या धर्मात असलं काही चालत नाही असा दम देऊन त्यांच्याच समाजाकडून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. स्वत:ला बौध्द धर्माचे रक्षक म्हणवणाऱ्या गटांनी हा नवीन मूर्खपणा सुरु केला आहे.

या गटांनी गणेशोत्सवाविरोधातील मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत. यात हे गट आपल्या बौध्द धर्मीयांना आवाहन करत आहेत की,

त्यांच्या जवळपास कोणीही बौद्ध धर्मीय घरात गणपती बसवत असेल किंवा गणेशोत्सवात सहभागी होत असेल तर त्याला तसे करण्यापासून रोखा अन्यथा त्यांच्यावर प्रतिबंध लावा.

त्यांच्यानुसार गणेशोत्सवामध्ये सहभागी होणे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीच्या विपरीत आहे. या मेसेजमध्ये ते आंबेडकरांच्या २२ शपथांचा संदर्भ देतात आणि म्हणतात की,

एका शपथेनुसार बाबसाहेब आंबेडकर म्हणाले होते की, माझा गौरी-गणपती किंवा हिंदू धर्मातील कोणत्याही देवावर विश्वास नसेल, ना मी त्यांची पूजा करेन.

सुशील दामोदर इंगोले ज्यांना वर सांगितल्याप्रमाणे गणेशोत्सवात सहभागी झाल्याबद्दल आपल्याच समाजाच्या लोकांकडून बोल खावे लागत आहेत ते म्हणतात की,

“मी माझ्या घरी गणपती बसवत नाही.

मी ज्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्या शाळेतील गणपती उत्सवात मी गेल्या वर्षी सहभागी झालो होतो आणि म्हणून या वर्षी गणेशोत्सव सुरु झाल्यावर मी गेल्या वर्षीचा गणपतीचा फोटो माझा वॉट्सअप डीपी म्हणून ठेवला होता.

पण कोण्या तरी समाज कंटकाने माझा नंबर सर्क्युलेट करून मी घरी गणपती बसवला आहे अशी अफवा उठवली आणि झालं तेव्हापासून मला महाराष्ट्रभरातून कॉल येऊ लागले.

त्यात धमकीचे फोन देखील होते. काही फोन हे तर ओडीसा आणि उत्तर प्रदेशातून देखील आहे. हे सर्व थांबावे म्हणून मी पोलिसांत तक्रार देखील केली आहे. पण मला कळत नाही गणपती उत्सव साजरा केला तर काय वाईट आहे? माझे काही उच्च वर्णीय हिंदू मित्र आहेत जे माझ्यासोबत आंबेडकर जयंतीतही सहभागी होतात.

आंबेडकरांच्या २२ शपथांचा मी आदर करतो. पण त्याच आंबेडकरांनी संविधानात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मर्जीने देवाची पूजा करण्याचे स्वातंत्र्य देखील दिले आहे.”

 

ganpati-dispute-marathipizza02

हे ही वाचा – “इस्लामबाह्य” म्हणून उध्वस्त केलेल्या बामियान बौद्ध मूर्ती – हे क्रौर्य कशामुळे?

सुशील इंगोले यांनी आणखी एका धक्कादायक गोष्टीचाही खुलासा केला की,

हिंगोलीमध्ये काही तरुणांनी गणपती शोध मोहीम राबवली आहे, ज्या माध्यमातून ते ज्या ज्या बौध्द धर्मियांच्या घरात गणपती उत्सव साजरा केला जातो त्यांचा शोध घेऊन त्यांना धमक्या देत आहेत.

सुशील इंगोले यांच्यासारख्या सामान्य नागरीका व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्राला हसविणाऱ्या भाऊ कदम यांना देखील या मूर्ख समाजकंटकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

भाऊ कदम यांनी इकोफ्रेंडली गणेशोत्सवाचे महत्त्व सांगण्याच्या उद्देशाने आपल्या नवीन घरात गणपती बाप्पाचे आगमन केले होते. पण हीच गोष्ट त्यांच्या बौद्ध धर्मीय समाज मंडळींना रुचली नाही आणि त्यांनी भाऊ कदम यांना ‘गद्दार’ घोषित करून त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन आपल्या समाज बांधवांना केले आहे.

झालेल्या त्रासाने खचलेल्या भाऊ कदम यांच्यावर अखेर हार मानून आपल्या समाजाची माफी मागण्याची वेळ आली.

