' CID आणि CBI, राज्य सरकारच्या अखत्यारीत की केंद्र सरकारच्या? नेमका फरक जाणून घ्या – InMarathi

CID आणि CBI, राज्य सरकारच्या अखत्यारीत की केंद्र सरकारच्या? नेमका फरक जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

CID आणि CBI या आपल्या देशाच्या दोन वेगवेगळ्या Investigating Agencies आहेत. देशांतर्गत होणाऱ्या अपराधीक घटनांचा छडा लावण्याचं काम या एजेन्सी करतात. देशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी यांच्यावर असते.

देशात जर काही अपराधीक, अनुचित घडतंय तर त्या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा छडा लावण्याचं काम या एजेंसीच असत. या दोन एजेंसीच आपल्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत मोलाचं स्थान आहे.

 

cid and cbi InMarathi

 

शात घडणाऱ्या मोठं-मोठ्या अपराधीक घटनांचा तपास या एजेन्सी लावतात. तरीसुद्धा एक गोष्ट आवर्जून समजून घेण्यासारखी आहे की या दोन वेगवेगळ्या Investigating Agenies असून यांच्या इन्वेस्टिगेटिंग एरियाही वेगवेगळा असतो.

CID ही एका प्रदेशात घडणाऱ्या घटनांची तपासणी करते, तसेच ही राज्य सरकारच्या आदेशावर काम करते. तर CBI  ही संपूर्ण देशात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांना इन्वेस्टीगेट करते आणि यांना आदेश देण्याचा अधिकार केंद्र सरकार तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला असतो.

 

crime-marathipizza
depositphotos.com

आता आपण CID आणि CBI या दोन महत्वाच्या Investigating Agencies ची सविस्तर माहिती जाणून घेऊ…

CID म्हणजेच Crime Investigation Department…! CID ची स्थापना १९०२ साली पोलीस आयोगाच्या शिफारशीने ब्रिटिश सरकारतर्फे निर्माण करण्यात आली होती. पोलीस कर्मचाऱ्यांना यात भरती करण्याअगोदर त्यांना एक विशेष प्रशिक्षण देण्यात येते. CID ही कुठल्याही प्रदेशात होणाऱ्या अपराधीक घटनांचा तपास करते.

 

cid logo InMarathi

 

CID हा प्रदेशातील पोलीसांचा तपासणी आणि गुप्त विभाग असतो. या विभागाला हत्या, दंगे, अपहरण, चोरी इत्यादी गुन्ह्यांची तपासणी सोपविली जाते. या एजेन्सीला तपास करण्याची जबाबदारी त्या प्रदेशाची राज्य सरकार किंवा कधी कधी त्या राज्याच्या उच्च न्यायालयातर्फे देण्यात येते.

CBI म्हणजेच Central Bureau Of Investigation. CBI ही भारत सरकारची एक अशी एजेन्सी आहे जी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या गुन्ह्यांची तपासणी करते. जसे की, हत्या, घोटाळा आणि भ्रष्टाचार यांसारख्या गुन्ह्यांचा तपास CBI भारत सरकार तर्फे करते.

 

cbi-logo-InMarathi

 

CBI ची स्थापना १९४१ मध्ये करण्यात आली होती पण याला एप्रिल १९६३ ला Central Bureau Of Investigation हे नाव देण्यात आलं. या डिपार्टमेंटचं मुख्यालय दिल्लीत आहे.

दिल्ली विशेष पोलीस आस्थापना कायदा, १९४६ ने CBI ला तपासणीचे अधिकार दिले आहेत. भारत सरकार राज्य सरकारच्या संमतीने CBI ला राज्यातील प्रकरणांच्या चौकशीचे आदेश देते.

शिवाय, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय राज्य सरकारच्या सहमतीशिवाय कुठल्याही राज्यात अपराधीक प्रकरणाच्या चौकशीचे आदेश CBI ला देऊ शकते.

आता आपण जाणून घेऊ की या CID आणि CBI मध्ये नेमका काय फरक आहे ते…

CID आणि CBI या दोन्हीचे काम करण्याचे क्षेत्र वेगवेगळे आहे, CID चे काम हे राज्यापुरते मर्यादित आहे तर CBI चे काम हे देश आणि विदेशापर्यंत असत.

CID-marathipizza
thehansindia.com

CID जवळ येणारी प्रकरण ही राज्य सरकार आणि उच्च न्यायालय त्यांच्याकडे सुपूर्द करते, तर CBI ला केंद्र सरकार, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय प्रकरणांची जबाबदारी सोपवते.

CID राज्यांतर्गत होणाऱ्या अपराधीक घटना जसे दंगा, हत्या, अपहरण, चोरी आणि हल्ला यांसारख्या प्रकरणांचा तपास करते तर CBI ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घोटाळे, फसवणूक, हत्या, संस्थेचे घोटाळे इत्यादी प्रकरणात देश आणि विदेशात तपास करते.

cbi02-marathipizza
deccanchronicle.com

जर कुठल्या व्यक्तीला CID मध्ये रुजू व्हायचे असल्यास त्याला राज्य सरकारद्वारे आयोजित करण्यात येणारी पोलीस परीक्षेत उत्तीर्ण होवून त्यानंतर गुन्हे-विज्ञानची परीक्षेत उत्तीर्ण व्हावं लागत. तर CBI मध्ये रुजू होण्याकरिता SSC बोर्डातर्फे आयोजित करण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

सध्या CBI मध्ये एकूण ७ विभाग आहेत ते खालील प्रमाणे :

  • Anti Corruption Division
  • Economic Offences Division
  • Special Crimes Division
  • Directorate of Prosecution
  • Administration Division
  • Policy & Coordination Division
  • Central Forensic Science Laboratory

आपल्या देशाच्या आंतरिक सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी घेणाऱ्या आणि अप्राधिक प्रकरणांचा छडा लावण्यात CID आणि CBI मोलाची कामगिरी बजावतात…  

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?