 

ganpati-dispute-marathipizza05

 

अजून एका प्रकरणात अंबरनाथ येथे राहणाऱ्या दशरथ जगताप यांनी आपल्या घरात गणपती बसवला म्हणून, भारतीय बुद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी थेट त्यांच्या घरात जाऊन धुमाकूळ घातला आणि त्यांना धमकी दिली की, यापुढे जर घरात गणपती बसवला किंवा गणेशोत्सव साजरा केला तर जातीतून त्यांना हद्दपार करण्यात येईल.

या धमकीने भेदरलेल्या जगताप कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवशी भारतीय बुद्ध महासभेला आपला माफीनामा सादर केला आणि आपली चूक कबुल केली.

 

ganpati-dispute-marathipizza03

 

बौद्ध असून देखील नवी मुंबईचे अभय साबळे हे देखील कित्येक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहेत, पण पहिल्यांदाच आपल्याला अश्या धमक्या येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या उपरोक्त चार प्रकरणांवरून लक्षात येते की, भारतात धार्मिक तणाव किती वाढीस लागला आहे.

हिंदू, मुस्लीम समाजावर त्याबाबत नेहमीच आरोप होत असतात, पण आता त्यात शांततप्रिय बौद्ध समाजाचा देखील क्रमांक लागला आहे हे नक्की!

उगाच काहीही कामधंदे नसताना हिंदू आणि बौद्ध समजामध्ये भांडण लावून देण्याचे काम करणाऱ्या या स्वयंघोषित रक्षकांना खाली गोष्टींबद्दल देखील स्पष्टीकरण द्यावे –

खालील छायाचित्रात बौद्ध धर्माचे धर्मगुरू दलाई लामा चक्क शंकराला अभिषेक करतान दिसत आहेत.

 

ganpati-dispute-marathipizza04

 

या दुसऱ्या एका छायाचित्रात आरपीआयचे सर्वेसर्वा रामदास आठवले शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्या गणपतीचे दर्शन घेताना दिसत आहेत.

 

ganpati-dispute-marathipizza03

 

अशी अजून कित्येक उदाहरण देता येतील, जी दर्शवतील की गणेशोत्सवावर वाद निर्माण करून या समाजकंटकांचा केवळ समाजातील एकात्मतेवर घाला घालण्याचा उद्देश आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रत्येक बिगर बौद्ध धर्मीय आदर करतो, कारण त्यांनी अमुल्य असे संविधान आपल्याला दिले आहे आणि त्याच संविधानाच्या आधारेच आपण आज लोकशाहीत वावरतो आहे.

त्यामुळे बाबासाहेब संपूर्ण समाजाचे आहेत. त्याचप्रमाणे गणपती हा देखील संपूर्ण मानवजातीचा आहे. त्याच्यावर श्रद्धा असावी वा नसावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबद्दल कोणीही कोणाला ज्ञान शिकवू शकत नाही, कारण मुख्य गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनीच घटनेत धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे.

अश्या गोष्टी करून व्यक्तीचे धर्मस्वातंत्र्य धोक्यात येत आहे आणि आपणच बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान करत आहोत एवढी साधी गोष्ट ही त्यांच्या अनुयायांना कळू नये यापेक्षा हास्यास्पद गोष्ट नाही.

हा… जर कर्मकांड होत असेल, उगाच अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक होत असेल तर त्याचा जरूर विरोध करा. हिंदू देखील अश्या गोष्टींबाबत तुम्हाला साथ देतील.

पण उगाच गणपतीचा फोटो ठेवला किंवा गणपती घरात का बसवला असे तद्दन फालतू विषय उकरून काढून वाद घालू नये ही विनंती.

या ठिणगी एवढ्या वाटणाऱ्या वादाचा कधी वणवा होईल आणि आपले राजकारणी त्यावर कशी पोळी भाजतील आणि आपण सामान्य त्यात कसे होरपळून जावू याची तुम्हालाही चांगलीच कल्पना आहे.

त्यामुळे हिंदू अनु बौद्ध धर्मातील सुजाण व्यक्तींनी वेळीच पुढे येऊन अश्या गोष्टींला आवर घातला पाहिजे.

===

हे ही वाचा – या महात्म्याने जपानमध्ये बौद्ध पंथाची स्थापना केली आणि व्यवस्थेला खडबडून जागे केले

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

26 thoughts on “गणपती बसवला म्हणून बौद्ध धर्मातून बहिष्कृत! घटनेतील धर्म स्वातंत्र्य धोक्यात येतंय का?

 • September 2, 2017 at 1:06 pm
  Permalink

  पूर्वी महारांनी देवाला हात जरी लावला तरी हिंदू लोक त्यांच्यावर बहिष्कार टाकायचे आणि आता सुद्धा…….. बाई शनीच्या गाभार्यात गेलीच कशी. असा प्रश्न पडतो त्यांना आणि तिच्यावर बहिष्कार टाकण्यात येतो………..आजही जिथे दलित लोक राहतात तीथ गोमूत्र शिंपडले जातं तेव्हा दलितांच्या बाजूने कोणी हिंदू जात नाही……..आणि दलितांनी गणपती बसवला मग त्याचा कहाणी विरोध केला तर मग सगळे टाळ्या वाजवणारे त्यांची बाजू घेऊ लागले का कारण ह्यांना ह्यांचा धंदा चालूच चालूच ठेवायचाय आणि जर का बहुजांनी त्यांच्या घरात ब्राम्हणांना बोलावले नाही तर त्यांचा धंदा कसा चालणार हो एक त्यांच्या साठी मोठा प्रश्नच आहे………आणि ज्यांनी इतरांवर बहिष्कार टाकलाय त्यांनी हे लक्षात घ्यावं कि बौद्ध धम्मात बहिष्कार टाकण्यात येत नाही, मैत्री आणि करुणेचा वापर केला जातो जर परिवर्तन घडवायचे असेल तर…..बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिल्यानन्तर सगळेच जणं बौद्ध झालेत असं नाही काही अडाणी लोकांनी देव घरातच ठेवले हा मूर्ख पणा केला……पण यात त्यांची सुद्धा म्हणावं इतकी चूक नाही हि बामन लोक अतिशय हुशार आहेत ह्यांनी देव कोपेल अशी सुद्धा भीती मनात भरली होतो आता आपली लोक अडाणी ती अडाणी ह्यात त्यांची हि काही चूक नाही पाच हजार वर्षांपासून त्यांना मानव अधिकारापासून वंचित ठेवलं यात त्यांचा काय दोष……आणि ह्या सगळ्या गोष्टी हिंदू धर्मामुळेच होत आहे तेव्हा ह्या हिंदू धर्मावर बौद्ध धम्म हाच एक उपाय आहे आपल्या बहुजन बांधवांनी आता हुशार होईल पाहिजे आणि बौद्ध धम्माकडे वळलं पाहिजे नाहीतर हि मनूची टाळकी पुन्हा ज्यांनी ज्यांनी गणपती बाहेर काढलेत त्यांच्या घरात पुन्हा आणून ठेवतील आणि वरतून त्यांच्या सोबत तुम्हाला सुद्धा टाळ्या वाजवायला सांगतील आणि कोणावर बहिष्कार टाकण्या पेक्षा बौद्ध धम्माचे संस्कार टका कारण बहिष्कार टाकणे हि हिंदू धर्माची शिकवण आहे एखाद्याला समाजातून दूर करण्याची हि हिंदू धर्माची शिकवण आहे म्हणजेच मनूची. जय सावित्री, जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, नमो बुद्धाय, जय भीम.

  Reply
  • September 4, 2017 at 9:04 am
   Permalink

   Nice.. Jai Bhim

   Reply
  • September 4, 2017 at 4:50 pm
   Permalink

   Very well said sir

   Reply
  • September 13, 2018 at 5:28 pm
   Permalink

   Bhau koni hindu ni jar gharat chhand mhanun kuran thevun ramjaan, Eid sajari keli tr RSS ,bajrang dal , Hindu mahasabh tyass kahi virodh karnar ki sarv dharma sambhav asya sanvidhanala mananar

   Reply
  • September 14, 2018 at 4:17 pm
   Permalink

   22 pratidya madhil ek pratidnya Daru Pinar nahi ase ahe
   Kiti lok apli pratidnya visrle jra bgha.. Fact jai Bhim bolun swatala anuyayi samjne chukiche ahe

   Reply
 • September 2, 2017 at 3:48 pm
  Permalink

  १) २२ मधील एक प्रतिज्ञा अशी आहे कि ‘मी दारू पिणार नाही’. किती नवबौद्ध हि प्रतिज्ञा पाळतात?
  २) पूर्वी दलितांना मंदिरात जाऊ दिले जायचे नाही. म्हणून लोकमान्य टिळकांनी देवालाच बाहेर आणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. जेणेकरून सर्वांनाच देवाचे दर्शन घेता यावे.
  ३) जर हिंदू धर्म इतका वाईट आहे तर मग सर्व नवबौद्धांच्या कागदपत्रांवर जात धर्म हे बौद्ध आहे कि अजून काही?
  ४) तुम्ही आरक्षण, फी सवलत आणि फी माफी हे कागदपत्रांवर बौद्ध असा उल्लेख करून मिळवता कि हिंदू दलित जात दाखवून?

  Reply
  • September 2, 2017 at 7:06 pm
   Permalink

   बौद्ध

   Reply
  • September 4, 2017 at 5:06 pm
   Permalink

   Ani dharmaswatantra Dil ahe babasahebani ……manya ahe ….
   Mg tumcha hindu Samaja madhale lok tr Kay khaav yaat pn swatantra det nahi ahet te sambhala adhi ……jatiyata sampli mhanta n ajun hi khedo PADI kaun bagha budhana mndirat entry nahi ghari chaha pajaycha n tr plastic glass madhe ddetat ….aplya samajacha Chuka sudrava ashi adhi mg dusryana shikva………jr Gouri Ganpati karayche aste n tr Dharm Parivartan kelach nast amhi ……te tumhalach theva …..ani jyan te karaycha aaj pn hindu dharma madhe ja …..swatala boudh mhanun gheu Naka …..with respect

   Reply
   • September 7, 2019 at 3:31 pm
    Permalink

    Kontya Gavala jayla sagto ahe tya gavache Nav send kr mala MI bagto Tu Kharach sagto ahe k…. K mag MI Maje Jay bhim friends che number deu tula ani vichar ata paryant Amhi Kase vaglo tyachya barober tr….

    Reply
  • September 4, 2017 at 5:56 pm
   Permalink

   Lokmanya tilakancha ha udesh navta

   Reply
 • September 2, 2017 at 8:39 pm
  Permalink

  Ya na tya margane Bouddha dharmiyanna badnam kara tumhi. . Jar ganpati baswycha ahe tumhala tar Hindu dharm swikara ani basawa konachi kahi harkat nhi. . Babasahebanni jyapramane Hindu lok gharat Babasahebancha photo lawat nahi tyachyamule Boudha lokanni gharat ganpati baswane kitpat yogya ahe. Ganpati ha Hindu bandhwancha san ahe tyanchya bhawana dukhwane he amcha hetu nahi pan Boudha dharmiyanni Babasahebanchya 22 pratidnya manayala Hawya .. Rahila prashn daru pinyacha tar saglya dhrmatil lok Pitat tyamule Boudhanna shikwanyadhi swatachya lokanna shahanpana shikwa .. Amchya Dhammat Kay karych te amhi pahun gheu. Wari je photo dakhwatat tar Dalai lama Bharatat Sharanarthi mhun ahet tyamule te ase krt ahet. Ani Athawale saheb BJP chya dawanila bandhlele ahet. Samaj tyanna badhil nahi.. Jay Bhim.

  Reply
  • September 3, 2017 at 10:16 pm
   Permalink

   चुकीच सांगितले आहे तुमच्या आदर्श व्यक्तीने. गणपती ची पूजा केल्याने असे काय चूक होते कि तुमचा धर्म त्याला मान्यता देत नाही. आधी दारू पिणे सोडा, नुसता धिंगाणा करणारा समाज आहे तुमचा. गणपती ची पूजा अर्चा करायला नको मग बाहेर जाऊन विसर्जन मिरवणुकीत दारू पिवून नाचता कशाला?

   Reply
   • September 4, 2017 at 1:24 am
    Permalink

    Shalet saglech homework karun janare asatat Ase nahi, kahi astat jyana ajun abhyas karayacha Asto…. Jar Hindu dalit lihun arkshan milal aste… Tar Buddha zaloch nasto……ani arkshan Kay ahe…. Konala milate… Ani ka….. Ani Je boudha ahet Tyana Kiti. Milte….. Tyapakki milaleli scholarship hi Kiti brashtacharina milun Mag tya vidharthyala milate he tumhala arkshan milalyavar kalel….. So not over reacting on this topic……. It’s hurts others……

    Reply
   • September 4, 2017 at 8:30 am
    Permalink

    Hindu Lokanna Samjaun Sangne Chukiche Ahe, Karan Tyanchyavar Andhshraddhech Khup Moth Jaal Tayar Karun Thevlay… Rahila Prashn Bouddhancha Tar Aamhi Aadhi Mahar Hoto, Tumchya Lokanchya Sandhyat To Vait Goshti Karayla Lagla. Pan Ambedkaranni Aamche Dole Ughadle. Tari Pragati Hi Santh Gatine Hot Aste Mhnun Aamchya Jatitil Lok Ajun Sudhrli Nahit Pan Nakki Sudhartil.

    Reply
   • September 4, 2017 at 4:57 pm
    Permalink

    Amcha Samaja baddl tumcha kadun Kahi certificate nako ahe amhala ……j certificate watayche n te tumcha samjat wata….tithe tyachi jast garaj ahe ……tumcha dok tithe lava …….ani yevdhach samjik ekyacha goshti krta tr tumcha ek Ghar dakhva jithe baba sahebamcha photo lagla assel ……kiva kontya hi samaj muslim cristian Sikh ghya
    ….. Ahe ka koni

    Reply
 • September 3, 2017 at 4:49 pm
  Permalink

  भावनेचा भारात हिंदु होने अतिशय सोपे आहे, पण बौद्ध होने तितकेच कठीण. हिंदु धर्माचा अंवलब करण्यासाठी निसर्ग रूपी शारीरीक यंत्रणेची आवश्कता नसते. कारण त्यामध्ये उत्पन्न होणारी श्रद्धा व विश्वास ही चमत्कारी स्वरूपाची आहे. पण बौद्ध धम्मात चमत्काराला स्थान नाही, बौद्ध होण्याकरीता निसर्ग रूपी शारीरीक यंत्रणेची आवश्कता असते कारण यामध्ये उत्पन्न होणारी श्रद्धा व विश्वास है धैर्य, समजुक व तर्क गाठल्याया शिवाय येत नाही. गौतम बुद्धाची शिकवण आहे ‘अप्प दीपो भव’ अर्थात अपना प्रकाश स्वयं बनो।

  Reply
 • September 4, 2017 at 4:46 pm
  Permalink

  chauka chaukat putale basavine, stambh ubharane he pan manya ahe ka. jar gharat ganaptichi sthapana karun changali urja (energy), vatavaran nirman hot asel tar tyat wait kay ahe. fakt ganapati baswa, bramhnana naka bolavu.

  Reply
 • September 6, 2017 at 2:45 pm
  Permalink

  70 varsh aarakshan daun pn kuthe sudharlat te ata sudharnar aahat….spardha hi baribarchya br karavi lagte….tumhi barobar yaylach tayar nahit..je aanyay karnare bramhan hote te kadhich marun gele…he navin pidhi aahe…
  Mala vatate he Jat shabdh sarwani aayushyatun kadhun takava…nahitr pudhil 1000 varsh tri sagli bhandatch rahu….

  Reply
 • September 14, 2018 at 8:20 pm
  Permalink

  आमच्या येथील बौध्द बांधव नेहमीच गणेश दर्शनाला येऊन बाप्पाची यथासांग पूजा करतात ,यात काहीच वावगं नाही.
  (कुविचार बाजूला सारून पुढे चला)

  Reply
 • June 2, 2019 at 11:22 pm
  Permalink

  Ha lekh lihnaryachi aakal kalali…. Tujhi hi akkal Ani shanpana tuzya Gharat dakhav

  Reply
 • September 5, 2019 at 6:40 pm
  Permalink

  एका देशात असून तुम्ही लोक असेकसे बोलू शकता
  प्रत्येकांनी आपल्या आपल्या धर्माला follow करायला हवा
  आणि मंदिर, विहार, चर्च,दर्गा इथे गेले तर गुन्हा नाहीच आहे
  कोणी मंदिरात विहारात चर्च मला नाही वाटत कि धर्म बदलतो म्हणून…..
  असे कशाला बोलता यार धर्माबद्दल
  खूप वाईट वाटते हे सगळं बघून
  जे बॉर्डरवर आहेत त्यांनी मग काय करावं

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?